सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरावे

भोपाळ : भाजपा आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी आश्चर्यकारकपणे हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने मुंबईतील आपली ताकद दाखवून द्यावी. प्रसंगी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरून लढा द्यावा. कारण या पक्षांपुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी दिली आहे. भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले … Read more

राज्याला आता स्थिर सरकार मिळणार -कोल्हे

कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून राज्याला स्थिर सरकार देण्याचे वचन दिलेले होते. त्याप्रमाणे येथील मतदारांनी भाजपा-सेना महायुतीला कौलही दिला होता.  मात्र गेले महिनाभर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाट्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठींबा देवुन शेतकरी हितासाठी जो निर्णय घेतला त्यामुळे आता स्थिर सरकार मिळणार आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष … Read more

सरकार दिलेल्या कालावधीतच बहुमत सिध्द करेल -आ. विखे पाटील

शिर्डी : राज्यातील जनतेने भाजप सरकारला बहुमत दिल्याने भारतीय जनता पार्टीचेच सरकार सत्तारुढ होईल हे निश्चितच होते. आता राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत सरकार आपले बहुमत नक्कीच सिध्द करेल, असा विश्वास माजी गृहनिर्माण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी टिका करणाऱ्या खा. … Read more

युवकाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

राहुरी: मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत उत्तम खांडेकर असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील जांभळी येथील १५ वर्षे वयाचा प्रशांत उत्तम खांडेकर हा मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेला होता. त्याच्याबरोबर अनिल खेळणार, अंकुश बाचकर हे देखील होते. मुळा धरणाच्या … Read more

घराच्या कपाटातून चोरटयाने सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवले

संगमनेर: संगमनेर शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरटयांनी धुमाकूळ घालत एच.डी.बी स्व्हिहसेस फायनान्शियल कंपनीचे कार्यालय फोडल्याची घटना ताजी असतानाच शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुन्हा चोरटयांनी धुमाकूळ घालत रायतेवाडी याठिकाणी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार ४८५ रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला आहे. त्यामुळे आता … Read more

अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

सांगली : अल्पवयीन विद्यार्थीनीस जबरदस्तीने पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायमूर्तींनी आरोपी महादेव बिरंगे (२६ , ता. तासगाव ) यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली . ही घटना नोव्हेंबर २०१५ सालात घडली होती. पिडीता आपल्या कुटुंबियासमवेत तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे राहत होती . या विद्यार्थीनीस आधारकार्ड काढण्यासाठी तासगाव येथे जायचे असल्याने … Read more

अहमदनगर महापालिका सत्ता पॅटर्न आता राज्यात ?

अहमदनगर : अहमदनगरच्या महानगरपालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आहे.नगरचा हा सत्ता पॅटर्न आता राज्यात राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात हाच पॅटर्न राबवित सत्ता स्थापन केली आहे. सन २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात नगरच्य मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २४,राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

शरद पवारांनी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त सामील व्हावे

पाटणा : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून राजकारणाचा फड चांगलाच रंगला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील सत्तारूढ ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त (रालोआ) सामील व्हावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली आहे. पवार रालोआत आल्यास त्यांना महत्त्वाचे पद दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय वळण देण्यासाठी शिवसेना जबाबदार असून भाजपाने सेनेला चांगलाच … Read more

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत फडणवीस बहुमत सिद्ध करतील : गडकरी

नागपूर : राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या दोघांचेही मी अभिनंदन करतो,  अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत फडणवीस बहुमत सिद्ध करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरात २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान खासदार सांस्कृतिक … Read more

हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले ? आणि नंतर ……

अहमदनगर :- बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सुरक्षीततेसाठी हे तिन्ही पक्ष सावध झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काल दिवसभर धावपळ करुन सायंकाळपर्यंत आमदार गोळा केले आहेत सध्या या आमदारांवर छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांचे विशेष लक्ष आहे. आता शिवसेनेचे आमदार मुंबईत हॉटेल ललितमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे … Read more

अजित पवारांचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी बंडखोर आमदारांबद्दल केलेले एक वक्तव्य त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. मात्र तीनही पक्षांकडे सरकार स्थापन करण्याएवढे पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटू न शकल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भाजपाचे … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत … Read more

राशीभविष्य : या राशीच्या लोकांना हा आठवडा जाणार जबरदस्त !

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य… मेष :- मित्र-मैत्रिणींसमवेत एखादी छोटी सहल आयोजित कराल. त्यामुळे कामातील ताणतणाव तितकेसे जाणवणार नाहीत. उद्योगधंद्यात अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात. खर्चाचे पत्रक गृहलक्ष्मीच्या हाती सोपवा.राजकारणापासून सुरक्षित अंतर ठेवा. विरोधकांना मात … Read more

पक्षात फूट पडली कि नाही हे मला माहीत नाही – आमदार नीलेश लंके

पारनेर :- मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून विजयी झालो असून पक्षाबरोबरच राहणार आहे. पक्षात फूट पडली किंवा नाही हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी पक्ष मजबूत असून पक्षाच्या बैठकीस आपण उपस्थित राहणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातम्या दूरचित्रवाहिनीवर सुरू झाल्यानंतर … Read more

धरणात पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

राहुरी :- मित्रांसमवेत मुळा धरणात पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, जांभळी, ता. राहुरी) असे या मुलाचे नाव आहे. मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये प्रशांत हा मित्र अप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर यांच्यासह पोहायला गेला होता. त्या ठिकाणी … Read more

नव्या सरकारामुळे आमदार मोनिका राजळेही झाल्या चकीत….

पाथर्डी |धक्कादायक व अनपेक्षित बातमीने पाथर्डी तालुका झोपेतून जागा झाला. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांच्या शपथविधीने सर्वांनाच चकीत केले. आमदार मोनिका राजळे यांनाही शपथविधीबाबत काहीच कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र नेत्यांचा कल पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणे पसंत केले. ‘मी पुन्हा येणार’ अशी ग्वाही … Read more

कांदा @ ८३०० रुपये !

पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला क्विंटलमागे आजवरचा उच्चांकी ८३०० रुपये इतका दर मिळाला. परतीच्या पावसानंतर कांद्याचे दर कडाडले असून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये रोजच कांद्याच्या दराचे उच्चांक मोडले जात आहेत. कांदा दर वाढल्यामुळे घरगुती ग्राहक व हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात जुन्या … Read more

पारनेर मध्ये भांडणात एकाचा मृत्यू,एक गंभीर जखमी

पारनेर : तालुक्यातील घाणेगाव परिसरातील पारधी समाजातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. सुपा पोलीस स्टेशनला शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीत घटनेतील जखमी अक्षय अर्पण भोसले वय 17 वर्षे याने म्हटले आहे, मंत्री सिराज चव्हाण (रा. वाघुंडे) उंबर्‍या लहिन्या काळे, अक्षय उंबर्‍या काळे, संगड्या उंबर्‍या काळे, मिथुन उंबर्‍या काळे आणि … Read more