मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही….

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशा क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी व प्रस्ताव पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मांडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकित काही मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी … Read more

कुरूप दिसते म्हणून तलाक!

हैदराबाद : येथील एका रिक्षाचालकाने पत्नी कुरूप दिसत असल्याचा आरोप करत तलाक दिल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर रिक्षाचालकावर मुस्लिम महिला संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहम्मद मुस्तफा हा कापड व्यावसायिक असल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. यानंतर गत जुलै महिन्यात पीडित महिला व रिक्षाचालक मुस्तफाचा विवाह झाला. … Read more

अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस !

दिल्ली: वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनेच तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. पीडित मुलीने सांगितले की, अवघ्या सहा वर्षांची असतानाच वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. जवळपास आठ वर्षे हा प्रकार सुरु होता. ही धक्कादायक घटना यूकेमधील डर्बी येथील आहे. पीडित मुलगी १३ वर्षांची असताना तिने बाळाला जन्म दिला.  पीडित … Read more

एकतर्फी प्रेमप्रकरणातून दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या विवाहितेचा खून

सोलापूर :- विवाहितेचा एकतर्फी प्रेमप्रकरणातून गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या प्रियंका तुकाराम गोडगे (वय २०, रा. साकत, ता. परंडा, जि. उस्मानाबाद, माहेर – न्यू लक्ष्मी चाळ, देगाव रोड, सोलापूर) ह्या विवाहितेचा खून झाला आहे या खूनप्रकरणी माहेरच्या परिसरात राहणाऱ्या राजू श्रीकांत शंके या युवकावर गुन्हा दाखल … Read more

‘या’ महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद

नवी दिल्लीः  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार  नोव्हेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार आहे.या महिन्यात छट पुजा, गुरू नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, वांग्ला फेस्टिव्हल, कनकदास जयंती, ल्हाबब टुचेन, सेंग कट स्नेम आणि रविवारचा समावेश आहे. १ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू आणि इम्फाळमध्ये कन्नड राज्योत्सव साजरा … Read more

होय आता हे शक्य आहे,कॉल करून पैसे कमवा !

वृत्तसंस्था :- कॉल करा आणि पैसे कमवा होय ! हे खरे खरतर कॉल केल्यानंतर तुमचे पैसे कट होतात पण टेलिकॉम सेक्टरमधील वाढत्या स्पर्धेमुळे एका कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे. प्रत्येक टेलीकॉम वेगवेगळ्या ऑफर्स देतात. पण बीएसएनएल थेट कॅशबॅक ऑफर देत असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूजर्सने पाच मिनिटापेक्षा अधिक … Read more

ट्रक – क्रुझरच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी

अहमदनगर :- गुरुवारी रात्री नगर – सोलापूर रस्त्यावर नगर तालुक्यातील साकत गावाजवळ मालट्रक व क्रुझर गाडीचा अपघात होऊन क्रुझरमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह पळून गेला आहे. क्रुझर जीपचालक नागेस गणपत आदलिंगे, श्रीधर शिवाजी माळी, कोमल श्रीधर माळी, महादेव हरिश्चंद्र माळी, अजित जनार्दन क्षीरसागर, तृप्ती अजित क्षीरसागर, कान्होपात्रा सुदर्शन यादव, सुदर्शन महावीर … Read more

जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – आ. निलेश लंके

अहमदनगर – नगर तालुक्यातील निंबळक, देहरे व वाळकी गटातील जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवला असून मोठे मताधिक्य दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. तालुक्याला स्वतंत्र आमदार नसल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे. जनतेला पोरकेपणा जाणवू देणार नाही असे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले. नगर तालुका दुध संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा … Read more

रोहित पवारांची विजयी मिरवणूक, तब्बल 30 जेसीबींमधून उधळला गुलाल!

कर्जत – जामखेड मतदार संघात राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅली जामखेड मध्ये काढण्यात आली.  कर्जत जामखेड मतदार संघात भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. या मिरवणुकीत तब्बल … Read more

तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं?

राब.. राब.. राबून शेतात सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले, पण मान्सून हंगाम संपून गेल्यानंतरही पडत असलेल्या जोरदार पावसाने कांद्याचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे. आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मांडल्या. सेंद्री लाल कांद्याचे आगार म्हणून पठार भागावरील पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, … Read more

रेशन दुकानांतही मिळेल शालेय साहित्य!

रेशन दुकानांमध्ये शिधावाटपाबरोबरच स्टेशनरी, तसेच शालोपयोगी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने ही परवानगी दिली असून, यामुळे रेशन दुकाने आता विविध वस्तू भांडारचे रूप घेणार आहेत. रेशन दुकानदारांना शिधा वाटपात मिळणारे कमिशन तुटपुंजे असल्याने त्यात वाढ करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. अशातच या दुकानदारांना अन्य वस्तू … Read more

राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कयार चक्रीवादळापाठोपाठ आता महाचक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. लक्षद्वीप व लगतच्या दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर हे वादळ घोंघावत आहे. तसेच कयार वादळही पश्चिमेमध्ये अरबी समुद्रावर आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असून, येत्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आगामी पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान … Read more

आत्महत्येबाबत महाराष्ट्र नंबर वन !

नवी दिल्ली : २०१७ मध्ये देशभरात ८१२९ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. यात १४८८ लोक महाराष्ट्रातील, तर ९६८ लोक हे मध्यप्रदेशातील होते, अशी माहिती मिळते. यावरून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लोक आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर मध्यप्रदेशचा नंबर लागतो, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमधून पुढे आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद … Read more

कांद्याने पुन्हा भाव खाल्ला @ 45?? !

नाशिक : परतीच्या पावसाने हाहाकार माजविलेला असल्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यात अतिपावसामुळे कांदा सडल्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी घेत प्रतिक्विंटल ४५८१ रुपये भाव गाठला आहे. परतीच्या पावसामुळे भाजीपाला महागलेला असताना कांद्याने पुन्हा भाव खाल्ल्यामुळे महिलावर्गासह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्याभरापासून परतीच्या … Read more

पीकविमा कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या डोळयांत पाणी!

पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असताना विमा कंपनी शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगून वेठीस धरून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. विमा कंपनीची नेमणूक करताना शासनाने स्पष्ट सूचना न दिल्याने असे प्रकार घडत आहेत. विमा कंपनीवर शासनाचे नियंत्रण नसून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे, यामुळे राज़्यातील हजारो शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री पीकविमा भरल्यानंतर … Read more

पाण्यासाठी संघर्ष करणार : आमदार नीलेश लंके

पारनेर :- कान्हूरपठार व पठार भागावरील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करून रस्त्यावर उतरू आणि तरीही हा प्रश्न सुटला नाही तर सरकारशी दोन हात करू, पण आगामी काळात हा पाणीप्रश्न सोडवूच, अशी ग्वाही तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांनी दिली. कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे मंगळवारी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदश्य विलास … Read more

आमदार आशुतोष काळेंचे अजित पवारांना साकडे

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघात परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचनामे सुरू आहेत; मात्र सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून द्या, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांना घातले आहे. पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, … Read more