विखे व ससाणे गटाला धक्का.

श्रीरामपूर : काँग्रेसला जय महाराष्ट्र करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधत भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. आता पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोेध करणाऱ्या विखे, ससाणे गटाला धक्का बसला आहे. आता या दोन्ही गटाकडून अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. … Read more

सोशल मीडियाचे खाते आधार क्रमांकाशी जोडा !

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात फेसबूक, ट्विटर व इंस्टाग्राम आदी प्रकारचा सोशल मीडिया अभिव्यक्त होण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे; परंतु याद्वारे बनावट बातम्या अर्थात ‘फेक न्यूज’ मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. त्यास चाप लावण्यासाठी सोशल मीडियाचे खाते आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे देण्यात आलेली … Read more

हा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा !

नवी दिल्ली : देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस कांदा भडकत चालला आहे. अशावेळी कांद्यासंदर्भात एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नाला यूपीमधील मंत्र्याने आगळावेगळा सल्ला दिलेला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी ‘दर वाढले तर कमी कांदा खावा’, असा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले … Read more

डॉ.मनमोहन सिंगांना पाकचे निमंत्रण

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून ‘भारत-पाक’मधील तणाव टोकाला पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने आपल्या हद्दीतील करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी या कॉरिडोरचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मनमोहन या कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, सूत्रांनी … Read more

कांदा सहाशे रुपयांनी गडगडला!

नाशिक : कांद्याच्या वाढत चाललेल्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच सोमवारी कांद्याचे भाव सहाशे ते सातशे रुपयांनी गडगडले. लासलगाव आणि पिंपळगाव बसंवत बाजार समितीत लिलाव सुरू होताच दर खाली आले. राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील अशीच स्थिती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. सोमवारी … Read more

भीषण बस अपघातात २१ ठार

अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत … Read more

विनायक मेटेंना धक्का

बीड : राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी (दि.३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देण्यात आला. बीडची जागा सेनेकडे गेल्याने महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांना मोठा धक्का बसला आहे. बीड मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांना गतवेळी अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला … Read more

मकरंद अनासपुरे ची स्टाईल मारताना अर्ज भरायला गेला आणि पाच हजारांचा दंड भरून आला

अहमदनगर : ‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’ या मराठी सिनेमातील मकरंद अनासपुरे यांनी साकारलेल्या ‘नारायणा’च्या भूमिकेचा नेवासा निवडणूक शाखेने सोमवारी अनुभव घेतला. देडगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून घेऊन आलेली चिल्लर त्यांच्या चांगलीच अंगाशी आली. चिल्लरसाठी आणलेली प्लास्टिकची पिशवी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरेत आली आणि त्यांना पाच हजार रुपये … Read more

राष्ट्रवादीला हादरा …

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन केज मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी परळीत भाजपामध्ये प्रवेश केला. नमिता मुंदडा आता केजमध्ये भाजपाकडून लढणार आहेत. . दरम्यान, नमनालाच राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच भाजपामध्ये खेचून मंत्री पंकजा मुंडे यांनी बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना हादरा … Read more

नातीला सहाव्या मजल्यावरून फेकले !

मुंबई : सहाव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून पडून मृत्यू झालेल्या मालाडमधील दोन वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. नातवाशी खेळताना होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून आजीनेच नातीला सहाव्या माळ्यावरून फेकून हत्या केल्याची खळबळजनक बाब समोर आली. कुरार पोलिसांनी क्रूर आजीला अटक केली आहे.. मालाड येथील आप्पापाडा परिसरातील एसआरए बिल्डिंगमधील सहाव्या माळ्यावर रुक्साना अन्सारी … Read more

अजित दादा म्हणतात ‘अबकी बार आघाडी १७५ पार’

मुंबई : अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केली. आम्ही हा खेळ संपवू, असा इशारा देतानाच ‘अबकी बार आघाडी १७५ पार’ असा नारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सोमवारी दिला. काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

भाजपची पहिली यादी जाहीर : नगर जिल्ह्यातून या आठ नेत्यांची उमेदवारी फायनल !

अहमदनगर :- भाजपाने विधानसभा निवडणूकीसाठी दिल्लीतून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 125 उमेदवारांच्या ह्या यादीत नगर जिल्ह्यातील आठ जागांचा समावेश आहे. अहमनगर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने वैभव पिचड, राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, प्रा.राम शिंदे शिवाजीराव कर्डीले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर : … Read more

आमदार मोनिका राजळे एकदा तुमचा सात-बारा तपासून बघा !

शेवगाव : भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, अशा कार्यकर्त्यांना आमदार झाल्यानंतर मोनिका राजळे यांनी खड्यासारखे वेचून बाहेर काढले व स्वत:च्या बगलबच्च्यांना महत्त्वाची लाभाची पदे दिली. भाजपचे निष्ठावान असे प्रमाणपत्र तुम्ही देण्याची गरज नाही. एकदा तुमचा सात-बारा व फेरफार तपासून बघा, म्हणजे कोण निष्ठावान हे जनताच ठरवेल, अशी टीका ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांनी … Read more

मुरकुटेंनी तालुक्याचे वाळवंट केले : गडाख

नेवासे: माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केले. आधी सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्याचे वाळवंट केल्याचा आरोप शंकररावांनी या वेळी केला. पक्षाच्या झेंड्याखाली काम करताना मर्यादा पडत असल्याने अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे सांगत मुरकुटे यांच्या … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या अडचणीत भर, वंचितकडून किरण काळे यांना उमेदवारी !

अहमदनगर :- आज वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नगर शहर विधानसभा मतदारसंघातून किरण काळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून काळे यांची उमेदवारी … Read more

सोशल मीडियावर प्रचारासाठी पूर्व परवानगी आवश्यक !

अहमदनगर :- राजकीय पक्ष आणि उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून, सोशल मीडियावर प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींना पूर्वप्रमाणन करून घ्यावे लागणार आहे. प्रसारण दिनांकाच्या ३ दिवस आधी ही जाहिरात प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नाही, असे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट … Read more

महायुती सरकारचा पराभव अटळ,भावी मुख्यमंत्री आघाडीचाच – बाळासाहेब थोरात !

संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत … Read more

पक्षाकडून डावलण्याचा संबंध येतो कुठे? – आमदार कर्डिले

राहुरी :- दोन दिवसांत भाजपच्या यादीत माझे नाव दिसेल. ३ सप्टेंबरला आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या माझ्या उमेदवारीबाबतच्या उलटसुलट वृत्तात दम नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी सांगितले. राहुरी येथील मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे होते. कर्डिले म्हणाले, मागील पाच … Read more