पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले…

नवी दिल्ली : सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात तेलाची टंचाई भेडसावत असतानाच सलग सहाव्या दिवशी देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महागले असले तरी मागील सहा दिवसांत ही वाढ १.३१ रुपयांनी झाली आहे, तर डिझेल देखील २५ पैशांनी महागले आहे. मागील सहा … Read more

कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलो !

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या … Read more

मनसे आघाडीत येणार?

पुणे : आघाडीत पुण्यातील आठपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तर तीन जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात येणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. मित्रपक्षासाठी सोडलेली जागा कोथरूडची असून तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व आहे. यामुळे ही जागा मनसेसाठी सोडली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला सामावून घेतले जाणार असल्याची चर्चा जोर … Read more

आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर ! भरचौकात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर…

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बँक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे … Read more

झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या … Read more

उद्या आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार ?

२१ ऑक्टोबरला होत असलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्याविषयी आता नव्याने वावड्या उठायला लागल्या आहेत. अर्थात या वावड्या आहेत म्हणून की काय, या दोघांकडूनही यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र येत्या दि. २४ रोजी आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असून माजी आ. … Read more

उपमुख्यमंत्रिपद सेनेला – देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही पक्ष विजयाचे दावे करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या … Read more

दीपक पुनिया उपांत्य फेरीत: ऑलिम्पिकसाठी पात्र

नूर सुलतान : उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस आर्तुरो मेंडेझचा अटीतटीच्या लढतीत ७-६ असा निसटता विजय मिळवून ज्युनियर विश्वविजेता दीपक पुनियाने विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह दीपक पुनियाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधील आपले स्थानही निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक पुनिया हा चौथा भारतीय कुस्तीपटू आहे. … Read more

कोयना धरणाचे दरवाजे बंद

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी … Read more

मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद : मध्यान्ह भोजनावेळी हृदयविकाराच्या झटक्याने येथील जिल्हा परिषद प्रशालेतील सहशिक्षक देविदास नामदेव पवार (४८) यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२०) घडली. मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी आई आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी येथील मूळचे असलेले पवार कुटुंब सध्या नाशिक येथे … Read more

दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ

नवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे स्वागत करताना या दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ असल्याचा दावा केला. ‘या निवडणुकीत काँग्रेस शेतकरी समस्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी आदी लोकांचे प्रश्न घेऊन मतदारांना सामोरे जाईल,’ असे काँग्रेसने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. … Read more

भाजप कडून विद्यमान २५ आमदारांचा पत्ता कट होणार ?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व … Read more

उदयनराजे भोसले यांना भाजप कडून मोठा झटका

सातारा: सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रितच होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे महाजनादेश यात्रेत केली होती. मात्र, शनिवारी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही निवडणूक एकत्रित होणार नसल्याचे सांगत भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा झटका दिला आहे. दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा लोकसभा … Read more

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जप्त करण्याची जबाबदारी माझी

जामखेड : कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस्च्या उमेदवाराचे डिपाजीट जप्त करण्याची जबाबदारी विखे पाटील यांची आहे. तसेच जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी तालुक्यातील सुपुत्राची गरज आहे, बाहेरच्यांची नाही. असा टोला खा.डॉ.सुजय विखे रोहित पवार यांचे नाव न घेता लावला. जप्त करण्याची जबाबदारी आपली जामखेड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. विखे … Read more

लाच घेताना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला अटक

श्रीरामपूर : श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मासिक हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना अहमदनगर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की तक्रारदार यांचा श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर मिल्क स्टॉल आहे. हा स्टॉल चालू राहाण्याकरीता मासिक हप्ता म्हणून पोलीस नाईक वैजनाथ … Read more

उसा अभावी ‘नागवडे साखर कारखाना’ बंद राहणार

श्रीगोंदा : यावर्षी ऊस नसल्याने कारखान्याचा हंगाम बंद ठेवावा लागणार आहे. मागील हंगामातील उसाची बिले जिल्ह्यात सर्वांत अगोदर देण्याचे काम नागवडे कारखान्याने केले आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यस्थळावर कमी खर्चात उसाचे बेणे देखील उपलब्ध करून दिले होते. असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले. नागवडे सहकारी कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा … Read more

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

अहमदनगर : काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रवी संजय बर्डे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काटवन … Read more

अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे यांच्या सह राष्ट्रवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर: राष्ट्रवादीच्या दोन गटात नगर शहरातील नंदनवन लॉनसमोर झालेला राडा आणि त्यानंतर दोन्ही गटांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, प्रकरण आपसात तडजोड होऊन मिटल्यानंतर कोतवाली पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे,यांच्या सह राष्टवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more