जानकर म्हणतील तोच कर्जत – जामखेडचा आमदार होणार !

कर्जत :- शिंदे साहेब तुम्ही रासपची वेळोवेळी अवहेलना केली. मात्र आता कर्जत – जामखेडचा आमदार हा महादेव जानकर ठरवतील तोच होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा शेळी – मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयामध्ये उत्साहात पार पडला, यावेळी दोडतले बोलत … Read more

भर कार्यक्रमात आ.औटी आणि खा.विखेंतील वाद चव्हाट्यावर !

पारनेर :- भोयरे पठार येथे वन विभागाच्या वतीने गॅसवाटपासाठी आमदार आणि खासदार दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते. दीड तास वाट पाहूनही खासदार येत नसल्याचे पाहून आमदारांनी गॅसवाटप उरकून घेतले. उशिरा आलेल्या खासदार डॉ. सुजय विखे यांनीही त्याच लाभार्थींना तेथेच पुन्हा गॅस वितरण केले. यापुढे एका कार्यक्रमासाठी एकालाच बोलवत जा, असा खोचक सल्ला त्यांनी संयोजकांना दिला. … Read more

निळवंडे कालव्यांच्या कामाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच

संगमनेर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडशी निर्णयामुळेच निळवंडे कालव्यांच्या कामासा सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे. जिरायती भागातील शेतकऱ्यांना युती सरकारमुळेच न्याय मिळाला, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. पानोडी येथे निळवंडे उजव्या कालव्याच्या ५७ किमी लांबीच्या मातीकामाचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती कैलास … Read more

मराठा सोयरीक म्हणजे खात्री व विश्‍वास – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- मराठा सोयरीक ग्रुपने गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करून समाजाचा विश्‍वास संपादन केला आहे. अशोक कुटे सरांनी या कार्यात सातत्य ठेवल्याने हा ग्रुप टिकून राहिला आहे, असे उदगार मराठा सोयरीक ग्रुपच्या 40 व्या मोफत राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी आ. संग्राम जगताप यांनी काढले. अहमदनगर शहरात ’संजोग लॉनमध्ये मोफत अतिभव्य राज्यस्तरीय मराठा वधुवर थेटभेट मेळावा रविवार … Read more

नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता ?

सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे. हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. … Read more

पितृ पंधरवडयामुळे भाज्यांना मागणी वाढली

पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्रद्ध तर्पण करण्यात येते. लोक या पंधरवडयात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध विधी करतात. हिंदू धर्मात त्यास विशेष महत्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष म्हणतात. पितरांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या यादरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यू तिथी माहित नसेल तर … Read more

तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता

राहुरी – तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता, तूम्ही शिक्षण घेऊन येवढ्या पदव्या घेतल्या मग राहुरीतील संस्था कशा बंद पडल्या ते सांगा. शहरातील माता भगिनींना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हते, त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर करून आणली. असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डीले … Read more

धक्कादायक: बाजरीच्या शेतात तरुणीवर बलात्कार

कर्जत :- तालुक्यातील राशिन भागात राहणाऱ्या एका २० वर्षाच्या ओळखीच्या तरुणीला आपण तुझ्या बहिणीला आणायला सिद्धटेकला जावू, असे सांगून दुचाकीवर बसवून करपरवाडी गावच्या शिवारातील बाजरीच्या शेतात नेवून आरोपीने बळजबरीने बलात्कार केला. यावेळी आरोपीला त्याच्याबरोबरील महिलेने साथ दिली. या प्रकरणी पिडीत तरुणीने काल कर्जत पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन सुरज मनचक्या भोसले, मोहिनी सूरज भोसले, दोघे रा. सिद्धटेक, … Read more

कांबळे यांना श्रीरामपुरात काँग्रेसची उमेदवारी द्या

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा, यासाठी तालुक्यातील खिर्डी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रभाकर कारभारी कांबळे या तरुण तडफदार नेतृत्वास द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना भेटून करण्यात आली. खिर्डीचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर कांबळे यांच्यासह त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणारे शिष्टमंडळ काल आ. थोरात यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यात अनिल … Read more

पती पाठोपाठ जखमी पत्नीचाही मृत्यू

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव येथील दोन सख्या भावांच्या जमिनीच्या वादात गंभीर जखमी झालेल्या गोरख भदे यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या गोरख भदे यांच्या पत्नी सुरेखा गोरख भदे यांचाही सोमवार दि.१६ रोजी पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून पती- पत्नीचा मृत्यू आणि आई- वडीलाविना पोरक्या झालेल्या मुलांना पाहुन अंत्यविधी … Read more

दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

वॉशिंग्टन : दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शास्त्रज्ञांनी झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी एक स्मार्ट ‘पायजमा’ तयार केला असून, हे वस्त्र झोपेत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके व त्याच्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेवर आपल्या सेन्सर्सद्वारे सूक्ष्म नजर ठेवणार आहे. याद्वारे मिळालेल्या डेटाचा वापर व्यक्तीच्या झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी केला जाणार आहे.. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाच्या … Read more

महाजनादेश यात्रेत दहाजणांना अटक

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निवेदन देण्यास जाणाऱ्या दहाजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली. तौसिफ रशिद मुन्शी (वय ३०), रईक अब्दुल मजीद मुन्शी (वय ३१), अय्याज शकील शेख (वय ३०), इमाम शकील मुल्ला (वय २९), गौस फकरुद्दीन शेख (वय ३१), अझहर दाऊद लांबे (वय ३१), अशपाक इकबाल सय्यद (वय २९), … Read more

महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही समस्या आता कायमस्वरूपी सोडवणार!

सांगली : एका बाजुला महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही सांगली जिल्ह्याची समस्या आता कायमस्वरूपी सोडवणार आहे. पूराचे पाणी कॅनालच्या माध्यमातून वळवून दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली. जागतीक बॅँकेने या योजनेला तत्वत: मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगीतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी सायंकाळी सांगलीत आली. या यात्रेचे आ. … Read more

भाजप नेत्याची जीभ घसरली, भर सभेत म्हणाले काँग्रेसचे आमदार ‘हिजडे’!

बंगळुरू : कर्नाटकात येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री असलेले के.एस. ईश्वरप्पा यांनी रविवारी एका जनसभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची वर्तणूक ही अगदी हिजड्यासारखी असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या जनसभेत बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, ‘आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसचे काही आमदार … Read more

सात महिलांशी लग्न करणारा तोतया पोलीसास अटक

चेन्नई : तामिळनाडूतील एका ठगाने, आपण पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशल असल्याची बतावणी करत एक नव्हे,दोन नव्हे तर चक्क सात महिलांशी विवाह केला. या तोतया पोलिसाला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. केवळ ७ वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या तिरूपूर येथील राजेश पृथ्वी याने २०१७ मध्ये चेन्नईतील नेल्सन मणिक्कम रोडवर एक टेलिमार्केटिंग कपनी उघडली. तो या कंपनीच्या माध्यमातून … Read more

एक किलो प्लास्टिक द्या आणि मोफत जेवण मिळवा

छत्तीसगडच्या सरगुजा (अंबिकापूर) मध्ये प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी वेगळी योजना गांधी जयंतीपासून सुरू होत आहे. या अंतर्गत प्लास्टिक कचरा वेचणाऱ्यांना जेवण-नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ‘गार्बेज कॅफे’ही बनवला जात आहे. अंबिकापूरच्या महापालिकेने शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी या योजनेची एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश शहराला संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त बनवणे हा आहे. ही … Read more

या प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर लिहिली अजब सूचना…वाचून तुम्ही म्हणाल हे तर?

नवी दिल्ली : आजकाल नागरिक चर्चेत येण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. चर्चेत येण्यासाठी एका प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर अजब सूचना लिहिली असून सोशल मीडियावर ही पत्रिका खूप व्हायरल होत आहे. सोशल डिस्कशन वेबसाइट रेडड्ीटवर ही पत्रिका शेअर केली आहे.मात्र, या पत्रिकेवर कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. पाहुण्यांनी लग्नात येण्याची अथवा न येण्याची माहिती योग्य वेळी दिली … Read more

संतापजनक: एक लाखासाठी आईने केली मुलीची विक्री

दिल्ली : दिल्लीच्या बवानामधून एका १५ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. मुलीच्या आईने मागील आठवड्यात मुलीला विकले होते. दिल्ली महिला आयोगाने रविवारी ही माहिती दिली. आयोगानुसार, सुटका करण्यात आलेल्या मुलीने सांगितले की, तिच्या आईने एक वर्षाच्या भावालाही गेल्या महिन्यात तस्करांकडे सोपवून त्या मोबदल्यात पैसे घेतले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने १५ सप्टेंबरला तिला तिच्या … Read more