सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार – पालकमंत्री राम शिंदे

कर्जत : तालुक्यात सुतगिरणी उभारण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील कुळधरण गणातील रुईगव्हाण येथे झालेल्या बैठकीत ना. शिंदे बोलत होते. ना. शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात केेलेल्या विकास कामांचा आढावाच सादर केला. ना. … Read more

ह्या कारणामुळे उदयनराजे यांनी केला भाजप प्रवेश !

सातारा – भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर छ. उदयनराजे भोसले यांच्यावर राष्­ट्रवादी काँग्रेसने टीकास्­त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनींच्या विक्रीसाठी सरकारकडून परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शनिवारी येथे केला. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव होईल, … Read more

८ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पारनेर: तालुक्यातील सुपा येथील जि.प. प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय शाळकरी मुलीवर प्रमोद मच्छिंद्र कदम, वय ३८ रा.सुपा याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिक व महिलांच्या लक्षात ही बाब आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना दि.१३ रोजी घडली. याबाबत सविस्तर असे की, कदम याने तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुरडीस येथील न्यू … Read more

२९ हजार गुंतवणूकदारांचे अडीचशे कोटी अडकले!

चंद्रपूर : दामदुप्पटीचे आमिष दाखवून राज्यभरात गुंतवणूकदारांकडून लाखोंच्या रकमा गोळा करून मैत्र कंपनीने हात गुंडाळले आहे. या कंपनीत जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे तब्बल अडीचशे कोटी रुपये अडून असून, ही रक्कम ग्राहक, अभिकर्ता यांना परत मिळावी यासाठी अभिकर्ता, गुंतवणूकदार १९ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात महामोर्चा काढणार आहे. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार असल्याची माहिती … Read more

ट्रकवर लावला साडे सहा लाखांचा दंड!

भुवनेश्वर : १ सप्टेंबरपासून देशात नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर मोठमोठ्या रकमांचे चलन फाडले जात असल्याचे वृत्त दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत आहे. ओडिसामधील संभलपूर येथे शनिवारी एक नवीन प्रकरण समोर आले असून, वाहतुकीचे नियम तोडल्याच्या कारणावरून नागालँडच्या एका ट्रकमालकाला ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे … Read more

पाकिस्तानचा कांदा खरेदी करणार नाही

नवी दिल्ली : देशातील बाजारात कांदा पुरवण्यासाठी पाकिस्तानचा कांदा खरेदी करणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील बाजारात कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रणासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातून दोन हजार टन कांदा खरेदी करण्याची निविदा जारी केली होती. ही निविदा ५ सप्टेंबरला काढण्यात आली असून २४ सप्टेंबरपर्यंत भरली जाऊ शकते. याव्यतिरिक्त सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्यही ८५० डॉलर … Read more

सरकारी नोकरीत ८२ टक्के आरक्षण !

छत्तीसगड :- राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारने नोकरीतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ८२ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, कोर्टाने सरकारला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने चार सप्टेंबर रोजी एक वटहुकूम जारी केला. ‘छत्तीसगड लोकसेवा (अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय आरक्षण) दुरुस्ती वटहुकूम २०१९’नुसार … Read more

शिवसेनेतर्फे शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीस विरोध !

अहमदनगर ;- शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार असले, तरी त्यांची आजवरची भूमिका ही कायम पक्षविरोधीच राहिली आहे. सर्वच निवडणुकांत आमदार कर्डिले यांनी भाजप-शिवसेने विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे पत्रकाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रकावर माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा … Read more

सत्ता असो अथवा नसो विकासकामे करणारच : सुजित झावरे

पारनेर : सत्ता असो अथवा नसो जनसेवेची कास धरून विकासकामे करीत असतो. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.पारनेर शहरातील पारनेर ते लोणी हवेली रस्ता व मटण मार्केटचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत चेडे हे होते.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष … Read more

तिथे शिकविला जातो ‘चांगला पती’ बनण्याचा अभ्यासक्रम

विद्यापीठांतून व्यावसायिक शिक्षण देणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. काही अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाव्यतिरिक्तही असतात. मात्र जपानच्या ओसाका शहरात इकुमेन विद्यापीठाने हल्लीच जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे, तो बहुधा जगातील एकाही विद्यापीठात घेतला जात नसेल.  या अभ्यासक्रमामध्ये तरुणांना चांगला पती तसेच पिता बनण्याच्या दृष्टीने तयार केले जाते. त्यांना स्वयंपाक करण्यापासून मुलांचे संगोपण करण्यापर्यंत विविध प्रकारचे … Read more

मानवी शरीर मृत्यूनंतरही वर्षभर करते हालचाल !

मानवी शरीर इहलोकीचा निरोप घेतल्यानंतरही जवळपास वर्षभर हालचाल करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या एका शास्त्रज्ञाने सप्रमाण सिद्ध केला आहे. हे संशोधन वैद्यकीय व कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी मोलाचे ठरण्याची शक्यता आहे. एका प्रेताचे जवळपास १७ महिने सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर ॲलिसन विल्सन यांनी मानवी शरीर मृत्यूनंतरही चिरविश्रांती घेत नसल्याचे सिद्ध केले आहे. प्रस्तुत प्रकरणात मृतदेहाजवळ असणारे हात कालांतराने … Read more

साईभक्तांना गंडविणाऱ्या महिलेस पकडले !

शिर्डी : साईबाबांच्या उदी व तीर्थ सेवनाने तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. सर्व दु:ख नाहीसे होईल, अशी भुरळ पाडून भाविकांना गंडा घालणाऱ्या महिलेस भाविकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश मिळाले आहे. भाविकांना फसविण्याच्या नाना तऱ्हेने शिर्डीत ठकसेन फसविताना आजवर अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.  आता हा नव्याने प्रकार पुढे आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.. साईबाबांची महती देश … Read more

कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर कांद्यास २५०० ते ३२०० रुपये भाव मिळाला. तसेच दोन नंबर कांद्यास १६०० ते २४९५, तीन नंबर कांद्यास ५०० … Read more

मुळा धरणातून ३ हजार क्युसेकने पाणी सोडले

राहुरी शहर : मुळा धरणातून नदी पात्रात तीन हजार क्यूसेकने काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. मुळा धरणाचा पाणी साठा २५ हजार ७३८ टीएमसी असून धरणात ३ हजार ४०० क्यूसेकने आवक सुरु असून धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. धरण ९८ टक्के भरले आहे. मुळा उजवा … Read more

राज्यात पुन्हा युतीचे सरकार !

राहुरी : पाच वर्षात सत्तेवर असताना आम्ही केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांमुळेच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे महाजनादेश यात्रेनिमित्त लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात राहुरी फॅक्टरी येथे मुख्यमंत्री बोलत होते. राहुरी फॅक्टरी येथे देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने आमदार चंद्रशेखर कदम … Read more

सोशल मीडिया प्रोफाईल ‘आधार’शी जोडण आवश्यक

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणी करताना फेसबुक, व्हॉट्सॲप, गुगल, यू-ट्यूब आदी समाज माध्यमांवरील सर्वच व्यक्तींचे प्रोफाईल ‘आधार’शी संलग्नित करण्याच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणी मद्रास, मुंबई व मध्य प्रदेश हायकोर्टांत ४ वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. तामिळनाडू सरकारने बोगस बातम्या व दहशतवादाशी संबंधित सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी सोशल … Read more

मुलीची छेडछाड करणाऱ्यास सक्तमजुरी

अहमदनगर : पिडीत मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल.आणेकर यांनी आरोपी रोहन उर्फ राहुल दिगंबर फलके, रा.मठ पिंपरी, ता.जि. अहमदनगर यास सत्र खटल्याच्या निकालाविरूध्द न्यायालयात दाखल केलेल्या अपीलामध्ये भा.द.वि.का.क. ३५४ नुसार दोषी धरून त्यास १ महिना सक्त मजुरी व ५०हजार रू. दंडाची शिक्षा ठोठावली.  सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. एम.व्हि दिवाणे यांनी काम … Read more

कर्जत – जामखेडमध्ये बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही !

जामखेड : ज्या बारामतीकरांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील बळीराजाच्या हक्काचे पाणी येऊ दिले नाही ते पाणी ना.राम शिंदे यांनी आणले. ज्यांनी पाणी आवडले त्यांना थारा देऊ नका. जिल्ह्यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बाहेरचे उसनं नको, आमचं ते आमचचं असत.  कर्जत-जामखेड मतदार संघात बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही. पार्थ पवार पेक्षाही रोहित पवार यांची वाईट परिस्थिती … Read more