हातात पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल !

जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सध्या चांगलीच वाढ झालेली आहे. असे जरी असले म्हणावा तसा अद्यापही पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने विहिरीची पाणी पातळी अजूनही खालावलेली आहे. खरिपाची पिके जोरदार आली होती, मात्र पाण्याअभावी ती सुकू लागली आहेत. त्यामुळे पेरणी केलेला खर्च निघेन की नाही, या चिंतेत शेतकरी आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची वाताहात झाली आहे. … Read more

कांदा कडाडला @ 2600

कोपरगाव : बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे.कांद्याच्या दरात झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या … Read more

दुष्काळामुळे उभी पिके संकटात

नेवासा – दुष्काळ हटलाच नसल्याने कुकाणा परिसरातील उभी पिके पाऊस व पाटपाण्याअभावी संकटात सापडली असून, खरिपाची पिके या आठवड्यात माना टाकू लागली आहेत. पाटबंधारे विभागाने पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्यास उभ्या शेतपिकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सुरू असलेले आवर्तन गांभिर्याने घ्यावे, असे आवाहन कुकाण्यातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग यांनी केले आहे. कुकाण्यासह परिसरातील देवगाव, … Read more

राष्ट्रवादीच्या विजयी आमदारांत अकोलेचे पहिले नाव असेल !

अकोले : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या विजयी आमदारांत अकोले तालुक्याचे पहिले नाव असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.  मंगळवारी दुपारी अकोले शहरात जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यावेळी फाळके बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जि. प. सदस्य … Read more

रोहित निवडणूक लढवतोय त्याला पाठबळ द्या – सुनंदाताई पवार

मिरजगाव : कर्जत – जामखेडमधून रोहित निवडणूक लढत आहे. तुम्ही त्याला आपले पाठबळ द्या. मतदारसंघातील बेरोजगार तरुण व महिला भगिनींना बारामती ॲग्रोच्या माध्यमातून उद्योग उपलब्ध देऊ,विकासाची कामे करताना खरा विकास कसा असतो, तो करून दाखवू , असे, प्रतिपादन बारामती ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.  कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे बारामती ॲग्रोच्या वतीने आयोजित … Read more

सरकारने रिझर्व्ह बँकेवर मारला डल्ला !

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुमारे १.७६ लाख कोटींचा संचित निधी व लाभांश घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आरबीआयवर डल्ला मारल्याने आता काहीच होणार नाही. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे … Read more

राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जामखेड : महाजनादेश यात्रेत सोमवारी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत जामखेडकरांना दिलासा दिला. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे. समुद्रात वाहून जाणारे सुमारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या योजनेच्या माध्यमातून नाशिक, नगर व मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे.  जलसंधारणमंत्री म्हणून पंकजा मुंडे … Read more

ॲमेझॉन किराणा माल विकणार

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतीय बाजारात पाय पसरण्यासाठी, विस्तारासाठी विविध प्रयोग करत आहे. आता त्यांनी रिटेल संबंधित धोरणांनुसार किराणा बाजारात पाय ठेवण्यासाठी तयारी चालवली असून त्यांनी किराणा मालाच्या लाखो दुकानांना आपल्या बरोबर संलग्न करण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या स्तरावर यासाठी योजना असून किराणा स्टोअर्सशी ते समझोता करणार आहेत, त्यामुळे या मंचाद्वारे … Read more

मुंबईत शिक्षकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमारचा निषेध

अहमदनगर :- मुंबई येथील आझाद मैदानावर न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या शिक्षकांवर पोलीसांनी अमानुष लाठीमार करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तर आंदोलन करणार्‍या शिक्षकांच्या मागण्या मान्य करुन संबंधीत पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिक्षक परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याची … Read more

पारनेरच्या पारंपरिक प्रस्थापित राजकीय सत्ता केंद्राचा निलेश लंके’ना विरोध का ?

पारनेर :- तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर सध्यस्थितीला घोंगवणारे वादळ म्हटले तर कोणीही डोळेझाकून नाव घेत ते म्हणजे लोकनेते निलेश लंके यांचे सामजिक कामाच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण तालुक्यात आपली लोकनेता म्हणून ओळख निर्माण केली. कोणतीही राजकिय सामजिक पार्श्वभूमी नसूनही,समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामजिक भावना मनात ठेवून लोकनेते निलेश लंके सारख्या अवलियाने पारनेर तालुक्यात जे सामजिक … Read more

‘त्या’ योजनेतून बाळासाहेब ठाकरेंचे नाव कुणी वगळले?

श्रीरामपूर :- एसटी महामंडळाने बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने अपघात सहाय्यता निधी योजना सुुरू केली. मात्र, विश्वस्त संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करताना वेगळ्या नावाने नोंदणी केली. नाव कसे व कोणी बदलले याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केली. पत्रकात म्हटले आहे, १ एप्रिल २०१६ पासून अपघात घडल्यास मृताच्या वारसांना १० लाख … Read more

…तर पाणीप्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू

पाथर्डी :- तालुक्याचा पूर्व भाग व बोधेगाव परिसराला मुळेचे पाणी द्यावे, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी निधीसह योजना मंजूर करून घ्यावी; अन्यथा राजकीय फायद्यासाठी लोकांना नादी लावण्याचा प्रकार समजून याचा जाब विचारू, असे जलक्रांती जनआंदोलनाचे संस्थापक दत्ता बडे यांनी सांगितले. निवेदनात म्हटले आहे, भालगाव, लाडजळगाव, बोधेगाव, टाकळीमानूर, वडगाव, चिंचपूर, … Read more

माजी आमदार अनिल राठोड पुन्हा अस्वस्थ

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली. या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता. आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय … Read more

राष्ट्रवादीने काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत !

पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली. महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 15 हजारांची लाच घेताना अधिकारी जाळ्यात

अहमदनगर :- जात पडताळणी समिती कार्यालयात लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून एकाला 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले अविनाश विश्वनाथ मगर असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीचे ओ.बी.सी. कुणबी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्राचे काम करून देवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आरोपी लोकसेवक अविनाश विश्वनाथ मगर, विधी अधिकारी,जिल्हा जाती प्रमाणपत्र … Read more

१ लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ

लोणी – राहाता तालुक्यातील दुर्गापूर चारी नं. ११ दाढ रोड परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. वैशाली गणेश पुलाटे, वय २७ हिला नवरा, सासू, सासरा व सासरच्या लोकांनी संगनमत करुन माहेरुन गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशाची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली.  तसेच तिला उपाशीपोटी ठेवून शारीरिक व … Read more

भांडणाचा जाब विचारल्याने धारदार शस्राने डोक्यात वार

नगर – नगर परिसरात वडगाव ते पिंपळगाव माळवी, शेंडी बायपास रस्त्यावर काल ९.३० च्या सुमारास स्पीडब्रेकरजवळ भांडण चालू होते.  ट्रक चालकाला पल्सरवरील आरोपी मारहाण करीत होते. तेव्हा भांडण पाहून थांबलेले शिवनाथ संपत शेवाळे, वय ३२ रा. वडगाव गुप्ता या तरुणाने तुम्ही ट्रक ड्रायव्हरला का मारता?  असा प्रश्न केला तेव्हा आरोपींना राग येवून त्यांनी धारदार शस्राने … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. कविता सागर गांगुर्डे, वय २५ वर्ष ह्या तरुणीने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी चारित्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करायचे, कविता हिने माहेरुन मोटारसायकलचे हप्ते फेडण्यासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करत त्रास दिला होता. … Read more