हातात पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सध्या चांगलीच वाढ झालेली आहे. असे जरी असले म्हणावा तसा अद्यापही पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने विहिरीची पाणी पातळी अजूनही खालावलेली आहे.

खरिपाची पिके जोरदार आली होती, मात्र पाण्याअभावी ती सुकू लागली आहेत. त्यामुळे पेरणी केलेला खर्च निघेन की नाही, या चिंतेत शेतकरी आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची वाताहात झाली आहे. सध्या पावसाचा थेट परिणाम हा भाजीपाल्यावर झालेला दिसून येत आहे. 

सध्या बाजार समितीत बाजारात भाज्यांची आवक स्थिर असल्याने भाज्यांचे दर कमी जास्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अजूनही काही जनावरांसाठी २५७ छावण्या सुरू असून, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आठशेच्या आसपास आहे.

ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने आता करायचे काय असा सर्वात मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही भागात थोडाफार पाऊस झाला. मात्र तेवढ्या पावसाने पाणी पातळीत किंचीतही वाढ झाली नाही. परिणामी पावसाळा सुरू होऊन देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.

दररोज आकाशात ढग जमा होतात. मात्र पाऊस न पडताच ते निघून जातात. रोज आकाशातील हा पाठशिवीचा खेळ पाहून आता शेतकऱ्यांच्या तर तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांनी जून महिन्यात झालेल्या पावसावर खरिपाची पेरणी केली. उगवनही चांगली झाली.

काही भाग मात्र अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण भागात अनेक विहिरी, कूपनलिका, प्रादेशिक पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेठाक आहेत. पाऊस लांबल्याने शेतमालाच्या आवकेवर प्रचंड दुरगामी परिणाम झाले आहेत. 

पालेभाज्यांच्या आवकेवर देखील चांगलाच परिणाम झाला आहे. कारण यापूर्वी बाजार समितीत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक होत असे, त्यामुळे शहरात भाज्यांचे दर देखील काही अंशी कमी अधिक होत असत.

सध्या बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक या पालेभाज्या तर वांगी, कारले, दोडके, घोसाळे, दुधी भोपळे, टोमॅटो, भेंडी, गवार, शेवगा, हिरवी मिरची, बटाटा, घेवडा, तोंडले, शेवगा आदी भाज्या मिळत आहेत. 

मात्र अनेक भाज्यांचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो या दराने विकले जात आहेत. बाजार समितीत मिळालेले बाजारभाव : पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ५०० – १५००, वांगी ३०००- ६०००, फ्लावर १००० – ५०००, कोबी १००० -२०००, काकडी ५०० – १५००, गवार ४००० – ८०००, घोसाळे २००० – ३०००, दोडका २००० – ३५००, कारले २००० – ३५००, भेंडी १००० – ३५००, वाल २००० – ४०००, घेवडा २००० – ४०००, तोंडुळे २००० – ३०००, बटाटे ७०० – ११००, लसूण ५००० – १०,०००, हिरवी मिरची २००० – ४०००, शेवगा ४००० – ६०००, भू.शेंग ३५०० – ५५००, लिंबू १०००- ३५००, आद्रक ७००० – ९०००, दु.भोपळा ४००- १०००, मका कणसे १०००. १८००, शिमला मिरची १००० – २०००, मेथी ५०० – १४००, कोथिंबीर २०० – ८००, पालक ४०० – ९००, करडी भाजी ३०० – ५००, शेपूृ भाजी ४००- ८००, चवळी २००० – ४०००, वाटाणा ३००० – ६०००.डांगर ८००. १०००.

Leave a Comment