7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये महागाई भत्ता 50% झाल्यानंतर तो शून्य होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनात ऍड केली जाईल असे म्हटले जात आहे. यामुळे खरंच असा निर्णय होणार का हा मोठा सवाल आहे.
अशातच मात्र, AICPI च्या निर्देशांकाची आकडेवारी अपडेट झाली नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची संभ्रमावस्था आणखी वाढली आहे. यामुळे खरंच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार का ? हा सवाल आहे.
पण याबाबत आत्तापासूनच काहीच सांगितले जाऊ शकत नाही. कारण की, याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत स्रोताकडून काहीही सांगितले गेलेले नाही. पण DA शून्य होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
मात्र अशातच फेब्रुवारीमध्ये जी एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारी जाहीर झाली पाहिजें होती ती आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही, यामुळे याबाबत आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. लेबर ब्युरोने एआयसीपीआयचा डेटा शेअर केलेला नाही. 28 मार्च रोजी महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर होणार होती.
परंतु, अजून ही आकडेवारी समोर येऊ शकलेली नाही. यामुळे लेबर ब्युरो DA शून्य होणार म्हणून आकडेवारी जारी करत नाहीये की DA 50% च्या पुढे वाढतच राहील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
AICPI निर्देशांकाच्या ताज्या डेटामध्ये, निर्देशांक क्रमांक 138.9 अंकांवर पोहोचला आहे. यानुसार महागाई भत्ता 50.84 टक्के झाला आहे. हा डेटा जानेवारी 2024 साठी जारी करण्यात आला.
परंतु, लेबर ब्युरो शीटमध्ये फेब्रुवारीचा डेटा अद्याप अपडेट झालेला नाहीये. मात्र असे असले तरी आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता यावेळी देखील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढू शकतो असा दावा होत आहे.
पण, महागाई भत्ता 54% होईल की महागाई भत्ता शून्य करून मग तो 4% केला जाईल या सर्व गोष्टी नजीकच्या भविष्यात स्पष्ट होऊ शकणार आहेत. याबाबत आत्तापासूनच कयास बांधला जाऊ शकत नाही. मात्र काही तज्ञांनी महागाई भत्ता हा शून्य होणार नसून महागाई भत्ता पुढे वाढतच राहणार आहे असे म्हटले आहे.