घर खरेदीदारांचा मनस्ताप संपणार ! जाणून घ्या पार्किंगचा नवा नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई गृहनिर्माण सोसायटीमध्ये घर खरेदी केले, तरी पार्किंगचा यक्षप्रश्न मात्र कायम असतो. केवळ सार्वजनिक ठिकाणीच नाही तर निवासी सोसायट्यांमध्येदेखील हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पार्किंगच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

प्रसंगी हाणामाऱ्याही झाल्या आहेत. खरेदी केलेल्या किंवा वाटप केलेल्या पार्किंगवरून उद्भवणाऱ्या वादांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) विकासकांवर काही निबंध घातले आहेत.

त्यानुसार आता सदनिकेच्या नोंदणीनंतर विकासकाला विक्री करारासह पार्किंगशी संबंधित सर्व तपशील, वाटपपत्र घर खरेदीदाराला उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.

पार्किंगसंदभांत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दाखल घेत महारेराने इमारतीतील लांबी, रुंदी, उंची, पार्किंग क्रमांक, वास्तविक पार्किंगची जागा या सर्व गोष्टींसाठी स्पष्ट आदेश जारी केला आहे. कव्हर पार्किंग, गॅरेज, ओपन पार्किंग आणि यांत्रिक पार्किंगसाठी नवीन नियम जारी केला आहे.

सदनिकांच्या नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या करारपत्रामध्ये पार्किंगबाबतची माहिती देणे बंधनकारक असेल. या करारपत्रात तसेच तपशिलात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, वासाठी महारेराने जोडपत्राचा मसुदा जारी केला आहे.

डिसेंबर २२ मध्ये महारेराने जारी केलेल्या प्रमाणित विक्री करारात दोष दायित्व कालावधी माणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आणि हस्तांतरण करार आआदी बाबी प्रत्येक विक्री करारात बंधनकारक केलेल्या आहेत.

याबाबत घर खरेदीदाराच्या संमतीने कोणतेही बदल केलेले असले तरी ते महारेराला मान्य होणार नाहीत, असे महारेराने जाहीर केले आहे.

विकासकाला आता या गोष्टी कराव्या लागणार

■ पार्किंगशी संबंधित सर्व तपशील लिखित स्वरूपात द्यावे लागतील.

■हे वाटप यत्र विक्री करारासह द्यावे लागेल,

■वाहनतळ क्रमांक, लांबी, उंची, रुंदी नमूद करावी लागेल.

■पार्किंग ब्लॉकच्या ठिकाणाचा तपशीलही द्यावा लागेल.

■अच्छादित पार्किंग, गॅरेज, खुले पार्किंग अशा वर्गवारीनुसार करारपत्र बंधनकारक