निष्ठावंत भाजप कार्यकर्ते डॉ. सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर.

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.  डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली.  या पार्श्वभूमीवर गांधी यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष … Read more

…तर आ.जगताप आणि आ.कांबळे यांना द्यावा लागणार आमदारकीचा राजीनामा !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप व व श्रीरामपुरचे आ. भाऊसाहेब कांबळे हे दोन विद्यमान आमदार निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना निकालानंतर पंधरा दिवसात ‘खासदार’ किंवा ‘आमदार’ यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.  नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे विद्यमान … Read more

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले.  जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.  नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: … Read more

माजीमंत्री पाचपुतेंचे कुकडीच्या आवर्तनासाठी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांना साकडे.

श्रीगोंदा :- सध्या दुष्कळाची धग वाढत आहे. या परिस्थितीत शेतकरी टिकला पाहिजे, यासाठी कुकडी आवर्तन अत्यंत महत्वाचा घटक ठरू शकतो. मात्र फळबागा जळण्यापूर्वीच पाणी सुटले पाहिजे. कुकडीचे आवर्तन लवकर न सुटल्यास अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व गोष्टींचा विचार करता दि.१ एप्रिल पासून कुकडीचे आवर्तन सोडावे. अशी आग्रही मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी … Read more

काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे !

अहमदनगर :- जे काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे, असे म्हणत जे उडाले ते कावळे, असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी विखे यांना लगावला. जे सोडून गेले त्यांच्यामुळे नवीन लोकांचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुषार गार्डन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी … Read more

श्रीगोंद्यात भीषण अपघातात दोघे ठार

श्रीगोदें :- तालुक्यातील औटेवाडीजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चारी नं. १२ येथे स्विफ्ट व हायवाची समोरासमोर टक्कर होऊन दोन जण जागीच ठार झाले. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची स्थिती चिंताजनक आहे. श्रीगोंदे-कर्जत रस्त्यावर असलेल्या लहानशा पुलावर ही दुर्घटना झाली. श्रीगोंद्याहून स्विफ्ट (एमएच १२ जीएफ … Read more

सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार !

अहमदनगर :- नगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान आज खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजवर पक्षाशी … Read more

जावयाची सासुरवाडीला जाऊन आत्महत्या.

अकोले :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुतोडी येथील राजेंद्र देवराम आहेर (वय २७) या तरुणाने गुरुवार दिनांक २१ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. राजूर येथे त्याच्या सासुरवाडीला तो पत्नीला आणायला गेला होता. त्यास नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजेंद्र आहेर … Read more

छिंदम बंधूंसह ३५० जण तडीपार !

अहमदनगर :- शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुमारे ३६० जणांवर शहरातून तीन दिवसांसाठी तडीपारीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेना, भाजपचे माजी नगरसेवक, हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व दंगलीतील काही आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, राठोड यांनी तहसीलदारांकडे राजपत्रित अधिकाऱ्यांचे ५० हजारांचे हमीपत्र सादर करुन अटी-शर्तींवर शहरात राहण्याची मुभा मिळवली … Read more

सुजय विखेंचा बंदोबस्त आपण करू – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- मी जर प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष दिलेे असते, तर गाडी राहुरीच्या पुढेच आली नसती. बरं आता आलीच आहे, तर परत पाठवून दण्याचे काम संग्राम जगताप करणार आहे. गाडी कोणत्याही बॅगा घेऊन येऊ द्या, त्याचाही बंदोबस्त आपण करू, असा टोला राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता … Read more

सोमवारी शरद पवार नगरमध्ये.

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते शरद पवार सोमवारी (२५ मार्च) सायंकाळी नगरला मुक्कामी येत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्यासमेवत असतील. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जो आत्मविश्वास उंचावला आहे, तो खरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे वळसे म्हणाले. समन्वय समितीची बैठक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समन्वय समितीची बैठक होईल. आघाडीच्या … Read more

खासदार.दिलीप गांधी उद्या भूमिका जाहीर करणार.

नगर | विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी रविवारी (२४ मार्च) मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र हे सध्या ग्रामीण भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देण्यात मग्न आहेत. खासदार गांधी यांनी शेवटपर्यंत … Read more

कंटेनर – दुचाकीच्या धडकेत महिला ठार.

काेपरगाव | नगर-मनमाड रस्त्यावर एमपी सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर कंटेनर व दुचाकीची धडक होऊन महिला ठार झाली. कावेरी विठ्ठल जाधव (२६, राहुरी) असे या महिलेचे नाव आहे. दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कावेरी जाधव या वडील व मुलगा सार्थक यांच्यासह मनमाड येथील लग्न समारंभ आटोपून राहुरी तालुक्यातील शेण … Read more

डॉ.सुजय विखे पाटील याना भाजपची उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे.अहमदनगर मधून डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप च्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार नंदुरबार – हीना गावितधुळे – सुभाष भामरेरावेर- रक्षा खडसेअकोला – संजय … Read more

गडाखांच्या घराची झाडाझडती निषेधासाठी एकवटले नगरकर

अहमदनगर – नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनिय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर एकवटले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देत चौकशीची मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळी … Read more

चौघांकडून डॉक्टरांची ५५ लाखांची फसवणूक

संगमनेर : आयुर्विम्याचा चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवत येथील वैद्यकीय व्यावसायिकाला चार ठगांनी ५५ लाखांना गंडा घातला. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेता वर्मा, निधी गुप्ता, नरेंद्र मौर्या आणि विकास (पूर्ण नाव माहिती नाही) अशी आराेपींची नावे आहेत. अर्जुन भागुजी ठुबे (वय ५८, साकूर, संगमनेर) असे … Read more

ग्रामसेवक, सरपंचावर अपहाराचा गुन्हा

कोपरगाव:  वेळापूर येथील ग्रामसेवक व सरपंचाने संगनमताने शासनाच्या योजनेतील २ लाख ३२ हजारांची पाण्याची टाकी न बांधता केवळ १ लाखात काम करुन १ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  चौदाव्या वित्त आयोगाच्या २ लाख ३२ हजारांतून शिंदेवस्ती वेळापूर येथे पाण्याची टाकी बांधायची होती. कोणतेही काम न करता ग्रामसेवक विनोद गिरीधर … Read more

मतदारसंघाबाहेरील सुजय विखेंचे ‘पार्सल’ परत पाठवा

कर्जत : मतदारसंघाबाहेरील डाॅ. सुजय विखेंचे पार्सल परत पाठवा. आरोग्य शिबिराच्या नावाखाली विखे खर्च करत असलेले पैसे जनतेचे व सरकारचे आहेत, त्यांचे स्वतचे नाहीत, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले.  डाॅ. विखेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर येथील भाग्यतारा मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेसची बैठक झाली. या वेळी बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, … Read more