राजकारण

सुजय विखेंचे अजित पवारांशी पुण्यात मनोमिलन ! निलेश लंकेंना धूळ चारण्याचा निश्चय? मोठ्या हालचाली..

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेच्या जागेचा थरार आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे खा. सुजय विखे यांनी विखे पॅटर्न राबवत सर्वाना सोबत घेत निवडणुकीबाबत कंबर कसण्यास सुरवात केली आहे.

तर त्यांना प्रतिस्पर्धी शरद पवार गटाकडून आ. निलेश लंके असतील असे जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांना घेरण्यासाठी विखे यांनी देखील राजकीय रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेत आगामी लोकसभेबाबत चर्चा केली.

निलेश लंके यांना रोखण्यासाठी ही भेट महत्वाची मनाली जात असून आता अजित दादा विखे पाटील यांची साथ देत निलेश लंके याना धूळ चारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विखे – पवार मनोमिलन?

विखे पाटील व पवार घराणे यांत असणारे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यांच्यातून कधी विस्तव देखील जात नाही असे म्हटले जाते. परंतु बदलत्या राजकारणानुसार आता ज्युनिअर विखे व छोटे पवार साहेब यांचे मनोमिलन होणार का अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. अजित पवार यांची निलेश लंके यांनी साथ सोडल्यानंतर खा. सुजय विखे पाटील यांनी अजित दादांची घेतलेली ही भेट नगर दक्षिण मतदारसंघासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पवार आणि विखे कुटुंबात सर्वश्रुत असणारा वाद असतानाही आता पुढच्या पिढीची ही भेटगाठ नवीन राजकीय समीकरणे जोडणार का याची चर्चा सध्या रंगली आहे.

 अजित पवार सभा घेतील ?

अजित पवार यांची साथ सोडत जर आ. निलेश लंके यांनी जर शरद पवार गटातून अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवली तर अजित पवार लंके यांना शह देण्यासाठी अहमदनगरमध्ये एक ते दोन सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आ. लंके यांच्या भूमिकेकडे लक्ष

आ. निलेश लंके यांनी सध्या कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. शरद पवार गटातही त्यांनी अद्याप प्रवेश केला नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा अजित दादांनी दिल्यानंतर व आता खा. विखे यांनी घेतलेली अजित पवार यांची भेट यामुळे आता आ. निलेश लंके आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागेलेले आहे.

हे पण वाचा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts