Ahmednagar Politics : अजित दादांच्या धमकीनंतर गणिते जुळेनात ! निलेश लंके पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी खा. सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. परंतु येथे शरद पवार गटाकडून निलेश लंके हेच उमेदवार असतील असे म्हटले जात आहे. मैदान कोणतेही असू द्यावे खेळाडू फिक्स आहे असेही लंके यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. नुकत्याच झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आ. लंके हे शरद पवार गटात जातील असे वाटत असतानाच त्यांनी सर्वानाच संभ्रमित करत हा पक्षप्रवेश टाळला.

आज मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते याची जाणीव निलेश लंके यांना अजित पवार यांनी करून दिल्यानंतर त्यांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या भेटीला जात चर्चा केली आहे. याचे बैठकीत अंतिम निर्णय होईल असे म्हटले जात आहे.

लवकरच उमेदवारी जाहीर
निलेश लंके याना अहमदनगर लोकसभेची उमेदवारी मिळेल असे संकेत अनेक दिवसांपासून मिळत असतानाच स्वतः लंके यांनी देखील त्या दृष्टीने बरीच पावले टाकत बरेच पुढे ते आले आहेत. परंतु काही तांत्रिक अडचणी लक्षात घेता उमेदवारी जाहीर झाली नसली तरी आज यावर काहीतरी निर्णय होऊन येत्या दोन दिवसांत लंके यांना किंवा शरद पवार गटाला उमेदवारीसंदर्भात निर्णय जाहीर करावा लागेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

अजित पवार यांच्या धमकीवजा इशाऱ्याची निलेश लंके यांना भीती
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके जे अजित पवार यांच्यासह सत्तेत गेले. सत्तेत जात त्यांनी विविध विकासकामांसाठी भरपूर निधीही त्यांनी आणला. अजित पवार यांनीही त्यांना विश्वासू म्हणत त्यांना भरपूर निधी दिला. परंतु सध्या आ. लंके यांना खासदारकीची इच्छा असून त्यासाठी त्यांना शरद पवार गटात जाणे गरजेचे आहे.

मात्र जर पक्षांतर करायचे झाले तर त्यांना प्रथमत: आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल नाहीतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते असा धमकीवजा इशाराच त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने ते आता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले असून चर्चेअंती काय निर्णय होती हे पाहणे गरजेचे आहे.