अहमदनगर ब्रेकिंग : सुजय विखे यांना ईव्हीएम वर संशय; चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज

पराभवानंतर मात्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे व आता सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे व त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.

Published on -

नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या व 4 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. आपण जर या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण किंवा एकंदरीत निकाल पाहिला तर यामध्ये महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक हे संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली. केंद्रामध्ये जरी एनडीएचे सरकार स्थापन झाले, मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चारीमुंड्या चित करत आपली ताकद दाखवून दिली.

महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांची विशेष चर्चा झाली यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये लक्ष वेधून घेणारा ठरला. अहमदनगर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ म्हणून समजले जाणारे विखे कुटुंबातील भाजपचे खासदार असलेले डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली.

संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभा निवडणुकीकडे होते व निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा तब्बल 29 हजार 317 मतांनी पराभव केला. एक अर्थाने निलेश लंके यांनी विखे कुटुंबाचे एक राजकीय प्रस्थालाच धक्का दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

परंतु आता या झालेल्या पराभवानंतर मात्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे व आता सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे व त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.

डॉ. सुजय विखे यांनी केली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशीची मागणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे व यामध्ये जवळपास 10 उमेदवारांचा जवळपास समावेश आहे. या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशीची मागणी केलेली आहे.

याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलेले असून त्या वृत्तानुसार या संबंधीची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे एकूण दहा अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यातील बहुतेक उमेदवारांनी एक ते तीन ईव्हीएम युनिटची पडताळणी करावी अशी मागणी केलेली आहे.

परंतु काहींनी मात्र यापेक्षा जास्त युनिटची चौकशी करावी अशा पद्धतीचे मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीन करिता चाळीस हजार रुपये आणि त्यावर 18% जीएसटी भरावा लागणार आहे. सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

डॉ. सुजय विखेशिवाय या नेत्यांनी केली आहे चौकशीची मागणी
डॉ. सुजय विखेंशिवाय ओडिसातील झारसुगुडा येथील बिजू जनता दलाचे उमेदवार दिपाली दास यांनी देखील अशाच पद्धतीचे मागणी केलेली आहे. भाजपचे टंकघर त्रिपाठी यांनी त्यांचा 1265 मतांनी पराभव केलेला आहे. दिपाली दास या झारसूगुडा या लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत. दिपाली दास यांनी जवळपास डझनभर ईव्हीएम व्हीव्हीपीएटी मशीनच्या चौकशीची मागणी केलेली आहे.

याबद्दल त्यांचा आक्षेप आहे की मतमोजणी मध्ये ज्या काही फेऱ्या होत्या त्यातील 19 फेऱ्यांपैकी त्या सतराव्या फेरीपर्यंत आघाडीवर होत्या मात्र त्यानंतर झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये अचानक मताधिक्यामध्ये मागे पडल्या. त्यामुळे त्यांना ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे असा संशय आहे व त्याकरता त्यांनी ही मागणी केलेली आहे.

हे पण वाचा : 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe