Chennai Surat Greenfield Expressway : या चालू वर्षात देशातील एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील रंगणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत.
यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. हा महामार्ग केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित केला जाणार आहे. हा महामार्ग सुरत आणि चेन्नई या दोन औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडणार असून महाराष्ट्रातील नासिक अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून हा मार्ग प्रस्तावित आहे.

यामुळे राज्यातील नासिक अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना लाभणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून राज्याचा कृषी क्षेत्रात, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात देखील विकास साध्य होणार आहे. दरम्यान या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला आता गती लाभत आहे.
या मार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यात भूसंपादन करावे लागणार असून सद्यस्थितीला मात्र चार तालुक्यात भूसंपादनासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. पेठ आणि सुरगाणा या दोन तालुक्यात भूसंपादनासाठी पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने त्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया नंतर राबवली जाणार आहे. पण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, नाशिक आणि निफाड या चार तालुक्यात मार्च अखेर भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यातील एकूण 69 गावांमध्ये हा मार्ग प्रस्तावित असून यासाठी या गावातील 996 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर नासिक आणि सुरत या दोन शहरादरम्यानचे अंतर अवघे 176 किलोमीटरवर येणार असून मात्र दोन तासात या दोन शहरा दरम्यान प्रवास करता येणार आहे.
हैदराबाद येथील आर्वी असोसिएटस आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला या ग्रीनफिल्ड कॉरिडोरचे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. दरम्यान आता मार्च अखेर भूसंपादनाचे काम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, नासिक, आणि निफाड या चार तालुक्यात भूसंपादन होणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना उचित मोबदला देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
‘या’ गावात होणार मार्चअखेर भूसंपादन
दिंडोरी तालुक्यातील : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहुर या गावात भूसंपादन होणार आहे.
पेठ तालुक्यातील :- पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव या गावात भूसंपादन मार्च अखेर पूर्ण केला जाणार आहे.
नाशिक तालुक्यातील : आडगाव, ओढा, विंचुरगवळी, लाखलगाव या गावात भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे.
निफाड तालुक्यातील :- चेहडी खुर्द, चाटोरी, वरहे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी या गावात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
सिन्नर तालुक्यातील :- देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागावपिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी या गावात भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे.