सुप्रीमकोर्टचा ऐतिहासिक निर्णय ! आर्थिक दुर्बल घटकांना (EWS) 10% आरक्षण लीगल ; EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी असा करा अर्ज ; अर्ज करण्याची प्रोसेस, पात्रता जाणून घ्या

Ajay Patil
Published:
ews certificate

EWS Certificate : मित्रांनो 7 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल देत आर्थिक दुर्बल घटकांना दिलेले दहा टक्के आरक्षण वैध असल्याचा निवाडा दिला आहे. अशा परिस्थितीत आता ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण कायम राहणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर आर्थिक दुर्बल घटकांना दिल जाणार आरक्षण ओपन कॅटेगिरीसाठी राहणार असून एन टी, एस सी, एस टी यांसारख्या प्रवर्गाला हे आरक्षण लागू राहणार नाही. म्हणजेच ज्यांना आधीच आरक्षणाचा लाभ मिळतो अशा गटाला आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत मिळणारे दहा टक्के आरक्षण लागू राहणार नाही.

मात्र जे ओपन कॅटेगिरी मध्ये येतात त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता ओपन कॅटेगिरी मध्ये मुडणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये, शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशासाठी दहा टक्के एवढ आरक्षण राहणार आहे. निश्चितच यामुळे ओपन प्रवर्गातील इकॉनोमिकली विकर सेक्शन मध्ये मोडणाऱ्या उमेदवारांना लाभ मिळणार आहे.

अशा परिस्थितीत जे ओपन प्रवर्गात येतात आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडतात त्यांना दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र धारण करणे अपरिहार्य राहणार आहे. त्यामुळे आज आपण ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र कसे काढायचे? यासाठी आवश्यक पात्रता काय? याची प्रोसेस नेमकी कशी? यासाठी किती शुल्क लागतो? याविषयीची सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ईडब्ल्यूएस म्हणजे नेमक काय बर?

मित्रांनो ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे असे कुटुंब ईडब्ल्यूएस अंतर्गत येणार आहे. अशा कुटुंबांना दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींना शिक्षणामध्ये तसेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळू शकणार आहे. मात्र इडब्ल्यूएस किंवा आर्थिक दुर्बल घटकमध्ये एस सी कॅटेगिरी, एसटी कॅटेगिरी आणि एनटी कॅटेगरी मध्ये येणाऱ्या लोकांचा समावेश राहणार नाही. थोडक्यात ओपन कॅटेगिरी मध्ये मुडणाऱ्या लोकांना याद्वारे आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रता नेमक्या कोणत्या

  • ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना ईडब्ल्यूएससाठी पात्र समजलं जाणार आहे.
  • तसेच ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पाच एकर पेक्षा अधिक शेत जमीन नसावी.
  • EWS आरक्षण घेण्यासाठी 1 हजार चौरस फूट पेक्षा अधिक घराचे क्षेत्र नसावे. महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीचे 900 चौरस फुट पेक्षा अधिक घराचे क्षेत्र नसावे. ग्रामीण भागात 1800 चौरस फूट पेक्षा अधिक घराचे क्षेत्र नसावे.

ईडब्ल्यूएस अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ईडब्ल्यूएस अंतर्गत जे आरक्षण दिले जाणार आहे त्यासाठी ईडब्लूएस प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. म्हणजेच मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या त्यांना ज्या पद्धतीने जातीचा दाखला किंवा प्रमाणपत्र आवश्यक असतं त्याच पद्धतीने ईडब्लूएस अंतर्गत येणाऱ्या लोकांना देखील प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती बर

  • प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदार व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड आवश्यक राहणार आहे.
  • तसेच अर्जदार व त्यांच्या वडिलांची TC लागणार आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाची शिधापत्रिका.
  • अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र.
  • अर्जदाराच्या उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, 8अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा) इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.
  • अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा देखील प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहे.
  • ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वघोषणा पत्र.
  • विहित नमुन्यातील अर्ज देखील भरावा लागणार आहे.
  • 3 पासपोर्ट आकारांचे फोटो लागणार आहेत.
  • ही सर्व कागदपत्रे खरी असल्याच घोषणापत्र देखील प्रमाणपत्र काढताना जोडावे लागणार आहे.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया 

  • मित्रांनो ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदाराला सेतू कार्यालयातून वीस रुपये शुल्काचा अर्ज घ्यावा लागणार आहे. सदर अर्ज व्यवस्थित रित्या भरावा लागणार आहे.
  • यानंतर अर्जदाराला तलाठी कार्यालयात जाऊन आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तीन साक्षीदारांचे पुरावे, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
  • यानंतर तलाठी कार्यालयातून पडताळणी केलेली कागदपत्रे आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अर्ज घेऊन सेतू कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. यासाठी 25 रुपये शुल्क आकारला जाऊ शकतो.
  • ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी अर्जदार स्वतः उपस्थित असणे आवश्यक असते. अर्ज सेतू कार्यालयात जमा झाल्यानंतर सात दिवसांनी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सदर अर्जदाराला मिळू शकते. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराला सेतू कार्यालयात जावे लागते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe