Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल करण्यात आला आहे. आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे. वास्तविक पूर्वीची योजना ही अपघात विमा योजना होती.
जुन्या योजनेनुसार कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपघात विमा मंजूर होत होता. मात्र अनेकदा कंपनीकडून विमा देताना दावे वेळेत मंजूर न करणे, उगाच त्रुटी काढून दावे नाकारण्याचे प्रकार होत असल्याचा प्रकार समोर आला होता.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ मार्गांवर विकसित होणार तीन मजली उड्डाणपुल; पहा काय आहे प्लॅन
यामुळे कृषी विभागाकडून या योजनेत बदल करण्याची मागणी केली जात होती. यानुसार शिंदे फडणवीस सरकारने पूर्वीची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बंद केली आहे. आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे.
या योजनेची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान आता या योजनेची अंमलबजावणी 19 एप्रिल 2023 पासून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीयाची ही एक भेटच समजली जात आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! दूरदर्शन मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार तब्बल 40 हजार पार, वाचा सविस्तर