Farmer Scheme: खरीप हंगामासाठी सरकारच्या ‘या’ योजना शेतकऱ्यांसाठी आहेत खास! अशाप्रकारे घ्यावा लाभ

Ajay Patil
Published:
farmer scheme

Farmer Scheme:- कृषी क्षेत्राचा विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना करण्यात येते.

तसेच काही योजनांच्या माध्यमातून जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना जर आर्थिक फटका बसला तर  शेतकऱ्यांना आर्थिक मदत या योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असते.सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रामध्ये मान्सूनने देखील चांगली हजेरी लावली असून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस होऊन खरिपांच्या पेरण्यांना वेग आल्याचे चित्र आहे.

परंतु शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या अशा काही योजना आहेत ज्या प्रामुख्याने खरीप हंगामासाठी उपयोगी पडतील. नेमक्या या योजना कोणत्या आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या आहेत या योजना

1- पंतप्रधान पिक विमा योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची अशी योजना आहे. नैसर्गिक आपत्ती जसे की अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच वादळी वारे किंवा गारपिट यासारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे जर शेतीपिकांचे नुकसान झाले तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते.

या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे असेल तर फक्त एक रुपया भरावा लागतो व स्वतःचे नाव नोंदणी करावी लागते. उर्वरित रक्कम ही केंद्र शासनाच्या माध्यमातून भरली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या आधार कार्ड, सातबारा उतारा तसेच बँक पासबुक झेरॉक्स, पिक पेरणी स्वयंघोषणापत्र देऊन आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेले आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नाव नोंदणी करावी लागते.

2- कृषी यांत्रिकीकरण योजना शेती क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर प्रामुख्याने वाढला असून शेतकऱ्यांना यंत्रांच्या वापराकरिता प्रोत्साहित करण्यासाठी राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेले यंत्रे जसे की पावर टिलर, ट्रॅक्टरचलीत अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन संचाकरिता अनुदान तसेच शेडनेट व पॉलिहाऊस इत्यादी गोष्टींकरिता अनुदान मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करता येतो.

3- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व पिकांच्या रचनेत बदल करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेत 100 टक्के अनुदान देण्यात येते. महाराष्ट्रातील जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकत नाही असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचे अर्ज देखील सुरू झाले असून शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करता येतो.

4- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही देखील एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड, फळबाग लागवड तसेच नाडेप कंपोस्ट युनिट व गांडूळ खत युनिट इत्यादी करिता आर्थिक सहाय्य दिले जाते.

5- अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके जसे की (भात, कडधान्य, भरडधान्य( मका), पौष्टिक तृणधान्य आणि TRFA कडधान्य) या पिकांचे पीक प्रात्यक्षिके या योजनेअंतर्गत राबवली जातात. शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनमान उंचावणे हा अन्न आणि पोषण सुरक्षा योजनेचा प्रमुख हेतू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe