New Pension Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांंकरिता यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून यापूर्वीची सरकारने 2004 पासून सुरू केलेली जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस बंद करण्यात आली आहे व नवीन पेन्शन योजना त्या जागी सुरू करण्यात आली होती. परंतु सरकारने जेव्हापासून यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा केली.तेव्हापासून कर्मचाऱ्यांकरिता नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएस ही ऐच्छिक करण्यात आली.
म्हणजेच आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला यूपीएस आणि एनपीएस म्हणजेच नुकती सुरू करण्यात आलेली युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा नवीन पेन्शन स्कीम यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. परंतु या सगळ्या पेन्शन योजनांच्या भानगडीत मात्र खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे काय? हा मोठा प्रश्न उभा राहतो.
जेव्हा व्यक्ती रिटायर्ड म्हणजेच निवृत्त होते त्यानंतर त्यांचे जीवन आरामात व्यतित व्हावे याकरिता खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक केली तर कोणतीही व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन मिळवू शकते. 2009 पासून एनपीएस ही प्रत्येक व्यक्तीकरिता खुली करण्यात आली आहे. 2
004 ते 2009 पर्यंत फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकत होती. परंतु 2009 नंतर मात्र खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना देखील आता ही योजना गुंतवणुकीसाठी मोकळी करण्यात आली आहे. या अनुषंगाने या योजने अंतर्गत निवृत्त झाल्यानंतर जर चांगली पेन्शन मिळवायची असेल तर मात्र गुंतवणूक किती करावी लागेल हा एक मोठा प्रश्न पडतो.
नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस म्हणजे काय?
एनपीएस योजनेअंतर्गत कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर आयुष्य आरामात व्यतित करू शकतात. या योजनेमध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करतात त्यातील काही भाग शेअर बाजारामध्ये गुंतवला जातो.
म्हणजेच तुम्हाला या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर किती पैसे मिळतील हे शेअर बाजाराच्या एकूण स्थितीवर अवलंबून असते. परंतु या योजनेचा उद्देश असा आहे की व्यक्तीला किंवा लोकांना त्यांच्या निवृत्तीसाठी पैसे वाचवण्याची सवय लागावी.
या योजनेत किती पैसे जमा करणे आहे गरजेचे?
सरकारच्या चालवली जाणारी नवीन पेन्शन योजना पूर्णपणे तुमच्या इच्छावर आधारित आहे. जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा तुम्ही तुमच्या पेन्शन खात्यामध्ये पैसा जमा करू शकतात
व हळूहळू जमा होणारा हा पैसा जेव्हा तुम्ही निवृत्त होतात त्या वेळेपर्यंत एक मोठा फंड या माध्यमातून तयार होतो. तुमच्या निवृत्तीपर्यंत या खात्यामध्ये जेवढा फंड जमा होतो त्या फंडावर मिळणाऱ्या व्याजातून तुम्हाला दरमहा पेन्शन मिळते.
म्हणजेच तुम्ही या योजनेमध्ये जितक्या कमी वयात पैसे जमा करायला सुरुवात कराल तितकी निवृत्तीनंतर तुम्हाला अधिक पेन्शन मिळते. तुम्हाला जर एक लाख रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळवायचे असेल तर प्रत्येक महिन्याला किती पैसे जमा करावे लागतील? हे आपण समजून घेऊ.
दरमहा एक लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी या योजनेत किती पैसे जमा करावे लागतील?
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायला वयाच्या 35 व्या वर्षी सुरुवात करावी लागेल व दरवर्षी गुंतवणुकी दहा टक्के वाढ करून वयाच्या साठव्या वर्षापर्यंत तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल.
2- यामध्ये जर 80 टक्क्यांचा निधी वापरला गेल्यास साठे टक्के वार्षिकसाठी तुम्हाला दरमहा 17 हजार रुपये योगदान द्यावे लागेल.
3- वार्षिक 40 टक्के निधी वापरायचा असेल तर 34 हजार रुपये मासिक योगदान आवश्यक आहे.
4- या दोन्ही प्रकरणांमध्ये तुम्ही निवृत्तीनंतर मासिक उत्पन्न एक लाख रुपये मिळवू शकतात.
5- यामध्ये तुम्हाला कमी व्यवस्थापन शुल्क लागते आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील मिळतो व तुम्ही नवीन पेन्शन योजनेचे खाते ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थापित करू शकतात.
एनपीएस योजनेत मिळतो कर लाभ
एनपीएस अर्थात नवीन पेन्शन योजना ही सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकरात देखील सवलत मिळते.
आयकर कायदा 1961 अंतर्गत उपलब्ध असलेल्या 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला सूट मिळते व याशिवाय एनपीएससी योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला आयकर कलम 80CCD अंतर्गत 50 हजार रुपयांचा अतिरिक्त कर कपातीचा फायदा देखील मिळतो.