Pune Bangalore Expressway : मित्रांनो कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी दळणवळण व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. विकसित राज्याच्या विकासात निश्चितच रस्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असते.
अशा परिस्थितीत भारत सरकारच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात 3000 किलोमीटर लांबीचे रस्त्यांची उभारणी केली जात आहे. विशेष म्हणजे सदर रस्त्यांची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात असून या प्रकल्प अंतर्गत उभारले जाणारे सर्व रस्ते ग्रीन फिल्ड कॉरिडोर आहेत.
पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे हा प्रकल्प देखील भारतमाला परीयोजनेचा एक भाग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून जाणार आहे. निश्चितच या द्रुतगती महामार्गामुळे सांगली आणि सातारा या दुष्काळी पट्ट्यातील चेहरा मोहरा बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान हा सदर महामार्ग सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातून ज्या गावातून जाणार आहे तिथे लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. अशा परिस्थितीत महामार्ग लगत असलेल्या जमिनीला निश्चितच सोन्याचा भाव मिळणार आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमीनी खरेदीचा सपाटा सुरू केला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे साठी शासनाकडून जवळपास 50 हजार कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. हा महामार्ग 745 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. विशेष म्हणजे महामार्गासाठी अधिसूचना देखील जारी झाली आहे. अशा परिस्थितीत लवकरच भूसंपादनाची कामे पुणे, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यात होणार आहेत.
दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे ज्या गावातून जाणार आहेत त्या गावांची नावे निश्चित झाली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा ज्या गावातून जाणार आहेत त्या गावांची नावे निश्चित झाली असली तरी देखील त्या गावातून नेमका हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे कसा जाईल याबाबत आवश्यक असलेला रोड मॅप अजून जारी झालेला नाही.
जेव्हा रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादनाची नोटीस संबंधित जमीनदाराला मिळेल तेव्हाच हा महामार्ग नेमका कसा जाईल याबाबत स्पष्टता येणार आहे. दरम्यान जिल्हाधिकार्यांकडून लवकरच सदर महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया करणे हेतू अधिसूचना जारी होणार आहे. निश्चितच महामार्गाचा रोड मॅप समोर आलेला नसला तरी देखील ज्या गावातून महामार्ग जाणार आहे त्या गावातील जमिनीला करोडो रुपयांचा भाव मिळत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आतापर्यंत जी जमीन हजारो रुपयांमध्ये विक्री होत होती त्या जमिनीला लाखो रुपयांचा भाव आला आहे. खरं पाहता, सातारा जिल्हा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील ज्या गावातून सदर महामार्ग जाणार आहे त्या गावात एरवी हजारो रुपये गुंठा दराने विक्री होणारी जमीन तब्बल पाच ते सात लाख रुपये गुंठा म्हणजेच एकरी अडीच कोटीहून अधिक दरात जमीन विक्री होत आहे.
निश्चितच सदर महामार्गामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. दरम्यान, काही लोकांना या महामार्गाची भनक आधीच लागलेली होती. अशा लोकांनी यापूर्वी जमिनी काही हजारो रुपयांमध्ये खरेदी करून ठेवल्या आहेत. आणि आता साहजिक महामार्गामुळे येथील परिसरातील जमिनीला करोडो रुपयांचा दर मिळणार आहे.