टीसीएसमधील इंजिनीयरची नोकरी सोडली आणि गावी येऊन सुरू केली शेवगा शेती! ‘पती-पत्नी फार्म’ ब्रँडखाली शेवग्याची उत्पादने विकतात विदेशात

हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यात असलेल्या महमूदपुर या गावचे  जितेंद्र मान यांची पाहिली तर त्यांनी टीसीएस सारख्या प्रसिद्ध आयटी कंपनीतील नोकरी सोडली आणि गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे गावी वडिलोपार्जित अशी दोन एकर जमीन होती व या जमिनीत शेवग्याची शेती करावी या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला सुरुवात केली

Ajay Patil
Published:
shevga farming

शेती क्षेत्र आता व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप प्रगती करताना आपल्याला दिसून येत आहे व शेतीचे अगोदरचे जे उदरनिर्वाह पूरती शेती हे जे काही स्वरूप होते ते आता काळाच्या ओघात मागे पडलेले आहे. त्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण आता शेतीकडे वळले असल्याने ते तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन शेतीमधून घेत असून मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची निर्यात देखील करत आहेत.

अगदी याच पद्धतीची यशोगाथा जर आपण हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यात असलेल्या महमूदपुर या गावचे  जितेंद्र मान यांची पाहिली तर त्यांनी टीसीएस सारख्या प्रसिद्ध आयटी कंपनीतील नोकरी सोडली आणि गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्याकडे गावी वडिलोपार्जित अशी दोन एकर जमीन होती व या जमिनीत शेवग्याची शेती करावी या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला सुरुवात केली व शेवगा शेती आणि शेवगा प्रक्रिया पदार्थांच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहे.

 शेवगा शेती करण्याचा निर्णय का घेतला?

शेवगा म्हटले म्हणजे एक आरोग्याचा मुबलक असा खजिना असून शेवग्यामध्ये अँटिऑक्सिडंट तसेच पोषक व औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. शेवग्याचे पाने व त्यांची पावडर सुपर फूड म्हणून ओळखली जाते व इतकेच नाहीतर शेवग्याच्या शेंगांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत मागणी असते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेवग्याचे झाड वाढायला लवकर वाढते व लवकर उत्पादन द्यायला लागते.दुष्काळात देखील तग धरून राहते. या सगळ्या कारणांमुळे त्यांनी शेवगा शेती करण्याचा निर्णय घेतला.

 अशा पद्धतीने सुरू केली शेवगा शेती?

त्यांनी शेवगा लागवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या बंगलोर येथे राहणाऱ्या मित्राकडून शेवग्याची काही रोपे आणली होती व प्रयोगाकरिता त्यांनी त्यांच्या दिल्लीतील घराच्या टेरेसवर त्यांची लागवड केली.

त्यानंतर या झाडांपासून मिळालेल्या बिया त्यांनी त्यांच्या गावी नेल्या व त्या ठिकाणी जमीन तयार करून लागवड करण्याचा निर्णय घेतला. आज जितेंद्र मान हे त्यांच्या महमूदपुर या गावांमध्ये तब्बल दहा एकर क्षेत्रावर शेवग्याची लागवड करतात.

शेवग्याची पावडर आणि कॅप्सूल बनवून ते हे उत्पादन पती-पत्नी फार्म या ब्रँड खाली भारतातच नाही तर ब्रिटन तसेच कॅनडा आणि यूएई सारख्या देशांमध्ये निर्यात करतात.

 वर्षाला करतात लाखोंची कमाई

सुरुवातीला त्यांनी जेव्हा शेवग्याची पावडर तयार केली तेव्हा ती गावकऱ्यांना दिली व या पावडरच्या सेवनाने त्यांच्या अनेक आरोग्यदायी समस्या दूर झाल्या व तब्येतीत देखील सुधारणा झाली. अशाप्रकारे त्यांनी तयार केलेल्या शेवगा पावडरीची मार्केटिंग स्थानिक पातळीवर सुरू केली.

शेवगा पावडर शिवाय ते बीटरूट पावडर देखील बनवतात व बीटरूटची देखील लागवड करतात. या सगळ्या शेती पद्धतीतून त्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न लाखोंच्या घरात आहे.दरवर्षी ते दहा हजार किलो शेवग्याच्या पानांची कापणी करतात. या माध्यमातून ते शेवग्याची पाने, त्याची पावडर आणि कॅप्सूल मध्ये रूपांतर करून विक्री करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe