डॅशिंग करून 3 एकरमध्ये केली आल्याची लागवड अन मिळवला 18 लाख रुपये निव्वळ नफा! युट्युबची झाली मोलाची मदत

Ajay Patil
Published:
ginger crop

सोशल मीडिया म्हटले म्हणजे एक माहितीचा खजिनाच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती आपल्याला मिळत असते. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर यूट्यूब हे असे एक माध्यम आहे की या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती मिळू शकते व यामध्ये तुम्हाला कृषी क्षेत्राविषयी देखील विविध प्रकारची माहिती मिळते.

विविध पिकांच्या लागवडीपासून तर व्यवस्थापनाच्या पद्धती पर्यंत तुम्ही सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळवू शकतात. अगदी याच प्रमाणे जर आपण गडचिरोली जिल्ह्यातील उच्चशिक्षित असलेले राजेश गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी देखील यूट्यूबच्या माध्यमातून आले म्हणजे अद्रक पिक लागवडी विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली व आले लागवड करण्याचे निश्चित केले. या माध्यमातून त्यांनी जवळपास तीन एकर मध्ये 18 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.

 आले लागवडीतून मिळवला 18 लाख रुपयांचा निव्वळ नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील राजेश वैजनाथ गायकवाड हे तरुण शेतकरी असून त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांच्याकडे 20 एकर शेती असून प्रामुख्याने त्या ठिकाणी धान लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु राजेश गायकवाड हे एक प्रयोगशील शेतकरी असल्यामुळे ते त्यांच्या शेतामध्ये कायमच नवनवीन पिकांची लागवड करण्याचा प्रयोग करतात.

त्याचाच भाग म्हणून त्यांनी youtube च्या माध्यमातून आद्रक पीक लागवडी विषयीची माहिती घेतली व आले लागवडीचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जालना येथील एका शेतकऱ्याच्या अद्रक शेतीला प्रत्यक्षपणे भेट देऊन अद्रक शेतीचे व्यवस्थापनाचे तंत्र समजून घेतले. या भेटीनंतर त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला व त्यांनी तीन एकरमध्ये अद्रक लागवड करण्याचे निश्चित केले व आल्याची लागवड केली.

तीन एकर अद्रक लागवडीतून त्यांनी पहिल्याच वर्षी एका एकर मध्ये आठ लाख रुपये याप्रमाणे तीन एकरात 24 लाख रुपयांचे उत्पादन मिळवले. यामध्ये आल्यासाठी शेत तयार करणे तसेच मजुरी व खते कीटकनाशकांचा खर्च इत्यादी मिळून त्यांना सहा लाख रुपये खर्च आला व हाच सहा लाख रुपये खर्च वगळता त्यांना अठरा लाख रुपये निव्वळ नफा मिळाला.

यावर्षी गायकवाड यांना बाजारामध्ये प्रतिक्रिंटल अकरा हजार रुपयांचा दर मिळाला व एक एकरामध्ये ८० क्विंटल उत्पादन त्यांना झाले. गायकवाड हे अद्रकाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात करतात व सुरुवातीला स्प्रिंकलर द्वारे पाणी देण्याची सोय करतात. तसेच पाण्यात विरघळणारी खते देखील ते मोठ्या प्रमाणावर आले पिकाला देतात.

 गायकवाड यांनी आलेच नाही तर केळी पपई पिकातून मिळवले लाखो रुपये

राजेश गायकवाड हे एक प्रयोगशील शेतकरी असल्यामुळे ते एकाच प्रकारच्या पिकाची लागवड न करता वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात व यामध्ये त्यांनी चार एकर मध्ये केळीचे उत्पादन घेऊन तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळवले तर दुसऱ्या चार एकरमध्ये पपईची लागवड केलेली होती व पपईच्या माध्यमातून देखील त्यांनी सहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन मिळवलेले आहे. अशा पद्धतीने एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांमध्ये विविधता जपत गायकवाड यांनी आर्थिक समृद्धी साधली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe