Success Story : पुणे जिल्हा हा अंजीर उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. विशेषता जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादनासाठी संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त बनला आहे. येथील शेतकरी अंजीर या पिकातून चांगली कमाई करत आहेत.
पुरंदर व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतरही तालुक्यात अंजीरचे कमी अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान, भोर तालुक्यातील वेळू येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने नोकरी सांभाळात अंजीरच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. योगेश मधुकर पांगारे अस या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.
योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या 30 आर जमिनीत अंजीरची बाग फुलवली आहे. पुणे जिल्ह्यातील विशेषता पुरंदर आणि भोर तालुक्यातील उष्ण व कोरडे हवामान अंजीर पिकाला चांगले मानवते. म्हणून त्यांनी अंजीर लागवडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….
या पार्श्वभूमीवर त्यांनी 2014 मध्ये काळ्या तसेच तांबूस जमिनीत पुणेरी अंजीर वाणाची शंभर रोपे लावली. रोपांची लागवड केल्यानंतर अंजीर बागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले. अंजीर लागवड करताना दोन ओळींमध्ये अंतर दहा फूट आणि दोन रोपांमधील अंतर दहा फूट ठेवले.
यामुळे पिकाची चांगली वाढ झाली. विशेष बाब म्हणजे पाण्यासाठी त्यांनी ठिबक बसवले. यामुळे पाण्याचे काटेकोर आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात त्यांना यश आले. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासही त्यांना मदत मिळाली.
विशेष म्हणजे त्यांनी अंजीरच्या पिकासाठी रासायनिक औषधांचा आणि खतांचा संतुलित प्रमाणात वापर केला आणि सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. जीवामृत, अमृतपाणी गाईच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन यांसारख्या सेंद्रिय खतांचा आणि औषधांचा वापर करण्यात आला.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा
या सेंद्रिय खतांच्या वापरामुळे अंजीर फळाची गोडी वाढली आणि चांगले उत्पादन त्यांना मिळाले. कीटक नियंत्रणासाठी देखील त्यांनी जैविक औषधांचा वापर केला. सोबतच कीड आणि रोग नियंत्रणासाठी त्यांनी रासायनिक औषधांचा शिफारशीनुसार वापर केला आहे.
विशेष म्हणजे योगेश यांनी उत्पादित केलेले अंजीर थेट ग्राहकांना विक्री केले जात आहे. यामुळे त्यांना किलोला दोनशे रुपयाचा दर मिळत आहे. ते सांगतात की, दरवर्षी फेब्रुवारी ते मे या काळात दर दिवशी 80 किलो पर्यंतचे उत्पादन त्यांना मिळते.
म्हणजे त्यांना अंजीर बागेतून चांगले उत्पादन मिळत आहे. ते सेंद्रिय खतांचा अधिकाअधिक वापर करत असल्याने त्यांना उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळत आहे. निश्चितच, नोकरीसोबतच अंजीरची यशस्वीरित्या शेती फुलवून या तरुणाने इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे.
हे पण वाचा :- पीएम कुसुम योजना : 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप हवा असेल तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, इथं करा अर्ज