Success Story: सुशांत यांनी 4 एकरमध्ये हळदीचे घेतले 172 क्विंटल उत्पादन व मिळाले 34 लाख रुपयांचे उत्पन्न! कसे केले शक्य?

कडेगाव तालुक्यातील आसद या गावचे तरुण शेतकरी सुशांत जाधव यांची यशोगाथा पाहिली तर इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. हे एक प्रयोगशील शेतकरी असून त्यांना हळदीचे मास्टर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे सुशांत त्यांनी गेली पाच वर्षापासून एकरी बेचाळीस क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्यामध्ये सातत्य ठेवलेले आहे.

turmuric crop

Success Story:- शेती क्षेत्रामध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि व्यवस्थापनाच्या पद्धती जर अचूक आणि वेळेवर केल्या तर नक्कीच शेतकऱ्यांना पिकांपासून भरघोस उत्पादन मिळू शकते. व्यवस्थापनाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या जोरावर आज अनेक शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विक्रमी उत्पादन घेत असल्याचे आपण पाहतो.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याला कष्टाची जोड देखील तितकीच आवश्यक असते. आजची तरुणाई मोठ्या प्रमाणावर शेतीत येत असल्यामुळे अनेक युवा शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत व स्वतःची आर्थिक प्रगती साधत आहेत.

यापैकी जर आपण कडेगाव तालुक्यातील आसद या गावचे तरुण शेतकरी सुशांत जाधव यांची यशोगाथा पाहिली तर इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. हे एक प्रयोगशील शेतकरी असून त्यांना हळदीचे मास्टर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे सुशांत त्यांनी गेली पाच वर्षापासून एकरी बेचाळीस क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्यामध्ये सातत्य ठेवलेले आहे.

 सुशांत जाधव यांनी घेतले हळदीचे विक्रमी उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कडेगाव तालुक्यातील आसद या गावचे युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी शिक्षण घेऊन नोकरी न करता शेती करण्याचा ध्यास घेतला व शेतीमध्ये ते कायम वेगवेगळे प्रयोग करत असतात.

गेल्या पाच वर्षापासून शेतीमध्ये ते विविध प्रकारचे पीक बदल करून आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करताना दिसून येत आहेत. एका क्षेत्रामध्ये तेच तेच पीक न घेता सातत्याने पिकांमध्ये बदल करत ते शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवत आहेत. याच पीक बदलाचा भाग म्हणून ते हळद लागवडीचा देखील समावेश करतात.

 हळद लागवड करण्यापूर्वी अशी करतात तयारी

सुशांत जाधव हे हळद लागवडीमध्ये खूप प्रगत असून त्यांची व्यवस्थापनाची पद्धत देखील तितकीच प्रभावी आहे. हळद लागवड करण्यापूर्वी ते एका एकरमध्ये आठ ते दहा ट्रॉली शेणखत टाकतात व चांगली मशागत करतात.

त्यानंतर बेड पद्धतीने हळद पिकाची लागवड करून त्या पिकाला ठिबक च्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करतात व परिस्थितीनुसार पाट पाण्याच्या माध्यमातून देखील पाणी देतात. हळद पिकाचे व्यवस्थापन करताना कमीत कमी खर्च व कमीत कमी मजूर व त्याजागी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते हळद पिकापासून चांगले उत्पादन मिळवण्यावर भर देतात.

या हळदीपासून मिळालेल्या उत्पन्नाबद्दल माहिती देताना सुशांत यांनी म्हटले की, चार एकर क्षेत्रामध्ये 172 क्विंटल उत्पादन घेऊन 34 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत.

 सुशांत यांचे उत्तम विक्री व्यवस्थापन मिळवून देते त्यांना पैसा

जर आपण सुशांत जाधव यांचे हळद विक्रीतील गमक पाहिले तर ते हळदीची काढणी झाल्यानंतर लगेच विक्रीला कधीच घेऊन जात नाही. बाजारामध्ये हळदीला काय दर चालू आहेत त्याचा अभ्यास करूनच ते हळद विक्रीचे नियोजन करतात. दर कमी असतील तर ते जवळ असलेल्या शीतगृहामध्ये हळद ठेवतात व दर वाढले की तेव्हाच हळदीची विक्री करतात व या पद्धतीने ते चांगले पैसे मिळवतात.

 सुशांत यांनी शेतकऱ्यांना दिलेला महत्त्वाचा सल्ला

सुशांत जाधव म्हणतात की, पारंपारिक पिके न घेता भाजीपाला पिके तसेच आले व हळद इत्यादी पिकाकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिले तर शेती फायद्याची होऊ शकते. हळद या पिकाकडे व्यापारी दृष्टिकोनाने बघून त्या पद्धतीने त्याचे उत्पादन घेतले जाणे आवश्यक आहे. हळद पिकातून वर्षाला एकरी आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. असे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe