भारतातील ‘हे’ आहेत सर्वात प्राचीन किल्ले! एकदा नक्कीच ट्रीप प्लॅन करा आणि या किल्ल्यांना भेट द्या; मिळेल अस्सल आनंद

भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत व भारताला समृद्ध असा ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे व यातून देखील प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक परंपरेच्या खाणाखुणा असलेली ठिकाणे पाहायला मिळतात व या ऐतिहासिक समृद्ध ठिकाणांमध्ये आपल्याला अनेक किल्ले आढळून येतात व अशा प्रकारचे किल्ले आपल्याला महाराष्ट्रात तर दिसून येतातच.

Ajay Patil
Published:
mehrangarh fort

Ancient Fort In India:- भारत हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूपच समृद्ध असे राष्ट्र असून भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत व भारताला समृद्ध असा ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे व यातून देखील प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक परंपरेच्या खाणाखुणा असलेली ठिकाणे पाहायला मिळतात व या ऐतिहासिक समृद्ध ठिकाणांमध्ये आपल्याला अनेक किल्ले आढळून येतात व अशा प्रकारचे किल्ले आपल्याला महाराष्ट्रात तर दिसून येतातच.

परंतु महाराष्ट्र बाहेरील अनेक राज्यांमध्ये देखील आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात व हे सगळे किल्ले वास्तुकलेसाठी देखील खूप प्रसिद्ध आहेत. वैभवशाली भूतकाळासाठी, संस्कृतीसाठी आणि आश्चर्यकारक वास्तुकलेसाठी देखील प्रसिद्ध आहेत. भारतातील अनेक किल्ल्यांची अप्रतिम रचना,

आकर्षक नक्षीकाम आणि आकर्षक रचना पर्यटकांना आकर्षित करतात. राजपूत तसेच मुघल आणि द्रविडीयन स्थापत्य शैलीत बांधलेले प्राचीन किल्ले त्यांच्या ऐतिहासिक वारसा आणि वर्षासाठी एक आवडते पर्यटन स्थळ म्हणून आहे व हे किल्ले प्राचीन राजेशाहीच्या भव्यतेची देखील झलक देतात.

तुम्हाला देखील अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक किल्ले पाहण्याची आवड असेल तर तुम्ही भारतातील काही किल्ल्यांना भेट देऊ शकतात व या किल्ल्यांविषयीचीच माहिती आपण या लेखात दिली आहे.

ही आहेत भारतातील सर्वात प्राचीन किल्ले

1- किल्ले मुबारक, पंजाब- पंजाब राज्यातील भटिंडा येथे असलेला किल्ला मुबारक हा राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून ओळखला जातो. हजारो वर्षे जुने असा लोकप्रिय किल्ला असून एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे.

या प्राचीन किल्ल्याच्या भिंती सुमारे सात विविध प्रकारच्या विटांनी बनवलेल्या आहेत व ज्याच्या माथ्यावरून संपूर्ण शहराचे नयनरम्य असे दृश्य दिसते व या किल्ल्यात महाराजा करम सिंह यांनी गुरुद्वारा बांधला होता. दिल्ली शासनाच्या प्रसिद्ध शासक रझिया सुलतानाला या किल्ल्यात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते.

2- ग्वाल्हेर किल्ला,मध्यप्रदेश- मध्यप्रदेश राज्य हे पर्यटनाच्या दृष्टीने खूपच विकसित असे राज्य असून या राज्यामध्येच प्राचीन ग्वाल्हेर किल्ला आहे व हा इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो. उंच वाळूच्या खडकांवर वसलेले शाही ग्वालियर किल्ल्याचा इतिहास तोमर घराण्याशी निगडित आहे.

ग्वाल्हेर किल्ल्याचा इतिहास जर बघितला तर तो एक गौरवशाली आहे व भूतकाळ आणि आश्चर्यकारक वास्तुकलेचा ग्वाल्हेर किल्ला एक अप्रतिम असा नमुना आहे.

या किल्ल्याचे एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेली वास्तुकाला ही होय व हा किल्ला प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून देखील लोकप्रिय आहे.

3- कांगडा किल्ला,हिमाचल प्रदेश-हिमाचल प्रदेश हे राज्य पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे असे राज्य आहे व या हिमाचल प्रदेश राज्यांमध्येच इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बांधलेला कांगडा किल्ला आहे.

कांगडा किल्ला हा कटोच राजवंशाने बांधला होता व महाभारतातील प्राचीन त्रिगर्त राज्याशी संबंधित राजपूत कुटुंबाशी संबंधित आहे व तसेच भारतातील सर्वात प्राचीन व जुन्या किल्ल्यांपैकी कांगडा किल्ला एक असून हिमाचल प्रदेश राज्यातील सर्वात मोठा किल्ला म्हणून देखील कांगडा किल्ल्याला ओळखला जाते. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील कांगडा किल्ला उत्कृष्ट असे स्थळ आहे.

4- मेहरानगड किल्ला, राजस्थान- राजस्थान राज्य म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते ते त्या ठिकाणाच्या प्राचीन वास्तू व राजवाडे इत्यादी होय. राजस्थानमध्ये जे काही प्राचीन आणि सर्वात मोठे किल्ले आहेत त्यापैकी मेहरानगड किल्ला एक असून हा किल्ला त्याच्या प्रभावी स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे.

या किल्ल्यामध्ये बारीक नक्षीकाम केलेले वाळूचे दगड तसेच जाळीदार खिडकी आणि भव्य असा अंतर्भाग असल्यामुळे हा किल्ला अतिशय सुंदर दिसतो. मेहरानगड किल्ला जोधपुर मध्ये आहे व पाच शतकांपेक्षा अधिक काळापासून राजपूत राजघराण्याच्या वरिष्ठ शाखेचे मेहरानगड किल्ला एक मुख्यालय देखील आहे.

या किल्ल्यालाच मयूर ध्वज किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. कारण हा किल्ला सुंदर मोरासारखा देखील दिसतो. मेहरानगड किल्ला राजस्थानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक समृद्ध आणि अनोखा असा वारसा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe