Success Story: जालना जिल्ह्यातील ‘हा’ शेतकरी डाळिंब फळबागेतून कमवतो लाखो रुपये! विविध फळांची करतो निर्यात, वाचा यशोगाथा

Ajay Patil
Published:
pomegrenet crop

Success Story:- प्रयोगशीलता हा गुण इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि तुमच्यामध्ये प्रयोगशीलता हा गुण असेल तर तुम्ही अनेक नवनवीन गोष्टींना जन्म देत असतात व अनेक नवनवीन कल्पना सत्त्यात उतरवत त्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती तर करतातच, परंतु त्याचा उपयोग किंवा त्यापासून इतरांना देखील प्रेरणा मिळवण्याच्या कामी एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.

प्रयोगशीलता  हा गुण शेती क्षेत्रामध्ये देखील खूप महत्त्वाचा असून अनेक शेतकऱ्यांमध्ये तो दिसून येतो. शेतीमध्ये आपल्याला असे अनेक प्रयोगशील शेतकरी दिसून येतात की ते कायम नवनवीन प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये करत असतात व वेगवेगळ्या पिकांची लागवड तसेच तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळतात व आर्थिक नफा देखील मिळवतात.

याच पद्धतीने आपण जर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी पासून जवळ असलेल्या कौडगाव येथील विष्णू वादे या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर आपल्याला हा मुद्दा पटेल.हे शेतकरी शेतीमध्ये कायम नवीन प्रयोग करतात व विविध फळबाग लागवडीतून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साधलेली आहे.

 डाळिंब फळबागेतून साधली आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या कौडगाव येथील शेतकरी विष्णू वादे हे प्रयोगशील शेतकरी असून ते त्यांच्या शेतामध्ये कायमच वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत असतात. यामध्ये त्यांनी विविध फळबागांची लागवड केलेली आहे व यामध्ये त्यांनी डाळिंब फळबागेतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती साधली आहे.

त्यांनी केलेल्या डाळिंब लागवडीविषयी बघितले तर सुपर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली व या जातीची तब्बल 1400 झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण डाळिंब बागेचे व्यवस्थापन करताना त्यांनी कमीत कमी पाण्यावर ही झाडे जगवली असून त्यापासून आज लाखो रुपयांचे उत्पन्न ते मिळवत आहेत.

जर आपण विष्णू वादे यांच्याकडे असलेली एकूण जमीन पाहिली तर ती 35 एकर आहे. ही संपूर्ण जमीन ते आज कसतात व यामध्ये त्यांना कुटुंबातील संपूर्ण सदस्यांची मदत मिळते.

त्यांची शेतीची पद्धत जर आपण बघितली तर ती रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांवर जास्त भर देतात. सेंद्रिय खतांमध्ये ते शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात व प्रत्येक वर्षाला कमीत कमी 20 ते 25 गाड्या शेणखत ते जमिनीत वापरतात.

 डाळिंबासोबत इतर फळबागांची लागवड

विष्णू वादे यांनी त्यांच्या शेतामध्ये डाळिंबाचं नाही तर तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करत पपई तसेच काशीफळ, नयना खरबूज देखील उत्तम पद्धतीने पिकवले व महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पिकवलेल्या नयना खरबुजाची दुबईला देखील निर्यात त्यांनी केलेली होती.

तसेच शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल या प्रयत्नात ते फळपिकांसोबत कांदा सारखी पिके देखील घेतात. विशेष म्हणजे विष्णु वादे यांनी त्यांच्या शेतामध्ये पपई लावलेली होती व या पपईमध्ये कांदा या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केलेली होती.

विशेष म्हणजे पपईसारख्या फळ पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक घेऊन त्यांनी कांद्याच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न देखील मिळवलेले होते.

पपई सारख्या उंच वाढणाऱ्या पिकामध्ये कांदा हे अंतर पीक घेऊन दोन लाख रुपयाचे उत्पन्न मिळवणे हे सोपी गोष्ट नाही. परंतु प्रयोगशीलता हा गुण असल्यामुळे आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्यांनी हे देखील शक्य करून दाखवले.

 पाण्याचा केला सुयोग्य वापर

पाण्याच्या व्यवस्थापनावर त्यांनी महत्त्वाचा भर दिला आहे व यामध्ये शेततळ्याचा वापर करून व्यवस्थितरित्या पाण्याचे व्यवस्थापन त्यांनी केलेले आहे. जर वीज असली तर शेततळ्यामध्ये ते सायपनचा वापर करतात व पिकांना पाणी देतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांचे व्यवस्थापन इतके अचूक आहे की वीज तसेच गारपीट,

अवकाळी पाऊस, तेल्या रोग व मर यासारख्या रोगापासून देखील त्यांनी डाळिंब बागाला उत्तम पद्धतीने जपलेले आहे. आज त्यांच्या शेतामध्ये डाळिंबाची बाग चांगली बहरलेली असून त्या माध्यमातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe