Pune-Nashik Semi High-Speed Railway:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे नाशिक हे राज्यातील दोन महत्त्वपूर्ण शहरे असून या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे.
जर हा प्रकल्प येणाऱ्या कालावधीत पूर्ण झाला तर पुणे आणि नाशिकच नाही तर अहिल्यानगर या जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच या तीनही जिल्ह्यांच्या औद्योगिक आणि कृषी विकासाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असणार आहे.
महत्वाचे म्हणजे हा 235 km चा प्रकल्प आहे व या सगळ्या मार्गावर वीस रेल्वे स्टेशन्स असणार आहेत. या प्रकल्पाचा जर सगळ्यात महत्त्वाचा फायदा बघितला तर पुणे ते नाशिक हा प्रवास करायला सध्या साडेपाच तासांचा कालावधी लागतो. परंतु जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा या अंतर दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
त्यामुळे या दोन्ही शहरांसाठी महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पाच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर आता अंतिम टप्प्यात असल्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
पुणे ते नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प 235 किलोमीटरचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक हे अंतर साडेपाच तासांऐवजी दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
त्यासोबतच अहिल्यानगर तसेच पुणे व नाशिक या तीनही जिल्ह्यांच्या विकासामध्ये या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे. दुसरे म्हणजे सध्या जर आपण पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास बघितला तर तो रस्ते मार्गाने शक्य आहे.
परंतु भविष्यात हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वेने जोडली जाणार असल्याने याचा खूप मोठा फायदा होणार आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या प्रकल्पाचा नवीन तपशीलवार प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाचे काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा प्रकल्प अहवाल बाहेरच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून या नवीन प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआरमध्ये आता नारायणगाव येथील जीएमआरटीचा सुरक्षा संवेदनशील प्रकल्प तसेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स द्वारे संचालित जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वापरण्याचा प्रस्ताव रेल्वेला दिलेला होता. मात्र ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच नवीन आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी एक अपेक्षा आहे.
नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा 235 किलोमीटरचा असून त्यावर वीस रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहेत. इतकेच नाही तर या प्रकल्पाकरिता आवश्यक असलेल्या 102 पैकी 85 गावांच्या जमिनींचे सर्वेक्षण देखील पूर्ण झालेले असून या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून पुढील पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची महारेलची योजना आहे.