कमीत कमी गुंतवणुकीत ‘हा’ व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवू शकतात 30 ते 50 हजार! परफेक्ट मॅनेजमेंट तुम्हाला आयुष्यभर देईल लाखोत पैसा

कमीत कमी गुंतवणुकीत उत्तम नफा आपल्याला कुठल्या व्यवसायातून मिळेल या दृष्टिकोनातून व्यवसायाची निवड करणे हे गरजेचे असते. तसेच नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध असतात व त्यामुळे व्यवसाय हा नेहमीच नोकरीपेक्षा सरस ठरतो.

Ajay Patil
Published:
business idea

Low Investment Business Idea:- स्वतःचा व्यवसाय असणे ही आता काळाची गरज असून उच्चशिक्षित तरुण-तरुणी पासून तर इतर बेरोजगार लोकांसाठी व्यवसाया शिवाय आता पर्याय नाही. कारण नोकऱ्यांची उपलब्धता किंवा रोजगाराच्या संधी खूपच कमी असल्याने स्वतः एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून त्यातून स्वतःची आर्थिक प्रगती साधणे हे आता महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता बहुसंख्य व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत.तसेच आता व्यवसाय करण्याची इच्छा देखील अनेक लोकांमध्ये वाढत आहे.

परंतु व्यवसायाच्या बाबतीत बघितले तर कुठलाही व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्याकरिता मात्र तुम्हाला भांडवलाची आवश्यकता भासते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय उभारणार आहात किंवा सुरू करणार आहात त्या व्यवसायातील मागणी देखील तितकीच महत्त्वाची असते

व या दृष्टिकोनातून कमीत कमी गुंतवणुकीत उत्तम नफा आपल्याला कुठल्या व्यवसायातून मिळेल या दृष्टिकोनातून व्यवसायाची निवड करणे हे गरजेचे असते. तसेच नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध असतात व त्यामुळे व्यवसाय हा नेहमीच नोकरीपेक्षा सरस ठरतो.

याच पद्धतीने तुमच्या डोक्यात देखील एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार असेल तर या लेखामध्ये एका व्यवसायाची माहिती दिली आहे जो तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करू शकतात. तुम्हाला जर कमी गुंतवणुकीतुन चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.

अगदी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत साबणाला नेहमीच मागणी असते व तुम्ही साबण बनवण्याचा युनिट सुरू करून या माध्यमातून चांगला नफा मिळवू शकतात. इतकेच नाही तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत 80% पर्यंत कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होऊ शकते.

भारतामध्ये साबण बाजारपेठेची श्रेणी कशी आहे किंवा स्वरूप कसे आहे?
भारतीय साबण बाजार पाहिला तर तो त्याच्या वापराच्या आधारावर विविध श्रेणीमध्ये विभागला जाऊ शकतो. यामध्ये बाजारपेठेतील मागणी व बाजारपेठेतील स्थिती लक्षात घेऊन तुम्ही कोणत्या श्रेणीतील साबणाचे उत्पादन तयार करू शकता हे तुम्हाला अगोदर निश्चित करावे लागेल. जर आपण साबणाच्या श्रेणी बघितल्या तर यामध्ये लॉन्ड्री सोप, ब्युटी सोप, मेडिकेटेड सोप, किचन सोप आणि परफ्युम्ड सोप इत्यादींचा समावेश होतो.

या उद्योगातून किती उत्पन्न मिळू शकते?
हा व्यवसाय उभारण्याचा जर आपण एकूण खर्च बघितला तर यासाठी आवश्यक असणारी मशिनरी खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक लाखाच्या आसपास खर्च येतो. यासोबतच इतर खर्च पकडून तुम्ही चार ते पाच लाखांमध्ये साबण कारखाना किंवा साबण तयार करण्याचा युनिट उभारू शकतात.

या उद्योगाच्या बाबत असलेल्या सरकारच्या मुद्रा योजनेचा जर प्रोजेक्ट प्रोफाइल किंवा प्रकल्प प्रोफाइल अहवाल बघितला तर त्यामध्ये एका वर्षामध्ये चार लाख किलो उत्पादन करण्यास यामध्ये सक्षम आहे.

या उत्पादनाची एकूण किंमत 47 लाख रुपये पर्यंत असते व या सगळ्या उत्पादनामध्ये त्याचे एकूण मूल्य आणि देणे देऊन म्हणजेच खर्च वजा जाता व्यक्तीला वार्षिक सहा लाखांचा नफा या माध्यमातून मिळू शकतो व याप्रमाणे महिन्याला मिळणाऱ्या नफ्याची आकडेवारी बघितली तर ती 50000 पर्यंत निव्वळ नफ्यात तुम्हाला मिळू शकते.

व्यवसायात तीस ते पस्तीस टक्के नफा सहज मिळवता येतो. तसेच तुम्ही तयार केलेल्या साबणाची गुणवत्ता जर लोकांना आवडली तर व्यवसायात झपाट्याने वाढ होऊन तुम्ही अधिकाधिक नफा या माध्यमातून मिळू शकतात.

साबण व्यवसायासाठी परवाना
हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला एमएससीएमईच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या ब्रँड नावाने आपणास विक्री करायची असेल तर त्याकरता ट्रेडमार्क साठी नोंदणी करणे गरजेचे असते व व्यवसायासाठी फायद्याचे ठरते. ब्रँड असल्यामुळे तुम्हाला तुमच्या साबणाचे नावच तुमची ओळख तुम्हाला बनवून देते.

तसेच हा व्यवसाय उत्पादन क्षेत्रांतर्गत येत असल्याने प्रथम तुम्हाला जमिनीचा वापर आणि महामंडळाचा परवाना मिळवणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. हे उत्पादन मेडिकल म्हणजेच वैद्यकीय आधारित असल्यामुळे तुम्हाला पर्यावरण संमती परवाना देखील आवश्यक असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe