मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची टीका

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेमधील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

“विरोधात असताना मविआ सरकारला सल्ले देणारे आता गप्प का?” ओबीसी आरक्षणावरून पटोलेंचा खोचक टोला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे. परंतु भाजपप्रणित सरकारला सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता … Read more

“शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’वर, दिल्लीत नाही, ते भाजपचे मुख्यमंत्री”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचं सरकार आहे. तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईमध्ये आहे. … Read more

गद्दार म्हणा, टींगल करा, आम्ही कामातून उत्तर देऊ; बच्चू कडूंचं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना गद्दार म्हंटलं गेलं. यावरुन आता प्रहार संघटनेते प्रमुख बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना न्याय देण्यासाठी लोकांनी मला … Read more

शिंदे मराठी माणसाच्या एकजूट फोडीचा नजराणा घेऊन गेलेत; दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील या दोन्ही गटामध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

आज फडणवीसांनी त्यांचा माईक हिसकावला उद्या….; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिले होते. शिवसेनेमधील नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी केलेल्या कृत्यावरुन टीका केल्याचे पहायला … Read more

छत्रपती शिवरायांच्या ‘गनिमी काव्या’ने नवं सरकार; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

नागपूर : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार संभाळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्याप्रमाणे निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. सरकार बनवीन, पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली होती. घोषणा करुन मी घरी … Read more