अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

“मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं ते अर्धवटच”

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. या भागातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिवसेनेत बंड केलेल्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय … Read more

भाजपवाल्यांनो सावधान! उद्या दे स्वतःला नरेंद्र मोदी समजतील अन्…; उद्धव ठकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रदर्शित झाला. त्यमध्ये उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्यांवर सडकून टीका केली. आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला … Read more

तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असे वाटत नाही; मंत्रिमंडळाबाबत जयंत पाटलांचं भाकित

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्याअर्थी मंत्रिमंडळाचा विस्तार करत … Read more

सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीच्या टिझरवर निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका … Read more

‘याच वृत्तीमुळे पवारसाहेब बदनाम’ बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र निलेश राणेंनी केले शेअर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. यानंतर शरद पवारांवर टीका होत असून त्यांचे एक जुने पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. … Read more

जे पोटात मळमळत होतं, ते ओठावर आलं; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : मनावर दगड ठेवून भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पडसात उमटताना दिसत आहेत. भाजपने … Read more

मंत्रिपदासाठी इच्छुकांना देवेंद्र फडणवीसांचा सूचक सल्ला

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना होत आला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला लागणाऱ्या विलंबावरुन विरोधकांनी सडकून टीका केली. पुढच्या आठवड्यात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदासाठी इच्छुकांना सल्ला दिला आहे. कमीत कमी अपेक्षा ठेवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. … Read more

भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरकच; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाऊडस्पीकर असा उल्लेख करत केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील’, असे संजय राऊत मुंबईत बोलत होते. आम्ही भाजपप्रमाणे सरकार कोसळेल असे लाऊडस्पीकरवरुन सांगणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. … Read more

देवेंद्र फडणवीसांकडून संजय राऊतांचा ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भल्या सकाळी नेहमी पत्रकार परिषद घेत किंवा ट्विट करत विरोधकांवर टीका करत. अलिकडच्या काळात राऊत कधी तरीच पत्रकार परिषद घेत आहेत. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.   सकाळी ९ वाजता बोलणारे अलीकडे कमी बोलू लागले आहेत, कारण काही माहिती नाही, असे … Read more

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री??? अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणतात….

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्यावर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार … Read more

चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली … Read more

फुटीर गट चंद्रावर पण…; संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय … Read more

“दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले”

मुंबई : मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली आहे. महाराष्ट्राची सुत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. … Read more

घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही अन्…; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचे खडेबोल

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे राज्यात मोठा सत्ताबादल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान कलगितुरा रंगला आहे. मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे.   … Read more

‘तेव्हा तुमचंच राष्ट्रवादीशी साटलोटं होतं, कदमांनी स्वत: च आत्मपरीक्षण केले पाहिजे’

मुंबई : शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर रामदास कदम यांनी आक्रमक होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणाऱ्या रामदास कदम … Read more

‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का?- रामदास कदम

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेनेला गळतीच लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाविरोधात कारवाया केल्याचे सांगत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे रामदास कदम यांना देखील पक्षातून हकालपट्टी केल्याचे समोर आले. त्यावर आता रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more