सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

रोहित पवारांची प्रसार माध्यमांवर आगपाखड, म्हणाले…

Maharashtra News:जुन्नर येथील सभेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच गाजले. २०१४ नंतरचा काळ तरुणांचा असेल. अगदी शरद पवार, अजित पवार ही मंडळीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील, असे रोहित पवार म्हणाले होते. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी नापसंती व्यक्त करीत इतर पक्षातील काही नेत्यांनी पवार यांच्यावर टीकाही केली. मात्र, याससर्वांच खापर पवार यांनी … Read more

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री??? अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणतात….

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्यावर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार … Read more

मुख्यमंत्री शिंदे यांचा थेट अजित पवारांनाच दणका, बारामतीसंबंधी घेतला हा निर्णय

Maharashtra news:शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारने मंजूर केलेली कामे रद्द करण्यास अगर स्थगित करण्याचा सपाटाच सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची कामे रद्द केल्यानंतर आता त्यांनी थेट विरोधीपक्ष नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच दणका दिला आहे. नगर विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या ९४१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली … Read more

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ … Read more

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

आम्ही निवडून येण्याची चिंता अजितदादांनी करु नये; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला

मुंबई : राज्यातील विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधपक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायाला मिळत आहे. सभागृहामध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘जे शिवेसना सोडून गेलेत त्यांना कोणी पुन्हा … Read more

विरोधीपक्ष नेतेपदी अजित पवार, अखेर अदलाबदल झालीच

Maharashtra news:विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तसे पत्र दिल्यानंतर नियुक्तीची झाली घोषणा. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार विरोधीपक्ष नेते झाल्याने दोघांमधील पदांच्या आदलाबदलीची चर्चा आहे. पवार यांनी कालपासून विधानसभेत दोन वेळा भाषण करुन शिंदे सरकारला कसे … Read more

शरद पवारही धक्का देणार, की आमदारांचे ऐकणार?

Maharashtra news: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधी पक्ष नेता कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे पुढे आली आहेत. काल झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना हे पद देण्याची मागणी केली आहे. यावर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

अजितदादांच्या बाबतीत एका दिवसात चमत्कार

Maharashtra news:राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची कोरोना चाचणी आज निगेटीव आली आहे. त्यामुळे ते आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनास उपस्थिती राहणार आहेत. कालच त्यांची चाचणी पॉझिटीव आल्याचे सांगण्यात आले होते. एका दिवसातच ती निगेटीव आली असून अजितदादा आता कोरोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले.पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मुदत संपल्यावर त्यांनी पुन्हा चाचणी करून … Read more

बिग ब्रेकिंग : अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक बातमी !

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटक करून याची माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इकडे राष्ट्रवादीने भाजपचे तीन पदाधिकारी ‘फोडले’

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे. नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा … Read more

कोपरगावच्या आशुतोष काळेंसह तीन आमदारांनी वाढविले राष्ट्रवादीचे टेन्शन

Ahmednagar News : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असताना हे तिघे मात्र सकाळपर्यंत मुंबईत पोहचले नाहीत. राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते. निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला … Read more

अजित पवारांच्या खांद्यावर मोदींचा हात, दादांचा हात जोडून नमस्कार

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्यावेळी अशी एखादी कृती करतात की त्याची चर्चा होते. देहू येथील कार्यक्रमासाठी येताना पुणे विमानतळावरही त्यांनी अशीच एक कृती केली. तिची आता चर्चा सुरू झाली आहे. विमानतळावर स्वागतासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोदींनी जवळ जाऊन विचारपूस केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्याची … Read more

मोठी बातमी! 1 जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार, अजित पवारांनी दिली मोठी माहिती

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Sarkar) सत्ता हाती घेतल्यानंतर सर्व्यात आधी श्रीगणेशा केला तो (Farmer) शेतकरी कर्जमाफीचा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना (Mahatma Phule Shetkari Loan Waiver Scheme) संपूर्ण राज्यात अमलात आणून कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या वेळी कर्जमाफी (Debt forgiveness) तर झालीच शिवाय त्या … Read more

उद्धव ठाकरेंच्या कामावर शरद पवार, अजित पवार खुश, तर संजय राऊत म्हणतात..

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (rajya sabha election) संभाजी छत्रपती(sambhaji chhatrapati) यांच्या सहाव्या जागेवरून भाजपवर (Bjp) जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, सातवी जागा ज्यांनी भरली आहे त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्कीच … Read more

पवार साहेबांनी मला सवय लावली, बारामतीत या, कसे काम असते बघा; अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यात (Pune) गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे. यावेळी पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. हे प्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी अनेक जुन्या … Read more