शरद पवारही धक्का देणार, की आमदारांचे ऐकणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधी पक्ष नेता कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे.

राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे पुढे आली आहेत. काल झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना हे पद देण्याची मागणी केली आहे. यावर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत.

ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात की सध्या सुरू असलेल्या धक्कातंत्राच्या मालिकेत तेही धक्का देत वेगळा निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.आज सरकारचा विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर विरोधपक्ष नेता निवडीला गती येईल.

पूर्वी महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वाधिक आमदार असलेला पक्ष होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार फोडून नेल्याने शिवसेनेकडे अवघे १६ आमदार उरले आहेत. त्यामुळे आता ५३ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा असून विरोधी पक्षनेता हा त्यांचा असेल. त्यामुळे विरोधीक्ष नेतेपद याच पक्षाकडे येणार आहे.