आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more

आमदार रोहित पवारांचे हे स्वप्न आणखी लांबणीवर

Ahmednagar News:कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातलगत असलेला करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आहेत. मात्र, आता ते आणखी लांबणीवर पडले आहे. राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर घडलेल्या हालचालींमुळे यामध्ये आता कायदेशीर अडचणी उभ्या झाल्या आहेत.आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला मुंबईच्या डीआरएटी न्यायालयाने २२ … Read more

सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती !

Maharashtra News:फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी आंदोलनं करण्याची वेळ आली असल्याची टिका भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. सरकारमध्ये असताना काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व दाखवू शकला नाही आता सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती उरली आहेत. भविष्यात जनताच आता यांना बुस्टर डोस देणार असल्याचा टोला त्यांनी … Read more

डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर,मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालताच…

Maharashtra News:सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आहे. डिसेल गुरूजी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही चक्रे फिरल्याचे सांगण्यात येते.डिसले गुरूजी यांनी ३४ महिने कामावर … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती नाही, फडणवीसांनी सांगितला असा अर्थ

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील १ ऑगस्ट ही तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सत्तेची परिस्थिती जैसे थे ठेवावी, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार का? त्याला स्थगिती आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती देण्यात आलेली … Read more

नगरचे संपर्कप्रमुख, पुण्याचे पालकमंत्री, भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात?

Ahmednagar News

Maharashtra News:शिवसेना फोडल्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षातर्फे नगरच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबादारी देताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही निवड करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते. नगर व पुणे या पट्ट्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. त्यामुळे भाजपने येथे पूर्वीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नगरसह सोलापूरची जबाबदारी यापूर्वीच … Read more

प्रशासन रुसले तरी, सरकार डिसले गुरूजींच्या पाठीशी

Maharashtra news:आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर सोलापूर जिल्हा प्रशासनाची खापा मर्जी झाली आहे. विना परवाना गैरहजर आणि अन्य नियमांचा बडगा उगारून झिसले यांच्याकडून ३४ महिन्यांचा पगार वसूल करण्याची कार्यवाहीच प्रशासनाने सुरू केली आहे. अशा परिस्थतीत राज्य सरकार मात्र डिसले गुरूजींच्या पाठीशी उभे राहिले आहे.प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाल्याचे पाहून डिसले गुरूजी यांनी राजीनाम्याची नोटीस … Read more

मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या अध्यक्षांना भेटले, चर्चा तर होणारच

Maharashtra news:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, आज सकाळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटणे वेगळे आणि पक्षाच्या अध्यक्षांना भेटणे वेगळे. यावरून आता चर्चा सुरू झाली … Read more

शिंदे-फडणवीसांनी दिल्लीत जागविली रात्र, नेमकं काय ठरलं?

Maharashtra news:रात्रीच्या गोपनीय भेंटीमधून स्थापन झाल्या शिंदे-फडणवीस सरकारची रात्रीची जागरणे सुरूच आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेली त्यांची बैठक पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येते.राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर या दोघांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. … Read more

कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्‍यावधी निवडणूकांची होत असलेली वक्‍तव्‍य ही नैराश्‍येच्‍या…

Maharashtra news:विधान परिषद निवडणूकीत मतं फुटल्‍यावरुन कॉंग्रेस कारवाई तरी कोणावर करणार असा सवाल करतानाच तत्‍व आणि विचारांना तिलांजली देवून, सत्‍तेत सहभागी झाल्‍याबद्दल पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनीच माफी मागीतली पाहीजे असे वक्‍तव्य भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्‍यावधी निवडणूकांची होत असलेली वक्‍तव्‍य ही नैराश्‍येच्‍या भावनेतूनच असल्‍याची प्रतिक्रीया माध्‍यमांशी बोलताना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.आ.विखे … Read more

शिंदे-फडणवीस सरकारची पहिली क्लीन चीट, या व्यावसायिकाला मिळाला दिलासा

Maharashtra news:नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आधीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय फिरविण्याचा सपाटाच सुरू केला आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अडचणीत सापडलेल्यांना क्लीन चीट देण्यासही सुरूवात झाल्याचे दिसून येते. ईडीची भीती दाखवून मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असणारे जितेंद्र नवलानी यांना याचा पहिला दिलासा मिळाला … Read more