अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन बँकेतील अपहार प्रकरणी माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेचे अधिकारी मारुती औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे. दिनांक ७ ऑक्टोंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या अहवालाची चौकशी बँकेच्या प्रशासक अधिकाऱ्यांनी सादर केली आहे. … Read more

माजी खासदार दिलीप गांधीना बाजूला ठेवत भाजप इलेक्शन मोडमध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात होणार्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी पारनेर, कर्जत येथे नगरपंचायत तर जामखेड, शेवगाव मध्ये नगरपरिषद निवडणूक होणार आहेत. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पारनेर :माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, शेवगाव :-माजी … Read more

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – मा. खा. दिलीप गांधी

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांनी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पथक पुरवठा योजनेची अंमलबजावणी केली असून या योजने अंतर्गत पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी खेळते भांडवल म्हणून रु. १०,०००/- एवढे खेळते भांडवल कर्ज रूपाने सर्व सरकारी बँकेत उपलब्ध करून … Read more

ग्रामपंचायतीवर सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करावी – माजी खासदार गांधी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर पक्षातील कार्यकर्ते किंवा सरकारी कर्मचारी प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीला प्रतिसाद देत माजी खासदार दिलीप गांधी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक ऐवजी सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करण्याच्या मागणीचे … Read more

भाजपकडून माजी खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केल्या.नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांची निवड करण्यात आली.भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे. हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल … Read more

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ठेकेदाराचा मा. खा. गांधी यांना पुळका का ?

पारनेर: म्हसणेफाटा येथील औद्योगिक वसाहतीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार, शेतकऱ्यांसाठी भूखंड यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी किती वेळा आवाज उठवला, असा सवाल करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ठेकेदाराचा गांधी यांना पुळका का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केला. अवैध गौण खनिज उपसाप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हसणेफाटा येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ठेकेदारांवर केलेल्या दंडात्मक कारवाईवर … Read more

माजी खासदार दिलीप गांधी -उपनेते अनिल राठोड यांचे अखेर मनोमिलन

नगर : जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली. गांधी, राठोड, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या बैठकीत मनमोकळी मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार दिलीप गांधी हे महायुतीचे उमेदवार … Read more

अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही

नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे नाव न घेता केला.  राठोड … Read more

माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे. निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र … Read more

भाजपने अष्टपैलू नेता गमावला

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली … Read more

पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच अटलजींना श्रद्धांजली

अहमदनगर :- देशात भाजपची सत्ता आली आहे आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांना नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.  भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा … Read more

माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत

अहमदनगर :- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँकेवर अखेर प्रशासक नेमण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी या बँकेवर प्रशासक नेमून त्यांच्या हाती बँकेचा कारभार सोपविला आहे. त्यामुळे बँकेच्या गोटात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिण मतदारसंघाचे माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांना या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. बँकेवर प्रशासक नेमल्याचे सर्व … Read more

नगर अर्बन बँकेवर प्रशासक नियुक्त

अहमदनगर :- येथील नगर अर्बन बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे एक पथक आज चौकशीसाठी नगरला आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माजी खासदार दिलीप गांधी या बँकेचे अध्यक्ष आहेत. डिसेंबर महिन्यात बँकेची निवडणूक होणार आहे. बँकेच्या कामकाजबद्दल अनेकदा तक्रारी झाल्या होत्या.

भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिल्यास निवडून आणू !

नेवासे :- माजी खासदार दिलीप गांधी यांनी नेवाशातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळाव्यात कार्याकर्त्यानी धरला. भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी यावेळी व्यक्त केला. मंगळवारी अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपचे व खासदार गांधी यांना मानणारे … Read more

दिलीप गांधीना संपविण्यासाठी विरोधक सरसावले !

अहमदनगर :- माजी खा. दिलीप गांधी यांची खासदारकी गेली, आता त्यांच्याकडे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष पद आहे. तेही काढून घेण्याचे घाटत आहे. त्यानंतर अर्बन बँकेत पानीपत करण्याची तयारी गांधी विरोधकांनी चालवली आहे. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. नगरमधील वैभवशाली आणि 109 वर्षाचा वारसा असलेल्या या बँकेचे नेतृत्व माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे असून त्यांच्या … Read more

नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित : खासदार गांधी

अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी … Read more

खा . दिलीप गांधी समर्थकांची भूमिका गुलदस्त्यात

अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले. पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. कंठ दाटून … Read more

खा.दिलीप गांधी म्हणतात पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी १ लाख कोटींचा निधी आणला !

अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे. मात्र … Read more