कोल्हे गटाचे नगरसेवक शहरातील विकासकामांना खोडा घालतायत

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्हा असो वा गाव राजकारण म्हंटले कि सत्ताधारी आणि विरोधक आमने – सामने येत एकमेकांची जिरविण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या या डावपेचात शहराची विकासकामे रोखली जातात असाच काहीसा प्रकार कोपरगावात सुरु असल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव शहराचा जाणीवपूर्वक विकास होवू द्यायचा नाही या उद्देशातून सर्व प्रकारचे निर्णय … Read more

राज्य मार्ग ६५ रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग ६५ वरील कोपरगाव–पढेगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातून राज्यमार्ग ६५ जात आहे. कोपरगावहून वैजापूरला जाण्यासाठी या मार्गाचा कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना उपयोग होत असतो. मात्र मागील काही … Read more

दारू पिऊन नवरा द्यायचा त्रास ! अहमदनगर जिल्ह्यातील महिलेने जे केले ते वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे नवरा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता. त्यामुळे पत्नी त्रस्त झाली होती. तिने आधी याबाबत अनेकवेळा पतीला समजावून सांगितले होते. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता. त्यामुळे भावाच्या … Read more

विश्वस्त मंडळाचा वाद न्यायालयात जाणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- उच्च न्यायालयाने घालून दिलेली नियमावली बाजूला सारून सरकार नैतिकतेच्या व्याख्येत न बसणा-यांची वर्णी साई संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याचे घाटत आहे; परंतु ज्यासाठी आतापर्यंत लढा दिला, ते सामाजिक कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. एकदा यादी जाहीर झाली, की त्याला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेतूनही नाराजी :- साई संस्थानच्या विश्वस्त … Read more

कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे राजकारण केले !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज कहरच केला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी पत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावाच्या मदतीने पत्नीने केला विजेचा शॉक देऊन पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या महिलेने आपला पती शिवनारायण नानाभाऊ सवंत्सर याचा आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन व नंतर दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी अटक आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकर उलटून दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर- मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकमाईनजीक डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास उलटला. त्या अपघातात एक मोटारसायकल चालक व तर टँकरचालक दोघेही ठार झाले. चालकाचे नाव समजू शकले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की टॅँकर ओव्हरटेक करत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सुरु होता बनावट दारूनिर्मितीचा कारखाना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरगाव व श्रीरामपूर विभागाच्या पथकाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर धाड टाकली आहे. दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी २०० लीटर स्पिरीट,३० लीटर तयार विदेशी मद्य व १८० मिलीच्या ४४० नामांकित ब्रॅण्डच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय देशी दारूच्या ३८४ भिंगरीच्या बाटल्याही मिळून आल्या. विदेशी दारूमध्ये इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडोवेल्स, विस्की … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; या महामार्गावर झाला टँकर पलटी, एक जण टँकर खाली…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास पलटी झाला आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. यात एक मोटारसायकल चालक जखमी झाला आहे तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच … Read more

कोपरगावात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिवसेनेचा ५५वा वर्धापन दिन शहर आणि उपनगरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर, तर कुठे कोविड योद्ध्यांचा सन्मान, नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप, … Read more

नगर जिल्ह्यातील ‘ या’राज्यमार्गासाठी अडीच कोटी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याकडे मागील काही वर्षापासून … Read more

रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर ! आ. काळे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-महाआघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदारसंघातील जिल्हा हद्द रस्त्याच्या (प्रजिमा ५) १६ किलोमीटर अंतराच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. याबाबत पत्रकात आमदार काळे यांनी म्हटले, की कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट … Read more

माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आंदोलनाची वेळ येते हे दुर्दैव

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया आहे. कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश … Read more

नगराध्यक्षपद व आमदारकी गेल्याने कोल्हे गटाने नीचपणाचा कळस गाठला!

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोपरगाव शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणार्‍या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन शहर पोलीस ठाण्यामध्ये जात थेट मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले. यावरुन नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे … Read more

खळबळजनक प्रकार ! नवविवाहितेला घरातून हाकलण्यासाठी तिच्यावर केला जादूटोणा

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरी येथील येवले आखाड्यावरील नवविवाहित तरूणीचा छळ करून तिला घरातून हाकलून लावण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोणा करण्यात आला. या घटनेबाबत श्रीरामपूर तालुक्यातील एका डॉक्टर पती व मांत्रिकासह एकूण सहाजणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अश्विनी विकास लवांडे या तरूणीचा विवाह 12 फेब्रुवारी … Read more

आशा सेवकांनी ‘ या’ आमदारांना दिले मागण्यांचे निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आशा सेविकांनी नुकतेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे. आशा सेविकांच्या अडचणी शासनदरबारी मांडू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम,जिल्हा आय टक सचिव नीता भोसले, गट प्रवर्तक निर्मला इंगळे, सुनंदा सोनवणे, सीमा … Read more

माणुसकीच्या आधाराने जळीत झोपडी पुन्हा उभारली

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात काही दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे एका आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली होती. करंजी शिवारातील भिमा गायकवाड,त्यांची पत्नी सत्यभामा आणि पौर्णिमा व साई ही दोन मुलं असे मोलमजुरी करणारे कुटुंब या झोपडीत राहात. सकाळी मोलमजुरी करुन पोटाची उपजिवीका भरण्यासाठी बाहेर पडलेले हे कुटुंब सायंकाळी घरी … Read more

शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ माजी आमदाराला तात्काळ अटक करावी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांना त्वरित अटक करावी अशा आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार अवैध कामाची पाहणी करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी … Read more