‘त्याच्या’ मृत्यूचे गूढ वाढले, श्वसनाचा त्रास हाेत असताना देखील….

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- तालुक्यातील आदिवासी शेतमजुराच्या मृत्युचे गूढ वाढत चालले आहे. एका शेतकऱ्याने  केलेल्या तक्रारीनंतर खोदकाम करून सुभाष निर्मळ याचा मृतदेह शनिवारी  बाहेर काढला होता. या आदिवासी मजुराच्या मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न उभे राहत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहेत, तर तपासावरही संशय निर्माण होऊ लागला आहे. मृत सुभाष निर्मळ (वय ५०) … Read more

खासदार हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट

मुंबई, दि. ११ : मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.

विधानसभा उपाध्यक्षांकडून स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजारांची मदत

नाशिक दि. ११ – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न होत असून, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या कोरोना नियंत्रणासाठी पेठ तालुक्यातील पेठ ग्रामीण रुग्णालय व सात-बारा केंद्र आणि दिंडोरी तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय व दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजार रुपयांची … Read more

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.११ : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग- व्यवसाय सुरु होतील, असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे मात्र हे करताना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो … Read more

‘आधी धर्मगुरूंशी चर्चा करा मग विलगीकरण करा’…

करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलग करणे आवश्यक आहे. त्यानुसारच सरकार पावले उचलत आहे. कारण संपर्गाची साखळी तुटली तरच कोरोंना आटोक्यात येणार आहे. मात्र, मुस्लिम लोकांना विलग करताना मुस्लिम उलेमांशी अर्थात धर्मगुरूंशी चर्चा करायला करावी, त्यांना विश्वासात घेतले जावे. त्यानंतरच विलगीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीवजा सूचना करणारे एक पत्र जामिया अरबिया इस्लामिया, नागपूरचे सचिव मौलाना … Read more

महत्वाची बातमी : ‘त्यांना’ आता अहमदनगर मध्ये ‘नो एण्ट्री’ !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लाॅकडाऊन शिथिल झाल्याने अनेक मजूर, नातेवाईक नगरमध्ये वास्तव्याला येत आहेत. परवानगी असेल, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. परवानगी असेल त्यांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जातील. अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात १७ प्रभाग सुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह नगरसेवकांचाही … Read more

लंडनमधील ६५ भारतीय पुण्यात दाखल ; महापालिका घेतीये खबरदारी

लॉक डाऊनमुळे राज्यांबरोबरच इतर देशातही भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीम राबविली जात आहे. रविवारी लंडनहून ६५ लोकांना पुण्यात आणण्यात आलं असून करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीनं खबरदारी म्हणून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी कार्यकारी अभियंते युवराज देशमुख यांची नियुक्ती केली आहे. परदेशातून … Read more

पुण्यामधील NIV ने तयार केली ‘कोविड१९ अँटिबॉडी’चा शोध घेणारी पहिली स्वदेशी किट

पुणे कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढ्यामध्ये भारताने अजून एक यश मिळवले आहे. पुण्याने आणखी एक मोठं काम करत पुण्यातल्या National Institute of Virologyने पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.”पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड१९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी मोफत बस प्रवासाचा निर्णय रद्द ;असे असतील दर

पुणे : राज्यात ठिकठिकाणी अडकलेले मजुर, कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी शासन मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन होते. परंतु शासनाने हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीने प्रति बस प्रति किलोमीटर ४४ रुपये तिकीट दर निश्चित केला आहे. सुरक्षित अंतरासाठी एका बसमध्ये जास्तीत जास्त २२ प्रवासी असतील. त्यानुसार या प्रवाशांकडून किलोमीटरप्रमाणे … Read more

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच; घेतला चौथा बळी

पुणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असुवुन रविवारी चौथा बळी गेला. भोसरी येथील ८१ वर्षीय महिलेचा पुण्यात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णांची संख्या १६९ झाली असून आतापर्यंत ८१ जण कोरोना मुक्‍त झाले आहेत. यापूर्वी शहरात उपचार घेणारे मात्र हद्दीबाहेर रहिवासी असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या … Read more

घरी निघालेल्या पादचाऱ्यास लुटले

पुण्यात कामानिमित्ताने राहत असलेला व लॉकडाउनमुळे अडकून पडलेला तरुण यवतमाळ येथे आपल्या घरी पायी निघाला असताना अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील संगम ब्रिज परिसरात लुटण्याचा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पायीच घरी निघालेला हा युवक रात्रीच्या वेळी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आला असता काही युवकांनी त्याचा मोबाइल; तसेच त्याचे साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न केला; … Read more

लॉकडाऊनच्या काळात शिर्डी देवस्थानच्या देणगीत दिवसाला ‘एवढी’ घट

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या काळात शिर्डीच्या साईसंस्थानला मिळणाऱ्या देणगीत दिवसाला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे. साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची … Read more

दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई लॉकडाऊनमुळे सापडली

डोंबिवली/प्रतिनिधी मदर्स डे च्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत एक आनंददायक गोष्ट घडली. दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई लॉकडाऊनमुळे सापडली. सामाजिक कार्यकर्त्यांची प्रयत्न आणि मनसे आमदार राजू पाटील यांचं पाठबळ मिळाल्याने माय-लेकाची भेट झाली. स्मृतिभ्रंश झाल्याने दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई सापडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद होता. लॉकडाऊनच्या काळात डोंबिवलीच्या पलावा जंक्शन परिसरात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते समीर कोंडाळकर, हसन खान आणि … Read more

अहमदनगरकरानों काळजी घ्या ! जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा, वाचा महत्त्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  कोरोना व्हायरस तसेच लॉकडाऊन चे संकट सुरु असतानाच आता अवकाळी पाऊसही बळीराजाची चिंता वाढविणार असल्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने राज्यभरात पावसाचे संकेत दिले आहेत.रविवारी (ता.१०) अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आजही पुढील तीन ते चार तासात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा, मुंबई हवामान विभागाने दिला … Read more

भीषण अपघातात अ‍ॅम्बुलन्सचा चुराडा, दोघां मृत्यू

सांगली अ‍ॅम्बुलन्स आणि ट्रकच्या सामोरा समोर झालेल्या अपघातात अ‍ॅम्बुलन्सचा अक्षरशः चुराडा झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. सांगली इस्लामपूर रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे अ‍ॅम्बुलन्स आणि गुजरातला पोत्याचे बारदाने घेऊन जाणाऱ्या ट्रकचा सामोरा समोर अपघात झाला. सांगली-इस्लामपूर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाबाजूचा जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. सांगलीहून इस्लामपूरकडे … Read more

‘सेहवाग खोटारडा’, शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता. मात्र याच कसोटीवेळी आणखी एक घटना घडली होती त्याबद्दल सेहवागनेच खुलासा केला होता. त्यावेळी त्याने ‘बाप हा बाप असतो’ चा किस्सा खूप गाजला होता. हेलो अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला की, विरेंद्र सेहवागनं … Read more

धक्कादायक! भारतात येत्या 30 दिवसात होतील साडेपाच लाख कोरोनाचे रुग्ण

सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (IIT) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या 30 दिवसांत कोरोना संसर्गाच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. यानुसार भारतात येत्या 30 दिवसांत 5.5 लाख प्रकरणे समोर येतील. संशोधकांच्या पथकाने सांगितले की सध्या लॉजिस्टिक पद्धतीने 30 दिवसांत 1.5 लाख आणि घातांकीय (एक्सपोनेंशिअल) पद्धतीने 5.5 … Read more

अबब चिंताजनक! 24 तासांत वाढले रेकॉर्ड ब्रेक रुग्ण

नवी दिल्ली भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस फोफावतच चालला आहे. मागील २४ तासांत भारतात तब्बल ४ हजार 213 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आता भारतात रुग्णांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे. तसेच मागील 24 तासात जवळपास 97 लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी भारतात यापूर्वी 24 तासात 3900 रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या … Read more