लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६३ गुन्हे दाखल

मुंबई दि. ८ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३६३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे … Read more

कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा

पुणे, दि. 8 : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. पुणे … Read more

तामिळनाडूतील ४८० जणांना घेऊन एसटीच्या १६ बस रवाना

सांगली, दि. 8 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 जणांना घेऊन एस.टी  महामंडळाच्या 16 बस रवाना झाल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनीय होता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलम, तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ … Read more

चिंताजनक! कोरोना आता पोहोचला लष्करात; दोन जवानांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोना विषाणूने देशभर धुमाकूळ घातला असून याचा धोका वाढतच चालला आहे. आता याने आणखीन चिंता वाढवून ठेवली आहे. कोरोनाने आता लष्करात घुसखोरी केली आहे. यामुळे दोन बीएसएफ जवानांचा मृत्यू झाला असून नवीन 41 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोनाची बाधा झालेल्या जवानांची संख्या 193 झाली आहे.दरम्यान, देशभरातील … Read more

तरुणीची गळफास घेवून, व तरुणाची रल्वेखाली आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत तरुणीने गळफास तर तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या. पहिली घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे राहणारी तरुणी प्राजक्त अविनाश ओहोळ हिने रहात्या घरात अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली . ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी खबर राहरी पोलिसात दिल्यावरुन अमनं . ४५ नोंदविण्यात आला. … Read more

सावधान! आता सेक्समुळे होऊ शकतो कोरोना; शास्त्रज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- कोरोनाने नागरिकांना जेरीस आणले आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींद्वारे कोरोना पसरतो हे माहित असल्याने लोक अनेक गोष्टी करण्यापासून दूर राहू लागले आहेत. परंतु आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते. पुरुषांच्या स्पर्ममध्ये शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरस सापडला आहे. त्यामुळे चीनमध्ये … Read more

मुंबईतून रिक्षाने श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ सर्वांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- मुंबईच्या नालासोपारा परिसरातून दत्तनगर परिसरात पाचजण रिक्षाने श्रीरामपुरात आल्यानंतर परिसरातील लोकांनी सरपंच व इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांना हे कळवल्यानंतर आरोग्य विभागाने या पाचही तपासणी केली. मात्र, यापैकी तिघांना नगर येथे पाठवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी एक पुरुष, दोन महिला … Read more

‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त,चारही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण निगेटिव्ह …

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- नेवासे तालुक्यात आढळलेले चारही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण निगेटिव्ह झाल्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील दुसरा व नेवासे तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण १४ मार्चला निष्पन्न झाला. हा रुग्ण परदेश वारी करून आला होता. हा रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी आल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर २७ मार्चच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’भाग २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- संगमनेर शहरातील ईस्‍लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्‍ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास 2 कि.मी चा परिसर हा कोअर एरिया म्‍हणून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याकडून तलवारीने वार करून जावयाची हत्या !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- घरघुती वादातून सासऱ्याने मित्रांच्या मदतीने दारुच्या नशेत लोखंडी पाइप व तलवारीने वार करून जावयास ठार केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. मयूर आकाश काळे (वय २८, मूळ कर्जत, हल्ली मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सात रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले. आता आलेल्या अहवालानुसार बाधित … Read more

वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल ?

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’तालुक्यात पुन्हा आढळले पाच कोरोना रुग्ण,नागरिकांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर!

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा ०५ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या ४९ झाली आहे. संगमनेर येथील ५९ वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे, संगमनेरकरांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी … Read more

रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने मदत करावी

लातूर, दि. ८ : जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले. या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे. भारतीय रेल्वेनेही या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची  मदत द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘स्नेह सेतू’ चा आधार

मुंबई, दि. ८ : कोरोना संकटाच्या या गंभीर परिस्थितीत राज्यातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी दूरध्वनीद्वारे स्नेहाचा संवाद साधून आपुलकीची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य ‘स्नेह सेतू’ या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या संकल्पनेतून साझा संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज संगमनेर शहरातील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. संगमनेर शहरातील एक 59 … Read more

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा

भंडारा, दि.८ :- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी  प्रभावी उपाय योजना राबवून जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जिल्हा परिषद, नगरपरिषद व नगरपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली  पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९८ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. ८ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९० घटना घडल्या. त्यात ६८६  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार  ९८,७७४ गुन्हे नोंद झाले असून १९,०८२ व्यक्तींना … Read more