खडू शिल्पातून दाखविली कोरोनाची भयानकता आणि उपाय …कोरोना हारेल, विश्‍व जिंकेल !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना नावाच्या विषाणूरुपी राक्षसाने संपूर्ण विश्‍वालास आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो लोकांना मृत्यूच्या लाटेत लोटणार्या या महाभयंकर राक्षसाचा सामना केवळ आणि केवळ आपण सर्व मिळूनच करु शकतो. यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, अत्यंत आवश्यक आहे. या महत्वाच्या सूचना आणि राक्षसरुपी या विषाणूची भयानकता छोट्याशा खडू शिल्पात कोरली आहे. नगरच्या … Read more

कोरोनाच्या काळात अंधांसाठी आ. संग्राम जगताप आले धावून !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना संसर्ग विषाणूमुळे प्रत्येक मनुष्यावर एक संकट आले आहे. त्यात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे अनेकांच्या उपजिविकेचे साधन बंद आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटकाळामध्ये अंधांची रोजीरोटीच बंद झाली आहे. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र अहमदनगरचे 270 अंध सदस्य आहेत. शहरातील 35 अंधांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनिल राठोड यांच्यावर बहिष्कार ! ‘त्या’प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल माजी आमदार यांनी अपशब्द वापरुन फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील जनतेचा अपमान केल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. प्रशांत गायकवाड हे दलित चळवळीतील एक कार्यकर्ते आहेत. माजी आमदार राठोड यांच्या डोक्यातील जातीय मानसिकता बाहेर पडली आहे. चुकीच्या पद्धतीने गलिच्छ भाषा वापरत माजी … Read more

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ‘या’ वेळेत बंद

अहमदनगर जिल्‍हयातील नागरी व ग्रामीण भागातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, पेट्रोल पंप, एटीएम इ. अत्‍यावश्‍यक सेवा, कार्यालये, आस्‍थापना वगळून इतर सर्व दुकाने दिनांक १७ मे, २०२० रोजी पर्यंत संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच या कालावधीत उपरोक्‍त अत्‍यावश्‍यक सेवा वगळून इतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव्ह ! वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची माहिती

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  दि.०५ – जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव आला आहे तर जामखेड येथील ०४ तर संगमनेर येथील ०३ … Read more

अहमदनगर ब्रेकींग : …म्हणून लाठीचार्ज करून दारू दुकानांना ठोकले सील !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरात आज दुपारी दारू विक्रीच्या दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नसल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केला. तसेच तीन दुकानांना प्रशासनाने सील ठोकले. पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिका यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ . आर. शेख यांनी तीन … Read more

‘येथून’ दारूचा मोठा साठा चोरीस

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- वडगाव गुप्ता परिसरातून परमिट रूम फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक अशोक गायकवाड (रा. सिव्हिल हडको, नगर) यांचे नगर-मनमाड रस्त्यालगत वडगाव गुप्ता परिसरात परमिट रूम आहे. रेनॉल्ट शोरूम शेजारी असलेल्या या परमिट रूमची पाठीमागील खिडकी … Read more

अहमदनगर शहरात अशी चालू आहे दारू विक्री पहा फोटोज …

शहरात वाईन शॉप वर दारू घेण्यासाठी मद्यपींच्या लागलेल्या रांगा.. (छाया- वाजिद शेख-नगर) मद्य विक्रीला परवानगी दिल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती. ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे . तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत.

..तर 10 वी व 12 वीचे निकालही लांबण्याची शक्यता

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता निर्धारित स्थळी पोहोचविण्यासाठी लॉक डाऊन मध्ये सूट मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याची माहिती शिक्षक … Read more

कोरोनाच्या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांसह जिल्ह्यातील माजी सैनिक देखील सज्ज !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे राहण्यासाठी माजी सैनिकांनी देखील पुढाकार घेतला आहे. सिमेवर व संकट काळात देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील 219 माजी सैनिकांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली. … Read more

बिअर बारमालकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  औरंगाबादच्या पुंडलिकनगरातील रहिवासी प्रसिध्द बिअर बार मालकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोटाच्या आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलसांनी व्यक्त केला आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरमधील शैलेश बिअर बारचे मालक अशोक पांडुरंग जाधव (५९) यांनी रविवारी रात्री परिवारासह जेवण घेतले. त्यानंतर त्यांनी रात्री दोनच्या सुमारास … Read more

आता पोल्ट्री व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार ! 

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- चिकन तसेच अंड्डयांना मागणी वाढत चालली आहे. सध्या उत्पादन कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्­यता आहे. चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो, या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. भीतीपोटी चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली होती परिणामी विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला परंतू तो निष्फळ ठरला. सोशल … Read more

अजानला परवानगी कशी दिली? शिवसेना-भाजपने प्रशासनाला केला सवाल

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  रमजानच्या काळात अजानला परवानगी देण्यात आली. यामुळे कोरोनाच्या संसर्ग वाढू शकतो. काही समाजातील सण घरात साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मशिदीतून अजान करण्यास परवानगी का दिली. मात्र या निर्णयामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असा नगर शहरातील शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचे … Read more

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

मुंबई, दि. 5: लॉकडाऊन कालावधीत करण्यात आलेल्या वाढीच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर), मालेगाव महानगरपालिका, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती 5 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 22 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर) … Read more

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज  ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी … Read more

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड, दि. 4 : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी … Read more

अहमदनगरमध्ये वाईन शॉपसमोर लागल्‍या रांगा!

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे . तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी … Read more

लॉकडॉऊनच्या काळातही जनतेला नागरी सेवा उपलब्ध करुन देणार – डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि.4 :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच जिल्हयातही लॉकडाऊन सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचेही सहकार्य मिळत आहे. या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाउनच्या तिसऱ्या … Read more