पहिल्याच पावसात वाहून जाणार हा रस्ता…. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण रक्कम जाणार ठेकेदाराच्या घशात !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगलाताई लोखंडे, सुरेखाताई कदम यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने पालिकेमध्ये पत्रव्यवहार करून 2016 व 17 मध्ये मंजूर करून घेतलेले काम मदवाशा दर्गा ते जुनी मनपा, आशा टॉकीज ते कृष्णा मिसळ, गणेश मंदिर ते पाचपीर चावडी चौक व वाडिया पार्क ते … Read more

टाळेबंदीत अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम प्रगतीपथावर स्थानिक नागरिकांचा विरोध !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरात विनापरवाना मोबाईल टॉवरकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत असतना, टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेकडे सदर काम बंद करण्याची तक्रार करुन देखील महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने दोनशे स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन चोभे मास्तर यांनी जिल्हाधिकारी … Read more

नगर तालुक्यातील या गावात १० दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचा जोर कायम आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे देखील कोरोनाचा विस्फोट झाला होता. या पार्श्वभूमीवर गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. जेऊर येथे मागील महिन्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला होता. येथे आजपर्यंत … Read more

बोल्ड चित्रपटाला नकार दिल्याने मोठी किंमत चुकवावी लागली !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- मोठ्या दिग्दर्शकाने अपमान केल्याचे अभिनेत्री प्राची देसाईने एका मुलाखतीत सांगितले. तिच्या मते, तिला बोल्ड दिसण्यासाठी फोकस करावा लागेल, असे सांगण्यात आले होते. सेक्सिस्ट चित्रपटाच्या आॅफर येत होत्या… त्या चित्रपटाला नकार दिल्यामुळे मोठी किमत चुकवावी लागली. त्यांनी माझी नकारात्मक प्रतिमा तयार केल्याचे ती सांगते. प्राची म्हणाली, मी कधी अशा … Read more

रस्ता बंद केल्याने संतप्त रहिवाशांचा रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला येथे मोठेबाबा वाडीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तींनी रात्रीच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला. सार्वजनिक रस्ता पूर्ववत करावा, या मागणीसाठी संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी ( दि. २१) सकाळी ९ वाजता लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर नान्नजदुमाला येथे रास्तारोको आंदोलन छेडले. एकतास सुरु असलेल्या रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. … Read more

खबरदार!जर खते व बियाणांचा काळाबाजार केल्यास ‘ही’ कारवाई होईल!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा आवश्‍यक पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या याआदेशानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. खरीपाच्या पेरणी दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बी-बियाणे व खतांची साठेबाजी व काळाबाजार होऊ नये. यासाठी कृषि विभागाने १५ भरारी पथके नियुक्त केली आहेत. जर या भरारी पथकांना बी-बियाणे … Read more

लक्षणे असतील तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हा..

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोरोना संबंधित आकडेवारी चिंताजनक असून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही. खासगी दवाखान्यात उपचार घेऊन काही रूग्ण होम क्वारंटाईन होण्यावर भर देतात; मात्र तसे केल्याने कुटुंबासह आजूबाजूच्या नागरिकांनाही संक्रमित करण्याचा धोका निर्माण होतो. हे सर्व टाळण्यासाठी कोपरगाव तालुका प्रशासनाच्या निगरानीखाली असलेल्या कोणत्याही कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे. … Read more

कोरोना संसर्ग झाल्याने डॉ. किरण लहामटे उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोनाचा संसर्ग झाल्याने अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक आहे. काही दिवसपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सगमनेर येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. डॉ. जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र बुधवारी सकाळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा दूध संघ मोफत चारा बियाणे देणार !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आधार मिळावा, यासाठी जनावरांना चारा पिकासाठी ११० मेट्रिक टन मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदचे व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली.देशमुख म्हणाले की, जगभरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान … Read more

संगमनेरची दहावीची विद्यार्थिनी संसाराच्या परीक्षेला समोरे जाता जाता वाचली…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने संगमनेर तालुक्यातील कौठे कांबळे येथील दहावीतील ही विद्यार्थिनी बालवयातच संसाराच्या परीक्षेला समोरे जाता जाता वाचली. कौठे कांबळे येथील एका कुटुंबाने दहावीत शिकरणाऱ्या मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी (२२ मे) हे लग्न होणार होते. अॅड. रंजना गवांदे यांनी याची खात्री करून संगमनेर … Read more

खासदार डाॅ. विखेंच्या मदतीमुळे तरुणाची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सर्जेराव मच्छिंद्र माळी या ३३ वर्षीय तरुणाने २२ स्कोअर असतानाही सहा दिवसांत कोरोनावर मात केली. मुळानगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांचे भाचे सर्जेराव मच्छिंद्र माळी याने १४ मे रोजी नगर येथे अँटीजेन तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह निघाला. अर्जुन यांनी माजी सरपंच … Read more

आम्हाला गोळ्या घालून एकदाच मारून टाका ! माजी खासदार तनपुरे यांच्या समोरच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे वांबोरीत आले असताना, त्यांच्यासमोरच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे व प्रा. राधेशाम पटारे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्थानिक पातळीवरील राजकारणात धुमसत असलेली शेरेबाजी समक्ष झाली. वांबोरी ग्रामपंचायतीत बैठकीनंतर सरपंच व सदस्यांच्या वतीने खासदार तनपुरे यांचा सन्मान करण्याचे नियोजन होते. परंतु, … Read more

नागरिकांत भीतीचे वातावरण ! माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-   केडगाव परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी मनपा विद्युत विभागाने उपाय योजना करण्यात याव्या. बंद पथदिवे सुरू करावेत. तसेच एलईडी पथदिवे लवकरात लवकर बसवण्यात यावे अन्यथा पूर्व सुचना न देता कोरोना नियमाचे पालन करित लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला … Read more

मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: करोना पसरवला आणि आता रडतायत !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र … Read more

जिल्ह्यात किती लाख लोकांनी घेतली कोरोनाची लस ? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला झोडपून काढलंय आणि अशात लशींच्या कमतरतेमुळे संकट जास्त गडद झालं आहे. जिल्ह्यात 13 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांत 6 लाख 15 व्यक्तींनी करोनाची लस घेतली असून यात 4 लाख 81 हजार व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 33 … Read more

म्युकरमायकोसिसचा फैलाव संपूर्ण देशात ! अशी असेल गोळ्या आणि इंजेक्शन्सची किंमत..

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचा (काळी बुरशी) हा आजार जडत आहे. महागडी औषधे व दीर्घकालिन उपचारामुळे या आजारावरील उपचाराचा खर्च आठ ते दहा लाख रुपयांवर जात आहे. कोविड -19 मधून बरे झालेल्या बर्‍याच रूग्णांना म्युकरमायकोसीस नावाचा एक दुर्मिळ आणि प्राणघातक बुरशीजन्य संसर्ग असल्याचे आढळले आहे, ज्याला काळ्या बुरशी … Read more

दवाखान्याच्या कचऱ्याचा ढीग रस्त्यावर बेवारस… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सर्वत्र नागरिक धास्तावले आहे. यातच या महामारीविरुद्ध सुरु असलेली जीवघेणी लढाई पाहता दवाखाना नको असाच पवित्रा नागरिक घेत आहे. एकीकडे स्वतःसह परिसराची काळजी नागरिक घेताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दवाखान्यातील कचऱ्याचा ढीग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केडगाव बायपासलगत आणून … Read more

जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 243 कोटींची एफआरपी थकविली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 423 कोटींची एफआरपी थकविली आहे. दरम्यान कोरोनाच्या महामारीने आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना हातीही पैसाही नसल्याने बळीराजा मोठा हतबल झाला आहे. कोरोना सारख्या संकटामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करण्याऱ्या बळीराजाला आता स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी साखर कारखान्यांचे उंबरे झिजावू लागले आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने … Read more