शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदसाठी नगर तालुका युवक काँग्रेस उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप संकटात सापडला आहे केंद्राच्या जुनी सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करून या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. आज सबंध देश हा पेटून उठला आहे नगर तालुका युवक काँग्रेस या देशातल्या कोटदी शेतकऱ्यांसाठी महिन्यात उतरली आहे असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट यांनी केले आहे. … Read more

आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे. असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया … Read more

रणजीतसिंह डिसले यांच्या सारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांना मिळाला या बद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. श्री. डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी … Read more

महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांनी थेट शरद पवारांना दिले प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि,राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस … Read more

थोरात यांच्या माध्यमातून आंबेडकरांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. या घटनेने सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला. बाबासाहेबांचे विचार हे समाजासाठी अत्यंत प्रेरक असून ते त्यांच्या भव्य स्मारकाच्या माध्यमातून समाजातील तरुणांसह सर्व घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण … Read more

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व … Read more

कृषी विधयेकाविरोधात महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला. या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. कृषी विधेयक मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कॉँग्रेसच्यावतीने पाठिंबा जाहिर करण्यात आला. केंद्र सरकारने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. २६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात नादुरुस्त रस्त्यांच्या समस्येने नागरिक हैराण

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्‍यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या … Read more

सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात: बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे. तो जो काही कृषी कायदा केलेला … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात चाललंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.  त्यातच महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात सध्या कायदा – सुव्यवस्था अक्षरश वाऱ्यावर असलेली दिसून येत आहे.  संगमनेर शहरातील एका मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या खोलीमधून अज्ञात … Read more

वीजबिल मुद्यावरून महसूलमंत्र्यांकडून ऊर्जामंत्र्यांची पाठराखण

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-सध्या राज्यात वाढीव वीजबिल मुद्दा चांगलाच तापला आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना आलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या मुद्यवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. अशातच एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा … Read more

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनीतीकार नेते गमावले आहेत, अशा शब्दांत आपल्या शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत. खासदार अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्री. थोरात म्हणाले की, … Read more

करोना रुग्णांचा आलेख वाढतोय; महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना करोनापासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

EDच्या छापेमारीवरून महसूलमंत्री थोरात म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज (२४ नोव्हेंबर) ईडीने छापा टाकला आहे. छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, ‘केंद्रीय … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अद्यापही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. संगमनेर शहर पोलिसांनी काल दुपारी शहरातील मालदाड रोड परिसरातील अवैधरित्या पानमसाला बाळगणार्‍या फेरीवाल्यांवर छापा टाकून त्याच्याकडून साडे दहा हजारांचा गुटखा जप्त केला … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- हाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत असल्याची भावना महसुल मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाशिक मध्ये व्यक्त केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे … Read more

सत्ता गेली पण भाजपची खोटारडेपणाची सवय गेली नाही !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून … Read more