जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे मंत्री थोरातांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातून रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. ज्यात अकोले ते संगमनेर कोल्हार-घोटी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी मंत्री … Read more

स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग करून दिली ‘ही’ धमकी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- एमआयडीसीत एका कंपनीतील घरात घुसून स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. तसेच यावेळी आरोपींना अडवणूक करणाच्या महिलेचा पती व मुलाला देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की,  पीडित महिला एमआयडीसी येथे राहत असून, तिने दिलेल्या फिर्यादीत … Read more

केवळ दैवबलवत्तर म्हणून ‘ते’ तिघेजण बचावले?

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- गुजरात येथील तिन तरूण भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात होते. मात्र त्यांच्या कारला अपघात होवून ती तब्बल ६० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात केवळ देवाच्या कृपेनचे ते तिघे तरूण वाचले.ही घटना संगमनेर तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर असे की, देवदर्शनासाठी गुजरात येथून भीमाशंकराला कारने जात होते. सकाळी सहा वाजेच्या … Read more

जिल्हा बँक निवडणूक : भाजपच्या असंतुष्ट नेत्यांच्या मदतीने विखेंना दूर ठेवण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली . नगरच्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली. २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. त्यांचे निकाल आज जाहीर झाले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप ७, काँग्रेस ४ आणि शिवसेना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाला मिळाले तब्बल ३१ लाख !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची संकल्पना जनसामान्यांना भावली. त्यामुळे विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सर्वप्रथम जाधववाडीने बिनविरोध निवडणुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत बिनविरोध केली. तेथील विविध विकासकामांसाठी ३१ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने विकास कामांसाठी निधी कमी … Read more

सरकार बनवत आहे नवीन काळातील ‘खुफिया पोलिस’ ; ‘ह्या’वर ठेवणार नजर

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-   देशात डिजिटल व्यवसायांमध्ये लोक सतत ऑनलाइन फसवणूकीला बळी पडत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाने डिजिटल इंटेलिजेंस युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार संसाधनांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर  हे युनिट कडक कारवाई करेल. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या सूचनेनंतर हे पाऊल उचलले गेले आहे. ऑनलाइन फसवणूक … Read more

शिवसेनेची सत्ता व मुख्यमंत्री असूनही शिवसैनिकांवर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षाची महाआघाडी असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा धुरा सांभाळत आहे. शिवसेनेची सत्ता व मुख्यमंत्री असूनही नगरच्या शिवसैनिकांवर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे घरचाच आहेर मिळाला. अचानक खंडीत केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नगर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक … Read more

दिलासादायक ! देशातील कोरोनाबाधितांची संख्यामध्ये होतेय घट

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे देशभरात अनेकांचा प्राण देखील गेला आहे. मात्र आता वॅक्सीन लॉन्च करण्यात अली असल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून, शनिवारी ही संख्या ११७१३ होती. या संसर्गातून १ कोटी … Read more

निळवंडे धरणातून रब्बीसाठी आवर्तन

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचे दुसरे आवर्तन शनिवारपासून १३०० क्युसेकने शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणातून सोडण्यात आले. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून शनिवारी सायंकाळी ६ वाजता निळवंडे धरणातून १३०० क्युसेक्सने रब्बीसाठी दुसरे आवर्तन प्रवरा पात्रात सोडण्यात आले. हे आवर्तन सुमारे २५ दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती … Read more

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना एमआयडीसीतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ घडली. स्वप्निल राजेंद्र झगडे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ॲम्ब्युलन्स (क्र.एमएच ०४, एच ८६४) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी झगडे व त्यांचे … Read more

संगमनेर तालुक्यात दुचाकी चोरणारी टोळी झाली सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाचे भय मनात राहिले नसल्याने चोरटे देखील खुलेआम चोर्या करू लागले आहे, कारण चोरी झाली तरी केवळ काहीच चोरीच्या घटनांचा शोध लागत असल्याने चोरटे देखील निर्धास्त झाले आहे. दरम्यान … Read more

गडाखांचा दबदबा; पंधरा वर्षांनंतर हि ग्रामपंचायत झाली बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीमध्ये नेहमीच राजकीय आखाडा रंगायचा. याचा विकास कामांवर परिणाम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे. मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच … Read more

अहमदनगर-पुणे महामार्ग आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुक तसेच अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक दिनांक ३१ डिसेंबर, २०२० च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारी २०२१ च्या पहाटे सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी … Read more

दर्शनासाठी आलेली ती महिला बॉयफ्रेंड सोबत पळून गेली होती

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- साडेतीन वर्षांपूर्वी दिप्ती सोनी ही राजस्थान इंदुर येथील महिला आपल्या पती व मुलांसोबत शिर्डी येथे साई दर्शनाला आली होती. ती शिर्डीतून बेपत्ता झाली होती. तशी तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. शिर्डीतून मिसिंग झालेली हि महिला प्रियकराबरोबर निघून गेल्याचे पोलीस तपासात … Read more

पालकमंत्री नियोजन समितीची सभा कधी घेणार ? विकासाला चालना कधी देणार?

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- जिल्हा नियोजन समितीची मागील सभा गेल्या ११ महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर सभाच न झाल्याने जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करता आला नाही. त्यामुळे पालकमंत्री नियोजन समितीची सभा कधी घेणार, असा सवाल भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे. वाकचौरे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय काही केले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-कृषी कायद्यात ज्या बाबी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतक-यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतक-यांना दिशाभूल करताहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला केला आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या … Read more

नगर शहरात काँग्रेसचा होत असलेला विस्तार समाधानकारक : आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-एका सामान्य साखर कामगाराच्या मुलाला काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या युवक आघाडीचं जिल्हाध्यक्ष करायची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. स्मितलभैय्या वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात नुकताच … Read more

त्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नेमणूक

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस … Read more