धक्कादायक माहिती समोर ! कारागृहात असतानाही बाळ बोठेने केले ‘त्यांना’ फोन !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून आरोपी बाळ बोठे याने काही फोन केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी … Read more

बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. पारनेर उपकारगृहात आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते या मोबाईलचा वापर बाळ बोठे यांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे उपाधिक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा … Read more

तौक्ते चक्रीवादळ : जिल्ह्यातील ह्या ठिकाणी झाले सर्वाधिक नुकसान

मदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्‍यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. यात 67 शेतकर्‍यांना या वादळाचा फटका असून त्यात आंबा पिकाचे प्रमाण अधिक आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पंचानाम्यावरून ही बाब समोर आली असून सर्वाधिक बाधित गावे ही पारनेर तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात … Read more

आस्मानी संकटाचा फटका बळीराजाला; शेतमालाचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशातील काही राज्यांवर घोंघावणारे तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका अनेक जिल्हयांना बसला आहे. यातच या वादळाचा मोठा आर्थिक फटका नगर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्‍यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने मंगळवारी केलेल्या पंचनाम्यामध्ये नगर तालुक्यातील 3 गावांत … Read more

संतापजनक : प्रसिध्दीसाठी तहसीलदारांनी तो अंत्यविधी केला, मुलगा व नातेवाईक येत असताना देखील परस्पर अंत्यविधी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील तहसीलदार यांनी कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक आले नसल्याने त्यांनी स्वत: अंत्यविधी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यम व वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. पारनेर तहसिलदार यांनी वडिलांच्या अंत्यविधीसाठी येऊ नका सांगून स्वत:च अंत्यविधी उरकून प्रसिध्दी मिळवून त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आरोप मयताचा मुलगा रमेश खोडदे व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे … Read more

गुड न्यूज : अखेर कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतलीय. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुकडी प्रकल्पातून नियोजनानुसार गेल्या आठवड्यातच पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह चौघांनी केली हस्तक्षेप याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटींचा घोटाळा झाला आणि त्यामागे बँकेतील तत्कालीन संचालक मंडळांमधील राजकीय नेते असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली. मात्र आता या कर्ज वाटप गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी ‘बी’ समरी अहवाल दिल्याने कमकुवत झालेल्या या … Read more

सैनिक बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने भ्रष्टाचारी कर्मचार्‍या बरोबर अर्थपूर्ण संबंध ठेवत त्यांना पाठशी घातल्याने संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे व विनायक गोस्वामी यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी … Read more

आमदार लंके यांनी संगितली मन कि बात ! ‘या’ कारणामुळे आहे कोविड सेंटरला शरद पवारांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्या राज्यात आमदार निलेश लंके हे नाव चांगलेच गाजत आहे, सोशल मीडियावर लंके यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे. लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं आहे. या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी … Read more

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आमदार नीलेश लंके यांनी केली ही महत्वाची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या पती-पत्नी एकत्रीकरणासह इतर आंतरजिल्हा बदल्या शासन नियमांमध्ये रखडल्या आहेत. शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या विनाअट करण्यासाठी विचार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांकडे आमदार नीलेश लंके यांनी केली आहे. मागील सरकारने बंद केलेली आपसी आंतरजिल्हा बदली पुन्हा सुरू करण्यात यावी, … Read more

‘या’ तालुक्यात प्रत्येकाची घरोघर जाऊन कोरोना टेस्ट होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-पारनेर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अनेक दिवसांपासून तीनशेच्या आसपासच आहे. रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पारनेर शहरात प्रत्येक प्रभागात व घरोघर जाऊन प्रत्येकाची कोरोना टेस्ट करण्याचा निर्धार तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. महसूल विभाग, नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बोगस कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरात क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरने सुरू केलेल्या बेकायदेशिर कोव्हिड केअर सेंटरचा तहसिलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी पर्दाफाश केला. शहरातील प्रत्येक नागरीकाची रॅपिड चाचणी करून रूग्ण वाढीस आळा घालण्यासबंधीची मोहिम गुरूवारपासून पारनेर शहरात हाती घेण्यात आली आहे. तहसिलदार ज्योती देवरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत, गटविकास … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची पारनेर तालुक्यातील कोविड सेंटरला भेटी

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. यातच संबंधित अधिकारी जिल्हा दौरे करत आहे. यातच निघोज (ता.पारनेर) येथील संदीप पाटील कोविड सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी मेडिकल चालक , … Read more

आ.लंकेंच्या कोव्हिड सेंटरला देशविदेशातून तब्बल इतक्या कोटींची मदत जमा !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कोरोनाच्या वैश्‍विक महामारीत गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रात्रंदिवस रूग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देशविदेशातील नागरीकांनी शिक्कामोर्तब केले आहे !. आ. लंके यांनी कोरोना बाधित रूणांसाठी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरासाठी देशविदेशातून तब्बल सव्वा कोटींची रोख मदत जमा झाली असून माळवातील नागरीकांना तांदूळ तर … Read more

सुजित झावरे यांनी सुरु केलेलं कोविड सेंटर सर्वसामान्य लोकांसाठी दिलासादायक !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जि.प. माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पा.यांनी देवकृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील ३०० बेडचे कोविड सेंटर टाकळी ढोकेश्वर येथे केले असून, या ठिकाणी सर्व गरजू कोरोना रुग्णांना मोफत औषधउपचार व इतर सुविधा येथे पुरविल्या जात आहेत. तसेच कोविड सेंटरमधील दाखल अत्यवस्थ रुग्णांसाठी अहमदनगर … Read more

आमदार लंकेच्या कार्याचा विदेशात डंका…परदेशातून सरसावले मदतीचे हात

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके हे सध्या जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरला परदेशातून मदतीचा हातभार लाभतो आहे. लंके यांनी भाळवणीमध्ये कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन … Read more

कौतुकाची थाप ! हॅलो, मी अजित पवार बोलतोय, निलेश कसा आहेस…

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-देशात कोरोनाचा हाहाकार झाला आहे. यातच कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र सध्या देशासह राज्यात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके…. राज्यातील नेतेमंडळींकडून लंकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतेच लंकेना दादांनी म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

‘भाळवणी मॉडेल’ महाराष्ट्रात आदर्श ठरेल! आमदार लंके यांचे पोपटराव पवार यांनी केले कौतुक…

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाच्या संकट काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी झोकून देऊन आमदार निलेश लंके करीत असलेले काम राज्याला दिशादर्शक आहे. त्यांच्या या कामामुळे रुग्णांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होत आहे. संकट काळात धावून जाण्याचे ‘भाळवणी मॉडेल’ महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे मत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी … Read more