अहमदनगर ब्रेकिंग : पगार थकवल्याने शिपायाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील नांदूरपठार ग्रामपंचायतीच्या शिपायाने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. पगार थकल्याने ३६ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या वृत्ताला तहसीलदार ज्योती देवरे यांनी दुजोरा दिला.पगार नाही, शिवाय शेतीतून काहीही उत्पन्न येण्याची शास्वती नसल्याने राजू बबन आग्रे चिंतेत होता. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा … Read more

थकीत पगारामुळे वाढला कर्जाचा डोंगर; त्याने उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-कोरोनामुळे अनेक ठिकाणी बेरोजगारीचे वारे जोराने वाहू लागले आहे. नौकरी गेल्याने अनेक जण सध्याच्या स्थितीला आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच एका जणाने कर्जाचा वाढता डोंगर व थकीत पगार याला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील नांदूरपठारचा राजू बबन आग्रे … Read more

समाजसेवक आण्णा हजारेंच्या राळेगणात रंगतोय या पारंपरिक खेळाचा डाव

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- आंदोलनामुळे जगात ख्याती असलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीची नेहमीच देशात चर्चा होत असते. आंदोलन असो वा काही अण्णांचे गाव म्हंटले कि चर्चेचा विषय झालाच. मात्र याच अण्णांच्या गावात एक पारंपरिक खेळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. कोरोना … Read more

पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला – आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची ग्वाही देतानाच शहराचा वर्षानुवर्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आपणच सोडवणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. पारनेर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते पार पडले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटली … Read more

वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेतला, परंतु…

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कुकडी नदीच्या पुरात हात-पाय धुण्यासाठी गेलेला इसाक रहेमान तांबोळी (वय ३५, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा रिक्षाचालक तोल जाऊन पाण्यात पडल्याने वाहून गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमरास घडली. पोलिसांनी बुधवारी दिवसभर रिक्षाचालकाचा शोध घेतला, परंतु उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. रांजणगाव गणपती येथील उषा सुरेश … Read more

दिखाव्यासाठी केली पोलिसांनी कामगिरी… मोठे सूत्रधार मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी देखील कारवायांना सुरुवात केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या या कारवाया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. गुटखा कारवाई नंतर आता जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पोलिसांची एक कारवाई सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे मोठया प्रमाणात दारूचा अवैध … Read more

वंचित बहुजन आघाडीचे २ नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन.

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-पारनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील तरुणाच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा योग्य पध्दतीने तपास करावा व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना पारनेर पोलिसांनी त्वरित अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य … Read more

के.के.रेंज प्रश्‍नी आदिवासी समाजाने मानले आ.निलेश लंके यांचे आभार

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-के.के. रेंजसाठी भूसंपादन केले जाणार होते, यासर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचे आदिवासी समाजामध्ये फार भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण या भागांमध्ये मोठया प्रमाणात आदिवासी समाजाची संख्या असून बरेच्या लोकांचे उपजीविकेचे साधन शेती हे आहे. या भागातील आदिवासी समाज हा शेती आणि आपल्या पारंपारिक व्यवसायामुळे उपजीविकेचे साधनतून मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहणारा … Read more

किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांनी केली कोट्यवधींची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सुमारे दोन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली होती. आता याच योजनेमध्ये काही अपात्र धारकांनी शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारनेर तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये सुमारे दोन हजार 367 करदाते व 219 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन … Read more

गावकऱ्यांसाठी वरदान ठरलेला तो तलाव तुडुंब पाण्याने भरला

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वदूर झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्या, ओढे, तलाव, हे पाण्याने तुडुंब भरून निघाले. यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यातच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण … Read more

कांदा उत्पादकांना अच्छे दिन ! ‘या’ कारणामुळे भाव वाढले

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवार दि. 18 रोजी झालेल्या लिलावामध्ये 80 रुपये प्रति किलो भाव कांद्याला मिळाला असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे. प्रथम प्रतीच्या कांद्याला 6500 ते 7500, द्वितीय प्रतीच्या कांद्याला 5500 ते 6400, तिसर्‍या प्रतीच्या कांद्याला 4000 ते 5400, चौथ्या 2500 … Read more

वाद न घालता विकास कामे मार्गी लावू : आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या तिनही पक्षांचे सरकार असून या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पारनेर – नगर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर मतदारसंघाची जबाबदारी टाकल्याने स्थानिक पातळीवर वाद न घालता आघाडीच्या सर्व घटक पक्षांना समान न्याय देऊन विकासाचा अनुशेष … Read more

२२ लाखांच्या फसवणूकप्रकरणी एका आरोपीस अटक

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- बनावट अधार कार्ड तसेच बनावट व्यक्ती उभ्या करून सुप्यातील सव्वादोन गुंठे प्लॉटची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील एकास पारनेर पोलिसांनी अखेर अटक केली. या रॅकेटमधील आणखी दोघा मास्टर माईंडसह चार आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणात रूपेश शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली. दुसरा आरोपी अजित सोनवणे हा आजारी असल्याने पोलिसांच्या … Read more

के. के. रेंज बाबत आमदार निलेश लंके यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- के. के. रेंजसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील 23 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींचे हस्तांतर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्यता दिली होती. 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती, असा गौप्यस्फौट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. फडणवीस व … Read more

देशी दारूचा साठा जप्त… या तालुक्यात पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. यास रोख बसावा यासाठी पोलिसांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. पारनेर तालुक्यातील पळशी येथील पोपट उर्फ पप्पू भाउसाहेब गायकवाड (वय २२ रा. भिल्ल वस्ती, पळशी) हा त्याच्या घराच्या आडोशाला विना परवाना बेकायदा देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याला पारनेर पोलिसांच्या पथकाने रंगेहात … Read more

भाजप सरकारच्या पापाचे खापर आमच्या सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील के. के.रेंजच्या जमीन हस्तांतराचा मुद्दा थेट दिल्लीवारी करून आला आहे. जमीन हस्तांतराच्या मुद्यावरून उत्तरेकडील भूधारक शेतकरी चिंतेत होते. मात्र याबाबत तोडगा निघाला असून यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. के. के. रेंंजसाठी लष्कराला जमिनी देण्यावरुन … Read more

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या भामट्यास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात अवैध धंदे, काळाबाजार वाढला आहे. अशा महाभागांविरोधात पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. यातच घरगुती गॅसच्या इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या एका भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती वापराचा गॅस वाहनांसाठी इंधन म्हणून विक्री करणाऱ्या विनायक चंद्रकांत झंझाड या भामटयास पारनेर पोलिसांनी गॅस टाक्या, वाहनात गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन … Read more

पतीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नीने केली आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच कटुंबिक हिंसाचार, महिलांची छळवणूक आदी घटनांमुळे आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. नुकतीच पारनेर तालुक्यातील एका पत्नीने आपल्या पतीच्या छळास कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. दारू पिणाऱ्या पतीकडून चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील … Read more