विखे पाटील यांचा स्वताच्या गावात पराभव तर राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यांचं गाव असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांनी राहता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. अचूक नियोजनाच्या बळावर त्यांना राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश आलं. तालुक्यातील 25 … Read more

माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव राजकारणात सक्रिय; आईविरोधात उभ केल पॅनल

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतात असतात. पुण्यात जेष्ठ दाम्पत्याला मारहाण केली म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी उचली आहे. हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या मुलाच्या वतीने त्यांनी ग्रामपंचायतीला उमेदवार उभी करण्याच घोषणा केली आहे. माजी आ. हर्षवर्धन … Read more

राज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या … Read more

भाजपच्या नेत्याची थेट मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात टीका..वाचा काय म्हणाले ?

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा … Read more

पंगा पडेगा महेंगा… तुझा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी आग ओकणाऱ्या कंगना विरोधात शिवसेना एकटवली असून तिचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. नगरमध्ये शिवसेनेने आज कंगनाचा फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत आंदोलन केले. तसेच … Read more

काँग्रेसमध्ये मतभेद; `या` काँग्रेस नेत्यांना कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नाहीत, काँग्रेस नेत्यानेच दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. आता अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा.सुजय विखे यांना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत नगर दक्षिणचे खा.सुजय विखे हे जिल्ह्यात लॉकडाउनची मागणी करीत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हेच खासदार गावोगावी 200 ते 500 लोकांच्या बैठका घेवून के.के.रेंजच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत … Read more

बिग ब्रेकिंग : प्रशासन खासदार सुजय विखे यांच्यावर कारवाई करणार ?

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, आज खासदार सुजय विखे यांनी याबाबत बैठक घेतली, मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. खासदार विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन … Read more

आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांना आपण माफ करणार नाही – खासदार डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  के.के. रेंजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कुणी राजकारण करत असेल तर त्याला आपण माफ करणार नसल्याचा इशारा देत येत्या पाच वर्षात हा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावण्याचे आश्वासन देत समितीच्या मागणीचे निवेदन लोकसभेच्या येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. वेळप्रसंगी याच प्रश्नावर न्यायालयात देखील जाण्याची आपली तयारी असल्याचे … Read more

ग्रामपंचायतीवर सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करावी – माजी खासदार गांधी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर पक्षातील कार्यकर्ते किंवा सरकारी कर्मचारी प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीला प्रतिसाद देत माजी खासदार दिलीप गांधी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक ऐवजी सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करण्याच्या मागणीचे … Read more

‘राष्ट्रवादीने आधी स्वतःच पाहावं’; खा. सुजय विखे यांचा खा. शरद पवारांना टोला

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शरद पवारांनी केलेल्या राम … Read more

बाळासाहेब थोरातांनी घेतली ‘ह्यांची’ भेट ; पुन्हा नाराजीनाट्य? थोरात म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- राज्यात महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर अनेक कारणाने नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे. परंतु समझोता तंत्रामुळे सर्व आलबेल होऊन जाते. आता पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरु आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारणही तसेच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. खातेविभाजन हा मुद्दा यावेळी … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाल्याने नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यातील बऱ्याच ग्रामपसंचायतींचा कार्यकाळ सध्या संपत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक घटनाबाह्य असून कायद्याची पायमल्ली करणारे आहे. असे परिपत्रक काढून सरकारने जनतेची दिशाभूल केली … Read more

‘शिवसेनेचे हिंदुत्व कुठे गेले? मुख्यमंत्री हे शरद पवारांना सोडून कुणालाच भेटत नाहीत’

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. महाराष्ट्रात साधू संतांचे , मंदिरासंदर्भात अनेक प्रश्न आहेत पण ते सोडवायला त्यांना वेळ नाही. शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी … Read more

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यांचा निषेध भारतीय जनता पार्टीने केला आहे. खा.राऊत हे नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत. शिवसेनेने त्यांचेवर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. खा.राऊत यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटवून उठेल. असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या … Read more

छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, … Read more

खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणतात भारतीय नोटेवर हे छायाचित्र छापा अर्थव्यवस्था सुधारेल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / दिल्ली :- भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी आता भारतीय नोटांवर लक्ष्मीमातेचे छायाचित्र छापण्याचा सल्ला दिला आहे. या छायाचित्रामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल तसेच भारतीय चलनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढेल, असा युक्तिवादही स्वामींनी पत्रकारांशी बोलताना केला. मध्यप्रदेशातील खंडवा येथे तीनदिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या समारोप सत्रानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी … Read more