आ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरवर कर्जत येथे 50 तर जामखेड येथे 70 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या कौतुकास्पद कामासाठी लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र या संकटापासुन … Read more

 आ. रोहित पवारांचीही राज ठाकरेंसारखीच केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. परंतु अजूनही काही क्षेत्रे सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात जिम, हॉटेल, मंदिरे यांचा समावेश आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे करत आहेत. याच प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष … Read more

आ. पवार यांचा राज्यपाल यांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-कांदा उत्पादक शेतकर्‍याने व्यथा मांडण्यासाठी राज्यपालांना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्टिव करून खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी विरेश आंधळकर यांनी राज्यपालांना पत्र पाठविले आहे. कांदा निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव गडगडणार आहे. त्यामुळे व्यथा मांडण्यासाठी आपणास भेटायचे आहे. … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- देशांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत आहे. विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जामखेड शहराला पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळवून देण्यासाठी व जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे व ही लोक चळवळ झाली पाहिजे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आ.रोहित पवार … Read more

मोदींच्या वाढदिवसाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा विश्व झाला. मात्र यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला. याबाबत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस व त्या दिवशी राष्ट्रीय बेरोजगार … Read more

‘त्यांचे’ दर कमी करा केंद्र सरकारला आमदार रोहित पवार यांनी दिला सल्ला

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातून विरोध सुरू झाला आहे. मात्र, कांद्याचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला वेगळा उपाय सुचविला आहे. सरकारला सामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर कांदा … Read more

कांदा निर्यातबंदीवरून आ.रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या मोदी सरकारबाबत असंतोषाची लाट पसरलेली दिसून येत आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्राला एक सल्ला दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, सरकारला सर्व सामान्यांना दिलासा द्यायचा … Read more

युवकांच्या भविष्यासाठी आ.रोहित पवारांनी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- प्रश्न कोणताही असो तो सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी युवकांसाठी एक कौतुकास्पद उपक्रम सुरु केला आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत-जामखेड मतदार संघातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी ऑनलाइन ‘पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण’ घेण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून राज्य … Read more

रस्त्याची झाली चाळण; रोहित दादा जरा इकडेही लक्ष द्या

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या संकटमय काळात समस्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर देणारे आमदार रोहित पवार हे चांगलेच चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे जरा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता … Read more

आमदार रोहित पवारांचे ‘त्या’ नेत्याला पत्र…म्हणाले दुःख याचंच वाटतंय की, आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुशांतच्या बहिणीसह काही जणांनी केली होती. यात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही ही मागणी केली होती. याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं असून, चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे.त्यांना … Read more

मराठा आरक्षणाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं आता आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. तसेच विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असताना सत्ताधारी पक्षाकडून सरकारची बाजू हिरीरीनं … Read more

आधी मुद्दा नीट समजून घ्या मग टीका करा ; आ. रोहित पवारांच सडेतोड प्रतिउत्तर

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- सध्या राज्य संकटात आहे. राज्यावर संकट असतानाही राजकारण केलं जात असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल. आज राज्यात कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत आहे. परंतु असली टीका करताना निदान विषय काय आहे हे तर समजून घ्या आणि मग टीका करा असे सडेतोड प्रतिउत्तर आ. पवार … Read more

जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- महायुती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेचे चांगलेच भांडवल करण्यात आले होते. या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा झाला याचे महत्व पटवून देण्यात आले होते. याच जलयुक्त शिवार योजनेसंबंधी कॅगचा अहवाल आला आहे. आणि ही योजना असफल ठरल्याचे त्यातील शेऱ्यांवरून दिसून येत आहे. यावरून कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

कुकडी पाणी संदर्भात आनंदाची बातमी; आता….

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांसाठी कुकडी प्रकल्प डावा कालवा म्हणजे अमृतमय वरदान आहे. त्यामुळे येथील अनेक भाग हिरवागार झाला आहे. आता आ. रोहित पवार यांच्या नियोजन व पाठपुराव्यामुळे याबद्दलचा एक प्रश्न मार्गी लागला आहे. तो म्हणजे डावा कालव्याच्या विभागलेल्या कर्जत व श्रीगोंदा क्षेत्राच्या पाणी नियोजनासाठी आता स्वतंत्र कार्यालयाला शासनाने … Read more

आमदार रोहित पवार यांनी साधला कंगनावर निशाणा,म्हणाले अश्या ड्रामेबाजांना

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  ‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा … Read more

कर्जत तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी; आ. रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेत आपल्या मतदार संघामधील अनेक समस्या सोडवण्याचा धडाकाच लावलेला आहे. त्यांनी कर्जत तालुक्यामधील अनेक समस्यांचे वैयक्तिक लक्ष देत त्यांची सोडवणूक केली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटले असून सुटलेल्या प्रश्नांची घोषणा होण्याची औपचारिकता राहिली असल्याची माहिती आ. पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. कर्जत तालुका … Read more

आमदार रोहित पवार जेव्हा खासदार डॉ सुजय विखेंचे कौतुक करतात तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना विस्थापित व्हावे लागेल अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु विस्थापित होणाऱ्या गाळेधारकांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येईल असे आ. रोहित पवार यांनी गाळेधारकांना आश्वासित केले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम पुढील आठ … Read more

मी आणि रोहित पवार बरोबर असलो जिल्ह्यात कोणी विरोध करणार नाही – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कर्जत येथील मुख्य रस्त्याला असणाऱ्या गाळे धारकांसाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊन गाळेधारक आणि रस्ता यामध्ये सुवर्णमध्य असा मार्ग काढू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी गाळेधारकांच्या बैठकीत केले. कर्जत येथील मुख्य रस्त्यावरून अमरापूर-कर्जत-भिगवण हा राज्य मार्ग जाणार असल्याने कर्जत येथील मुख्य रस्त्यावरील गाळेधारकांचे गाळे विस्थापित … Read more