अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंपाची शक्यता ; बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला, दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले … Read more

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीवरून घेऊन जाण्यास सत्यजित तांबे यांचा विरोध ! नगरच्या राजकारणात पुन्हा थोरात विरुद्ध विखे

Satyajit Tambe On Pune Nashik Railway

Satyajit Tambe On Pune Nashik Railway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिक आणि पुण्याचे मोठे योगदान आहे. पण, स्वातंत्र्यानंतर जवळपास आठ दशकांचा काळ उलटल्यानंतरही पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने कनेक्ट व्हावी अशी नागरिकांची … Read more

अंगणवाडी सेविकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार – आ. सत्यजीत तांबे

Satyajit Tambe

येणाऱ्या काळात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंगणवाडी सेविकांचे योगदान अमूल्य ठरणार आहे. मात्र, बालशिक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर गेल्या असून ही बाब अत्यंत चुकीची आहे. ३ ते ७ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची सुविधा अंगणवाडी सेविकाच करतात. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी भूमिका आ. सत्यजीत तांबे यांनी … Read more

आ. सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’

Satyajit Tambe

विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला. आमदार सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक … Read more

Satyajit Tambe : माझ्या निवडणुकीचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांना, सत्यजित तांबे यांचा मोठा गौप्यस्फोट

Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक आरोप केले. यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीवरून काँगेसमध्ये दोन उभे गट पडले. असे असताना आता अधिवेशन सुरू असताना तांबे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय चर्चा … Read more

Balasaheb Thorat : मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं? बाळासाहेब थोरात यांनी सांगताच अजित पवार पडले तोंडघशी

Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडले आहे. मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितले? असा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता अजित पवार यांची … Read more

Satyajit Tambe : ब्रेकिंग! आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा निर्णय? ‘या’ पक्षात प्रवेश केल्याची राज्यात चर्चा..

Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक आरोप केले. यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीवरून काँगेसमध्ये दोन उभे गट पडले. अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे भाजप की मूळ पक्ष काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा रंगली … Read more

Satyajit Tambe : नगर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण जुळणार? सत्यजीत तांबेंनी घेतली विखे पाटीलांची भेट

Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी अपक्ष उभा राहून काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी नाशिकमधून विजय मिळवला आहे. या निवडणुकीची मोठी चर्चा झाली. असे असताना या निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसने आम्हाला पक्षाबाहेर ढकलण्याचे सर्व प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यांना भाजपही खुली ऑफर देत आहे. त्यानंतर आज सत्यजीत तांबे … Read more

Satyajit Tambe : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी! सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत..

Satyajit Tambe : आमदार सत्यजित तांबे यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी थेट कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटला अनेक अंगाने बघितले जात आहे. तांबे नुकतेच अपक्ष निवडणूक येऊन आमदार झाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा … Read more

Balasaheb thorat : बाळासाहेब थोरात राजीनामा मागे घेणार? दिल्लीला जाण्याआधी म्हणाले, पक्षासाठी..

Balasaheb thorat : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. यामुळे बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला होता. असे असताना आता ते राजीनामा मागे घेण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, आता ते सर्व सोडून द्या, जे झालं ते झालं. आता आम्ही फक्त पक्षाला पुढे घेऊन जाणार आहोत. मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटल्यानंतर या वाद संपू शकतो, असे सूचक … Read more

Balasaheb Thorat : अहमदनगर जिल्ह्यात होणार हे दोन राजकीय भूकंप ? एक तांबे दुसरे थोरात…

Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. असे असताना आता पुढे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

Balasaheb thorat : अखेर बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचे खरे कारण आले समोर, म्हणाले, दिल्लीत..

Balasaheb thorat : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अचानकपणे राजीनामा दिला. पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू होता. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची कारण समोर आली आहेत. थोरात म्हणाले, सत्यजीतसाठी मी दिल्लीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यास सर्वांची तयारी होती. मात्र अचानक शेवटच्या दिवसांत राजकारण झाले. सगळं ठरलं होतं मात्र … Read more

Nana Patole : नाना पटोले एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात, राष्ट्रवादीचा थेट आरोप

Nana Patole : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आज सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर … Read more

Satyajit Tambe : कोणत्याही पक्षात जाणार नाही, अपक्षच राहणार, सत्यजीत तांबेंनी कागदपत्रे दाखवत केले धक्कादायक आरोप

Satyajit Tambe : पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याची जोरदार चर्चा झाली. त्यांनी मोठा विजय देखील मिळवला. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यांची पुढची भूमिका काय असणार यावर त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नाशिक पदवीधर निवणुकीत गेली २० ते २५ दिवस अनेक घडामोडी घडल्या, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे याविषयावर … Read more

Nashik : अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे भाजपात जाणार? आज भूमिका मांडणार

Nashik : राज्यात नुकतीच पदवीधर निवडणूक झाली. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही नाशिक विभागाची झाली. याचे कारण म्हणजे याठिकाणी काँग्रेसमधून बाहेर असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे उभा होते. सत्यजित तांबे या लढतीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. असे असताना आता त्यांची पुढची भूमिका काय असणार तसेच ते कोणत्या … Read more

नाशिक पदवीधर मतदारसंघ; सत्यजित तांबे ६८ हजार ९९९ मतांनी विजयी

Maharashtra News: नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले. विभागीय आयुक्त श्री गमे यांनी पहिल्या पसंतीच्या १ लाख २९ हजार ६१५ मतपत्रिकांची मोजणी पूर्ण … Read more

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य शासनाला भाग पाडणार ; सत्यजित तांबेंचा एल्गार

Satyajit Tambe On Old Pension Scheme

Satyajit Tambe On Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. म्हणजेच 2005 नंतर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार शासनाकडे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीयस योजना लागू करण्यासाठी मागणी केली जात आहे. नवीन पेन्शन … Read more

आठ वर्षांच्या ‘अहिल्या’चे अनोखे दान..!

Maharashtra News:भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. विविध प्रकारचे दान करावे. हे आपली संस्कृती शिकवीते. त्यामुळे आज समाजातील अनेकजण विविध प्रकारचे दान करतात. मात्र यात अहिल्या या चिमुकलीने केलेले दान विशेष कौतुकास्पद ठरत आहे.कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये केमोथेरपी घेतल्याने त्यांचे केस गळणे आदी प्रकार होतात.त्यामुळे समाजात वावरताना अपमानास्पद वाटते. या रुग्णाच्या जीवनात आनंदाचा … Read more