Satyajit Tambe : ब्रेकिंग! आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा निर्णय? ‘या’ पक्षात प्रवेश केल्याची राज्यात चर्चा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक आरोप केले. यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीवरून काँगेसमध्ये दोन उभे गट पडले.

अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे भाजप की मूळ पक्ष काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा रंगली होती. असे असताना हे दोन्ही पक्ष सोडून नाशिकमध्ये ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर्समुळे एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. याची सध्या राज्यात चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने शिवजयंती निमित्त शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासोबत आमदार सत्यजित तांबे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे तांबे यांनी शिंदे गटात प्रवेश केला का? अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे.

त्यामुळे ही नव्या राजकारणाची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पदवीधर निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या. बाळासाहेब थोरात यांनी देखील राजीनामा दिला होता.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर यावेळी आरोप करण्यात आले होते. यामुळे काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे दिसून आले. यामुळे सत्यजित तांबे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ते शिंदे गटात जातील असेही सांगितले जात आहे. आता ते काय करणार हे लवकरच समजेल.