नगरमध्ये ५४ लाखांचे सोने-चांदी व भेटवस्तू जप्त

नगर –विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने रविवारी सोने, चांदी व महागड्या भेटवस्तू असा सुमारे ५४ लाखांचा मुद्देमाल पकडला. वसंत टेकडी भागात वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पद वाहनात (एमएच ०२ डीजे ७१७७) दोन बॉक्स आढळले. एका बॉक्समध्ये ५१ लाख ७२ हजार ८३९ रुपये किमतीचे सुमारे दीड किलो सोने आणि दुसऱ्या बॉक्समधे ३ लाख १५ … Read more

बारामतीचे आक्रमण परतवून लावा !

अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित … Read more

आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिवस गोड करा

सोनई : गेली चार ते पाच दशके मी या परिसरात व नेवासा तालुक्यात राबलो. या माझ्या तालुक्यात समृद्धी आणायची, एवढी एकच जिद्द मनात होती. माझ्या त्या स्वप्नांना माझ्या पिढीच्या लोकांनी साथ दिली, म्हणून ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो. आता आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिस गोड व्हावा, एवढी एकच इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे भावपूर्ण आवाहन … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

युवक काँग्रेसच्या ‘वेकअप महाराष्ट्र ‘ ट्रेंडला ट्विटरवर उदंड प्रतिसाद

मुंबई :- विधानसभेच्या मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज ‘वेकअप महाराष्ट्र ‘या हॅशटॅगच्या नावाने ट्विटरवर केलेल्या ट्रेंडला महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊन  वेकअप महाराष्ट्राच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले. विधानसभेचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज ‘ वेकअप … Read more

विकासकामात आडकाठी आणण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले…

शिर्डी – पुढाऱ्यांमध्ये भांडणे लावून जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या शरद पवार यांनी प्रचारादरम्यान जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर एक शब्दही उच्चारला नाही. जिल्ह्याचे वाळवंट करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्याची योग्य संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. अस्तगाव येथे प्रचार सांगता सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. खासदार … Read more

ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर : राजळे

शेवगाव –  गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर न बोललेले, तसेच लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करत आहेत. ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवत आहोत, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.  भाजपच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी जनता व्यासपीठावर झाली. सभेपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

श्रीगोंद्याला गतवैभव मिळवून देणारच – पाचपुते

श्रीगोंदे घोड व कुकडीचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, ऊस, लिंबूसह अन्य पिकांची स्थिती चांगली असून या पुढेही पाणी नियमानुसार घेऊ, असे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी शनिवारी पारगाव येथे सांगितले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचपुते म्हणाले, मी चाळीस वर्षे काय केले, या विरोधकांच्या प्रश्नात राजकारण आहे. जे प्रश्न करतात, … Read more

भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा -खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर – येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघाचे रस्त्याचे प्रश्न असो किंवा सर्वात महत्वाचा पाटपाण्याचा प्रश्न असो त्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकार पक्षाचे आमदार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा, असे आवाहन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले. श्रीरामपुरात काल … Read more

राष्ट्रवादीचा सुपडासाफ होईल : खा. सुजय विखे

शेवगाव : राज्याच्या १५ वर्षामध्ये हजारो कोटीचे भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे राष्ट्रवादी कॉग्रस सरकार आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या वेळी शेतकरी आणि पाणी प्रश्नावर काम करण्यास सुरवात केली मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीला तीस पेक्षा जास्त जागा मिळणार नसून त्यांचा सुपडासाफ होईल, असा प्रबळ दावा खा. सुजय विखे यांनी केला. महायुतीचे उमेदवार आ. मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ … Read more

विकासकामांचा जनतेला हिशेब द्या : आमदार कर्डिले

राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले. उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत … Read more

गांधी हत्येचा कट रचणाऱ्यांना भारतरत्न देताच कसे?

औरंगाबाद – औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ओवेसी यांना हिरवा साप म्हटले होते. यासह त्यांनी लावलेला झेंडा उखडून फेकण्याचे आवाहन जाहीर सभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना शुक्रवारी ओवेसी म्हणाले की, मी लावलेला झेंडा काही बांबूत लावलेला नाही.  तो औरंगाबादकरांच्या मनात लावलेला असून तो यापुढे कायम राहणार आहे. भीतीचे राजकारण करून सत्ता … Read more

…रामाचा रावण झालायं, येत्या २१ ला दहन करण्याची वेळ!

जामखेड – गेल्या दहा वर्षांपासून कर्जत-जामखेडचा विकास खुंटला आहे. आता रोहित पवार यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन चेहरा मिळाला आहे. येत्या २१ ला राम शिंदे यांना पायउतार करा.  कारण रामाचा रावण झाला असून त्याचे दहन करण्याची वेळ आली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जामखेड येथील सभेत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरातून ४२ हद्दपार

श्रीरामपूर –विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४२ जणांवर तालुका बंदीची कारवाई केली. अर्जुन खुशाल दाभाडे, सागर श्रावण भोसले, नाना बाळू गुंजाळ, विजय ऊर्फ दुर्गेश कचरूलाल जैस्वाल, सचिन ऊर्फ गुड्डू राम अकबल यादव, सचिन सुभाष बाकलीवल, जिशान फारुख शेख, शोएब सत्तार शेख, प्रकाश शिवाजी रणवरे, फैयाज नासीर कुरेशी, मोहसीन रफिक शेख,  अमोल गोपाळ नानूस्कर, प्रकाश अरुण चित्ते, … Read more

श्रीरामपूरच्या विकासासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे !

श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

शिवसेनेचा भाजपला धक्का! तब्बल ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजपा-शिवसेना युतीत झालेल्या मतभेदांचा कल्याण-उल्हासनगर पाठोपाठ नाशकातही भडका उडाला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना बळ देण्यासाठी सेनेचे ३६ नगरसेवक व दोन्ही महानगरप्रमुखांसह ३५० पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठीच आपला लढा असल्याचा … Read more

…म्हणून घड्याळाची उमेदवारी त्यांच्या गळ्यात मारली!

पाथर्डी – निवडणूक लागली की, विरोधक जागे होतात. साडेचार वर्षांत कुठे संपर्क नाही, येणे-जाणे नाही, कोणाकडून उभे रहायचे याचा काही अंदाज नाही. भाजप, सेना, मनसे, वंचित अशा सर्वत्र चकरा मारल्या.  परळी, पुण्या-मुंबईला चकरा मारल्या. ‘घड्याळ’ कोणी बांधत नव्हते, म्हणून उमेदवारी गळ्यात मारली, असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे नाव न … Read more

उद्योगाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणार – आ.जगताप

नगर –नगर शहरात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत असताना शहरातील उद्योग व्यवसाय वाढावेत, यासाठी पोषक वातावरण निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. त्यामुळे काही काळ उतरती कळा लागलेल्या नगर शहरातील उद्योग व्यवसायाला आता उभारी येऊ लागली आहे.  उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर … Read more