अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार रोहित पवार पुढे सरसावले आहे.
रोहित पवार म्हणाले मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळायला हवी. केंद्राच्या पथकानेही या भागात तात्काळ पाहणी करून मदत जाहीर करावी.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे, कोणतीही अट न टाकता मदत द्यायला हवी, त्यासाठी राज्य सरकार मदत करेलच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले कि, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आघाडी, युतीच्या आकडेवारीत आघाडीने सरशी घेतली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यापुढे सर्वच निवडणुकीत मतदारसंघाचा अभ्यास करून आघाडीचा प्रयोग राबवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.