Ahmednagar News : रस्त्याच्या कडेचे दगड काढण्यास मज्जाव केल्याने सहा जणांनी मिळून तिघांना शिवीगाळ करत विळ्याचा वार करुन कुदळीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे नुकतीच घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास नवनाथ गाडे ( वय ४५) हे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे राहत आहेत. त्याच ठिकाणी लक्ष्मण ऊर्फ संदिप जगन्नाथ गाडे हे त्याच्या कुटूंबासह राहवयास आहेत. विलास नवनाथ गाडे यांच्या शेतात जाण्यासाठी शिवरस्ता आहे.
(दि.२८) ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास विलास गाडे हे राहुरी, नांदुर शिव रस्त्यावरुन जात असताना तेथे आरोपी हे शिवरस्त्याचे दगड काढत होते. त्यावेळी ते फोटो व व्हिडिओ शूटिंग काढू लागले. त्यावेळी तेथे आरोपी आले.
तेव्हा विलास गाडे हे लक्ष्मण ऊर्फ संदिप जगन्नाथ गाडे यांना म्हणाले की, तुमची मुले रस्त्याचे दगड काढत आहेत. त्यांना असे करुन देवु नका. असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी विलास गाडे तसेच त्यांचे वडील व भाऊ यांना शिवीगाळ केली. तसेच विळ्याने वार केला.
नंतर कुदळीच्या दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्हाला आज थोडेच मारले आहे. परत जर आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेत विलास गाडे तसेच त्यांचे वडील व भाऊ हे तीघेजण जखमी झाले आहेत.
घटनेनंतर विलास नवनाथ गाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण ऊर्फ संदिप जगन्नाथ गाडे, मिनिनाथ जगन्नाथ गाडे, भागवतराव जगन्नाथ गाडे, सोमनाथ मिनिनाथ गाडे, प्रणव लक्ष्मण गाडे, सात्विक लक्ष्मण गाडे (सर्व रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी) या सहा मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.